डी.एम.पोळ सेवापुर्ती शब्दांकन



🍁सेवापुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
  आपले मित्रवर्य व  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालेघर येथील पदवीधर शिक्षक श्रीमान डी.एम. पोळ सर नियतवयोमानानुसार ३१जानेवारी २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यानिमित्ताने लेखन प्रपंच.
    श्री.पोळ सरांचा शैक्षणिक सेवेचा श्रीगणेशा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाटण तालुक्यातील बेलवडे खुर्द येथे १९९२ साली झाला.सात वर्षाच्या काळात त्यांनी शाळेचा चेहरा मोहरा सहकारी शिक्षकांच्या सहकार्य बदलून शाळेचा नवा आयाम निर्माण केला.तदनंतर सरांची स्व:तालुक्यात वाईला बदली झाली.पुर्वी तालुका मास्तर कार्यालय म्हणून  असणाऱ्या जिल्हा परिषद  प्राथमिक केंद्रशाळा बोपर्डी येथे ते रुजू झाले. विद्यार्थीप्रिय उपक्रमशीलता जोपासत शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले.
दरम्यानच्या काळात संगणकीय शिक्षण घेतलेले शिक्षक अध्ययन अध्यापन आणि कार्यालयीन कामासाठी संगणकाचा वापर करणारे  तंत्रस्नेही होते.त्यांच्यातील हे कौशल्य तत्कालिन गटशिक्षणाधिकारी श्री राजेंद्रजी बाबर साहेब यांनी हेरुन त्यांची  सर्व शिक्षा अभियान काळात  गट समन्वयक म्हणून नियुक्ती केली. त्याकाळातील प्रशिक्षणे, भौतिक सुविधा,आरोग्य कॅम्प आणि विविध उपक्रमांची अपडेट माहिती उपलब्ध करून देण्याचे त्यांचे उठावदार कार्य तालुक्यातील सर्वांच्या परिचयाचे आहे.
या काळात सरांनी शिक्षण विभागात ११वर्षे तेंव्हाचे गटशिक्षणाधिकारी श्री राजेंद्र बाबर,श्री एच.व्ही. जाधव,श्री एन.बी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.संगणकावर काम कसे करावे?माहिती कशी भरावी? प्रिंट कशी काढावी याची सर्व माहिती सरांनी मला प्रात्यक्षिकासह दिली. श्री पोळ सरांनी आम्हा विषय तज्ज्ञ (साधनव्यक्ती) श्री दादा कुदळे, अरविंद चोरट, शेखर जाधव, शोभा पंडित आणि केंद्र समन्वयकांना वेळोवेळी गरजेप्रमाणे वेळोवेळी मार्गदर्शन केले.एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास कसा करायचा.?टिपणी कशी तयार करायची?  यांची इत्यंभूत माहिती दिली.
सर्व शिक्षा अभियान काळात काम करताना सरांना काळवेळेचं कधीच भान नसायचे. रात्री उशिरापर्यंत ते  कार्यालयात काम करत असत.त्यांच्याच हाताखाली मी संगणकावर काम करायला शिकलो. सर्व शिक्षा अभियान नंतर समग्र अभियान आले. प्रतिनियुक्तीवरील स्टाफ  वेगवेगळ्या शाळेत कार्यरत झाला.सन २०१४ पासून दुर्गम भागातील मांढरदेवी डोंगरावरील बालेघर शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत झाले. विद्यार्थी गुणवत्ता हीच मालमत्ता समजून शाळेचा क्रिडा स्पर्धा,
बोलका व्हरांडा, कलापथक आणि शैक्षणिक गुणवत्ता सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने वाढविण्यासाठी प्रयत्न केले.आज ३१जानेवारी २०२५  पोळ सर सेवानिवृत्त होत आहेत.त्यांना सेवापुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा आणि निरामयी जीवनाच्या सदिच्छा!!!!
@
शब्दांकन श्री रवींद्रकुमार लटिंगे मुख्याध्यापक जि.प.मॉडेल स्कूल माझेरी पुनः ता.फलटण

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड