पुस्तक परिचय क्रमांक:२०२ प्रतिभावंत साहित्यिक अण्णा भाऊ साठे



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२०२
पुस्तकाचे नांव-प्रतिभावंत साहित्यिक अण्णा भाऊ साठे 
लेखक: यशवंत मनोहर 
प्रकाशन-सनय प्रकाशन, नारायणगाव 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती १ऑगस्ट २०१९
पृष्ठे संख्या–१६८
वाड़्मय प्रकार-साहित्य संपादन 
किंमत /स्वागत मूल्य--१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२०३||पुस्तक परिचय 
            प्रतिभावंत साहित्यिक 
अण्णा भाऊ साठे 
       लेखक: यशवंत मनोहर 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 उपेक्षित असणाऱ्या फकिराला अंधारातून प्रकाशाकडे आणलं.याच लोकप्रिय कादंबरीला १९६१साली महाराष्ट्र शासनाने प्रथम पारितोषिक देऊन साहित्यसम्राट प्रतिभावंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरव केला.
    गावकुसाबाहेर अठरा विश्व दारिद्यात उपाशीपोटी उपेक्षितांचे जीवन जगणाऱ्या समाजातील व्यक्तीरेखांचे जीवंत बोलके चित्र रेखाटले आहे. रांगडी बोलीभाषा अफलातून शैलीत कथा ,कादंबरी,पोवाडे आणि नाट्य रुपाने साहित्य रेखाटन करणारे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा धांडोळा लेखक यशवंत मनोहर यांनी’प्रतिभावंत साहित्यिक अण्णा भाऊ साठे’या पुस्तकात घेतला आहे.
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित केले आहे.हे पुस्तक अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यप्रपंचाला अभिवादन करायला प्रसिद्ध केले आहे.
त्यांचे लेखन वैविध्यपूर्ण असून परिवर्तनाच्या दिशांवर उजेड अंथरत जाणारे आहे.त्यांनी अडचणींना सामोरे जात प्रसंगी अडचणींवर मात करत लेखन केले आहे.गरीब कष्टाची भाकर खाणारा माणूस जीवनाच्या केंद्रस्थानी असणारी समाजरचना त्यांना हवी होती.
 अण्णा भाऊंच्या प्रतिभेने एवढ्यात विराट अवकाशाची निर्मिती केली की हे अवकाश मग कोणा प्रदेशात,जातीत वा धर्मात कधी मावलाच नाही.त्यांच्या शब्दाशब्दात या अवकाशाचा उजेड होता आणि या उजेडाची वैश्विकता होती.अण्णा भाऊंचा हाच खरा वारसा आहे.तो कठीण आहे पण अवघड नाही.साहित्याची निर्मिती माणसालाही असिमता देते.अण्णा भाऊंचे साहित्य महाअस्मितेचा आविष्कार आहे. त्यांचा साहित्याचे बीज गावकुसाबाहेरील समाजाचे, अन्यायाने पिचलेल्या गांजलेल्या परिस्थितीत आहे.उपेक्षेवर मात करणाऱ्या उमेदींची गाज आहे.संघर्षात केलेल्या लेखणीचे नाव अण्णा भाऊ साठे आहे.
 लेखक तथा संपादक यशवंत मनोहर यांनी मनोगतात प्रतिभावंत साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे समर्पक शब्दांत विश्लेषण केले आहे.त्यांच्या साहित्याची गरीमा लेखातून समजून येते.परिवर्तनशील वैचारिक मंथन करणारे या दास्तानातील अमूल्य लेख आहेत. एकंदर सहा लेख प्रसिद्ध केले असून त्यातून अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे प्रतिबिंब दिसते.अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील तत्त्वज्ञान, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिभेचे सूर्यकुल ,दाहक सत्याचे सौंदर्य, साहित्यदृष्टी,जग बदल घालुनी घाव,पर्यायी व्यवस्थेचा ध्यास.यातील लेखातून वाड्मयीन चिंतन मांडले आहे.इतर देशीपरदेशी साहित्य आणि अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची विश्लेषण अभ्यासपूर्वक आणि जाणीवपूर्वक मांडले आहे.
 तर परिशिष्टात सहा लेख असून यातून त्यांचा शाहिरी ते लेखक असा साहित्यिक प्रवास उलगडत जातो.दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटकीय भाषण,साहित्य संपदा,कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट, साहित्याचा परामर्श,साहित्य संमेलने,पीएच.डी.प्राप्त प्रबंध.
अण्णा भाऊंचा वारसा कष्टांचा अन् निष्ठांचा आहे.पायथ्यापाशी बसून साहित्याचा गड सर करु पाहणारांना हा वारसा पेलता येणे जिकिरीचे काम आहे.जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले भीमराव…भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर अण्णा भाऊ साठे यांच्यावर बाबासाहेबांचा विशेष प्रभाव पडला.आर्थीक आणि सामाजिक शोषणाच्या विरोधात आवाज उठवला.या शोषणांचे अविभाज्य रुपच आपल्या प्रज्ञेपुढे ठेवलेले आहे.ही केवळ धार्मिक रचना नसून गुलामगिरीपेक्षाही भयंकर अशी आर्थिक रचना आहे.
या पुस्तकातील सर्वच लेख वैचारिक मंथन करायला लावणारे आहेत.प्रतिभावंत साहित्यिक म्हणून साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या अक्षरधनाचे वाचन केले पाहिजे..

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक २५ जानेवारी २०२५



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड