पुस्तक परिचय क्रमांक:१६६ जीवन रंग
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१६६
पुस्तकाचे नांव-जीवन रंग
लेखकाचे नांव- मनिषा शिरटावले
प्रकाशन-प्रभा प्रकाशन,कणकवली
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती ५एप्रिल २०२४
पृष्ठे संख्या–८०
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१६६||पुस्तक परिचय
जीवन रंग
लेखक: मनिषा शिरटावले
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
रोजच्या जीवनात अनेकदा आपण संवाद साधत असतो.भाषण संभाषण गुजगोष्टीतून सहजतेने होत जाते.कित्येकदा आपण अनेक उपमा देत असतो. काही शब्दांचे नेमके अर्थ आपल्याला उमजत नाहीत.काही संकल्पना स्पष्ट होत नाहीत.त्या समर्पक शब्दात अर्थ शोधायला शब्दकोषात डोकवावे लागते.संदर्भ शोधून नेमका अर्थ शोधायला लागतो.पण काही अक्षरांशी हितगुज साधणारे असतात.वास्तवतेने व्यक्त होणारे. सूक्ष्मपणे अभ्यास करून मतितार्थ सांगणारे. त्यापैकीच एक म्हणजे लेखिका मनिषा शिरटावले.
'जीवन रंग' या पुस्तकातून त्यांनी अनेक शब्दांचा नेमका अर्थ आपणाला उलगडून दाखविला आहे.
इतिहास, वर्तमान आणि भविष्याचं समग्र आकलन होण्यासाठी सर्वसामान्यांच्या साहित्य क्षेत्रातील यांनी योगदानास अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते.कारण रोजच्या जीवनातील स्पंदनं,पदर ,ताणे-बाणे अतिशय साधेपणाने आणि मनापासून लेखिका मनिषा शिरटावले यांनी जीवनरंग कथासंग्रहातील लेखांचे लेखन केले आहे.लेखिका ग्रामीण भागात अध्यापनाचे काम करत आहेत. अतिशय आत्मितयतेने त्यांनी वैचारिक मंथन करणारे लेखन केले आहे.जणू काही आपल्या आत्मासोबतीचा मुक्त संवादच होय.
मनात उचंबळून येणाऱ्या जाणीवा जगताना त्यांनी स्वत: अनुभवलेले, अनुभवत असलेले,पाहत असलेले कंगोरे या लेखमालेत गुंफलेले आहेत.
साधं सोपं जगायचं.अन् जगताना एखादी सर मनात रुंजी घालत असते.अनेक समस्या
डोळ्यांसमोर उभ्या राहतात.त्या समस्यांची उकल करण्यासाठी आंतरिक संवादाची भाषा अवगत असावी लागते.तेच सूत्र पकडून लेखिका मनिषा शिरटावले यांनी खूप छान लेख गुंफलेले आहेत.
'जीवन रंग'या लेखसंग्रहात तीस लेखांची मालिका गुंफली आहे.सगळेच शब्दशीर्ष आपल्या ओळखीचे वाटतात.जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सांगताना, परिवर्तन करा. बदल घडवा.असा उपदेश करताना आपण यातील अनेक विशेष शब्दांचा वापर करत असतो.मानवी व्यक्तींचे गुण-अवगुण वर्तन आणि स्वभावधर्म.हे दाखविणाऱ्या त्या शब्दांचे सामर्थ्य, विचारधारा याविषयी ऊहापोह या पुस्तकात केला आहे.क्षणभंगुर सुखासाठी आपण काय काय दिव्य कशासाठी करत असतो याचे विवेचन अभ्यास पुर्ण रीतीने मांडले आहे.आवडत्या क्षणाचा सहवास आयुष्यभर ऊर्जा देत असतो. हे पुस्तक जगण्याचे तत्त्वज्ञान आहे.जीवनाला दिशा देणारे आहे.
दुःख,वेदना जाणावया,जागवू संवेदना. अतिसंवेदनशील मन स्त्रीचं असतं.तीला सर्वात
जास्त वेदना सहन कराव्या लागतात.ह्दयी पान्हा,नयनी पाणी, जन्मोजन्मीची हीच कहाणी. अतिशय सुंदर शब्दात संवेदनशील मनाची ओळख करून दिली आहे.'मोह' होणं नैसर्गिक स्वभावधर्म आहे.परंतु तो मिळविण्यासाठी अनुचित प्रकार करु नये हेच महत्त्वाचे आहे.कारण मोहातूनच वासना उद्भवते.म्हणून सुजनहो, जाणून घ्या हे बंध मोहाचे, ह्रदयाला बळ द्या विवेकाचे! प्रेमरुपी राधेची निरामय निरागसता प्रेमभावेतून व्यक्त केली आहे.
माणसाचा मुख्य शत्रू आळशीपणा.भौतिक सुखासाठी कल्पनेच्या दुनियेत जगत सदैव बैचेन वाटणं.सुखसमाधानी नसणं.तर संयम ठेवला. मनावर ताबा असेल तर समाधानी जीवन जगण्यासाठी भावभावनांवर संयम ठेवावा लागतो.काही माणसं एकाकीपणे जीवन कंठत असतात.इतरांच्या सुखदुःखाची त्यांना काळजी नसते.ते आपल्याच जगात जगत असतात. सुंदर आणि सहज सुंदर शब्दात लेखन केले आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
सुंदर जीवन रंग
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete