काव्य पुष्प क्रमांक-२६० पैठणी
पैठणी चंद्रकला
पैठणी मराठमोळी
कोयरीच्या ठिपक्यांची
येवल्याची भरजरी
मखमली पदराची.…...
किनारी काठ बाई
रेशमी गोंड्याची...
उंची शानदार
भरजरी पैठणीची….
आभाळाचं चांदणं
पैठणीवर चमकलं
चमचमतं चांदणं
चंद्रकलेत सजलं….
ठिपक्या रुपेरी
कोयऱ्या चंदेरी
तारका नक्षीदारी
वेलबुट्टी मयुरी…..
काजळरंगी रंगछटेनं
काळीज बाई खुलतं
चंद्रकला परीधानानं
सौंदर्याचं रुपडं बहरतं…..
२० एप्रिल २०२२
Comments
Post a Comment