जग शब्दांचं.. साहित्यिकांच्या विचारांचं...लेख श्री.राजू गरमडे





** जग शब्दांचं......
                         साहित्यिकांच्या विचारांचं...**

{ दर रविवारी प्रसिद्ध होणारे सदर }

* काव्यपुष्प :- ३४ वे   * कवी :- श्री.रवींद्रकुमार लटिंगे
                                                 { एम.ए.,डी.एड.}
                                                  ओझर्डे वाई.जि.सातारा.
***********************************************

कवी,लेखक,कवयिञी,लेखिका म्हणजेच आपल्या समाजाचे प्रतिबिंब आहे.समाजामध्ये घडत असलेल्या चांगल्या- वाईटाचे प्रतिबिंब रचनेतून पडत असते. त्यामुळेच समाजामध्ये जनजागृती घडून येते. समाजप्रबोधन होते.
एक प्रकारे ही साहित्यिक मंडळी समाजसेवेच व्रत घेऊन आपल्या लेखनीद्धारे समाजामधल्या ज्वलंत विषयांवर कविता,लेखन करुन समाजमनाला विचार करण्यास बाध्य करतात.एक प्रकारे त्यांच लेखन विचारमंथनीय असतं.अनेक कवी,लेखक,कवयिञी आपल्या संघर्षमय आणि वेदनेनी होरपळलेल्या जीवनाला कविता,कथा आणि कादंबर्‍यामधून सुंदरपणे मांडतात.त्यामुळे अनेकांना प्रेरणाही मिळते.

⭐ आज आपणास * जग शब्दांच......साहित्यिकांच्या विचारांचं....* या काव्यपुष्प ३४ व्या सदरामध्ये सुप्रसिद्ध कवी,लेखक,समीक्षक,प्राथमिक शाळा कोंढावळे,ता.वाई.जि.सातारा येथील मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त,उपक्रमनशील शिक्षक समूहाचे समन्वयक,महाराष्ट्र राज्य वाचनसाखळी समूहाचे सहसंयोजक आणि ' वाचनयाञी पुरस्कार ' प्राप्त आ.श्री.रवींद्र लटिंगे सरांचा आणि त्यांच्या साहित्य,शैक्षणिक आणि सामाजिक दातृत्वाचा आपणास परिचय करुन देत आहे.

⭐ श्री.रवींद्रकुमार लटिंगे यांची प्रकाशित साहित्यसंपदा.

📕 पाऊले चालती { प्रवासवर्णन }
📕 हिरवी पाती { कवितासंग्रह }

☀️ सुप्रसिद्ध कवी,लेखक,समीक्षक,मुख्याध्यापक आ.रवींद्र लटिंगे सरांच्या साहित्य,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेञामधील कार्यासाठी मिळालेले सन्मान :-

🔴 वाई तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार
🔴 आई प्रतिष्ठान वाठार नि.फलटण जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
🔴 नेशन बिल्डर अवॉर्ड रोटरी क्लब,वाई
🔴 राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी  मुंबई
🔴 भारती रिसर्च सेंटर,सातारचा आदर्श शिक्षक पुरस्कार
🔴 वाचन साखळी समूह महाराष्ट्र
 राज्य वाचनयात्री पुरस्कार
🔴 महालक्ष्मी आधार फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने सन्मान
🔴 वाचन साखळी समूहाचे सहसंयोजक 

⚜️ आ.श्री.रवींद्र लटिंगे सरांची समाजाप्रति असलेल्या सामाजिक बांधिलकीतून केलेले समाजापयोगी कार्य :-

🔶 वंचित,गरीब घटकातील मुलांना शिक्षणाच्या गंगेमध्ये आणण्याच्या त्यांच्या प्रयन्नाचे समाजातील सर्वच स्तरामधून कौतुक झाले.
🔶  कोंढावळे येथील शाळा तंबाखुमुक्त करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच अभिनंदनीय आहे.
🔶 माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेचे सुशोभिकरण आणि  रंगरंगोटी करण्यात आली.
🔶 अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरीत तर केलेच शिवाय शाळेपयोगी मदत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मिळवून दिली.
🔶 डिजीटल ई-लर्निंग सुविधा अभेपुरी व कोंढावळे शाळेला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मिळवून त्यांनी मोलाची भुमिका बजावली.
🔶 कोंढावळे गावातील १०० मुलांना कर्‍हाडच्या जननी ट्रस्टतर्फे स्कूल किटचे वाटप त्यांनी केले.
🔶 ओझर्डे येथील कलाविष्कार क्रिकेट क्लब चे व्यवस्थापक म्हणून २१ वर्ष त्यांनी काम पाहिले.
क्रिकेटचे सामने भरविण्यातही त्यांनी मोलाच योगदान दिलेल आहे.
🔶 कोंढावळे,जि.सातारा येथील शाळा डिजीटल करण्यामध्ये त्यांनी मोलाची भुमिका बजावली.
🔶 सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेकदा पुरग्रस्त बांधवाना मदतीचा हात दिलेला आहे.
🔶 ज्ञानज्योती साविञीबाई फुले ग्रंथालय नायगाव ता.खंडाळा.जि.सातारा या ग्रंथालयास त्यांनी २१ पुस्तके भेट म्हणून दिली.
🔶 स्वकुळ साळी समाज वाईचे सचिव म्हणूनही ते कार्य करीत आहे.
🔶 कोरोना काळामध्ये त्यांनी व्हाॅटसअॅपवर व फेसबुकवर " साठवणीतल्या आठवणी " हे दै.सदर त्यांनी चालविले. तोच raviprema या ब्लाॅगवर लेखन

☀️ श्री.रवींद्रकुमार गणपत लटिंगे ☀️
    { ओझर्डे वाई.जि.सातारा }  एम.ए.डी.एड.

- मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने झटणारे दुसरे साने गुरुजीच.
- विद्यार्थ्यांच्या जाणिवांचा आणि कल्पकतेचा विस्तार व्हावा,त्यांना विशाल दृष्टी लाभावी यासाठी विविध ऊपक्रम राबविणारे हाडाचे शिक्षक.वक्तृत्व स्पर्धा, निबंध, कविता,लेखन स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांची जडणघडण व्हावी यासाठी अविश्रांतपणे झटणारे समर्पित शिक्षक म्हणजे श्री.रवींद्र लटिंगे सर.

- शिक्षणाच्या प्रवाहापासून दुर गेलेल्या मुलांना स्वखर्चाने तर कधी सामाजिक संस्थाच्या माध्यमातून आणण्याचे काम त्यांनी केले.
- जिल्हा आणि तालुकास्तरावरील अनेक शैक्षणिक प्रशिक्षक कार्यशाळेमध्ये त्यांनी मार्गदर्शक म्हणून कार्य केलेले आहे.
- साहित्य लेखन आणि मुलांना घडविण्यासोबतच त्यांना निसर्ग पर्यटन,गडकिल्ले भ्रमंती यांची ही आवड त्यांनी मनोभावे जोपासलेली आहे.
- त्यांच्या कविता असो की,साहित्यलेखन,प्रवासवर्णन असो रसिक वाचकांना खिळवून ठेवणार त्यांच लेखन आहे.
त्यांची कविता जशी विविध विषयांना स्पर्श करणारी आहे तसेच त्यांनी लिहिलेले लेख सुद्धा.सरांचं स्वतःच एक ग्रंथालय आहे.विविध विषयावरची शेकडो पुस्तके त्यांच्या ग्रंथालयामध्ये आहे.सर कवी,लेखक आणि समीक्षक सुद्धा आहे.
विविध साहित्यप्रकारावर त्यांनी केलेल समीक्षण मी वाचलेल आहे.सहज सुंदर अशी लेखनशैली,ओघवती भाषा आणि निसर्गदत्त लाभलेली प्रतिभा यामुळे सरांच लेखन वाचणे ही एक आनंददायक अशी अनुभूती आहे.

निसर्ग,मानवी जीवन,शेतकरी अशा विविध घटकावर त्यांचे शब्द,भावना भरभरुन फुललेल्या आहे. वाचकांच्या अंतर्मनांना जागृत करणार्‍या त्यांच्या कविता,साहित्यलेखन वाचकांसाठी निश्चितच प्रेरणादायक ठरत आलेल्या आहेत.आपल्या  * मनभावन * या कवितेमधून मनावर त्यांनी अगदीच सुरेख भाष्य केलेले आहे.

मौलिक क्षणांना टिपणं 
आठवणी जपून ठेवणं
स्मृतिपटलावर गोंदणं
अन् जीवाला हळवं करणं….

मन रिमझिम पावसासारखं  
धरेवर हळूवारपणे झरझरतं
चित्त मोकाट वाऱ्यासारखं 
वृक्षांच्या पानातून भिरभिरतं….

कष्टकरी वर्गाच्या वेदना आपल्या लेखनीतून प्रखरपणे मांडणारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्यावर त्यांनी लिहिलेली * साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे * ही कवितांही त्यांच्या लेखनीची ताकत व्यक्त करणारी आहे.

शोषितांचे आक्रोश शब्दांत सजले
त्यांचे कलापथकात पोवाडे गायले
कष्टकऱ्यांच्या जीवनातील पैलूंचे 
लोकनाट्यातून दर्शन घडविले ।।

उपेक्षितांचे जीणं जगणाऱ्या 
व्यक्तीरेखांना गुंफले शब्दात 
जीवनासाठी झगडणाऱ्या
वेदनांना आणले प्रकाशात ।।णा

⭐ आ.श्री.रवींद्रकुमार लटिंगे सरांच्या निसर्गावरील कविता वाचकांच लक्ष वेधून घेणार्‍या आहेत.त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाच शिर्षकही " हिरवी पाती " आहे.
सरांची " निसर्गाचा रंगोत्सव " ही कविताही रसिक वाचकांना निसर्गसृष्टिच्या रंगामध्ये हरवून टाकणारी आहे.

🍁निसर्गाचा रंगोत्सव 🍁

 पळसाच्या फुलांचा शेंदरी रंग 
आसमंती गुलाल उधळीत येतो
पांगाऱ्याचा पसरलेला भगवारंग 
चमकदार ज्योतींचे तुरे लेवतो ||

काटेसावरीचा पिवळा गुलाबी रंग
ठिपक्यांची रांगोळी रेखाटत असतो
निलमोहराचा गर्द निळसर मनरंग
आकाशात उठावदार नक्षी कोरतो ||

आंब्याचा पिवळसर मोहोराचा रंग
परिसर गंधित करायला धजावतो
देवचाफ्याचा सफेद पिवळसर रंग
भुईवरी फुलांचा सडा अंथरत राहतो||

मोगऱ्याच्या फुलांचा पांढरा रंग
गजरा करायला उतावळा होतो
रानातल्या हळदीचा पिवळा रंग
लगीन सराईचं आवातनं देतो ||

निसर्गातील मन भुरळणारी वृक्षवल्ली 
दिमाखात जादुई रंगमहाल उभारतात
पक्ष्यांच्या किलबिलाटांच्या सूरतालात
पानेफुलेफळांचा रंगोत्सव साकारतात||

रानावनातल्या पर्णिका हिरव्यागार
पांथस्थाला बहाल करतात गारवा
सावलीत रंग उडवती मित्रपरिवार
निसर्गाचा रंगोत्सव नजरेत भरवा||

सौंदर्यवान निसर्गाची रंगावली
माणुसकीच्या नात्यात बहरुया
परोपकारी आनंदानुभव देणारी 
वने वृक्षसंपादनाने जतन करुया||

                                      ✍️ श्री.रवींद्रकुमार लटिंगे

खुपच सुंदर अशी मनभावन काव्यरचना.
निसर्गावरील ऊत्कट प्रेमातून आणि निसर्गाच्या पानापानातून बहरलेली रचना.
संतशिरोमनी तुकाराम महाराजानी वृक्षाचे महत्व आपल्याला आधीच सांगून ठेवलेले आहे.
एका अंभगात वृक्षांच मानवांशी असलेल नातं अधोरेखित करताना ते लिहितात,

' वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे '

निसर्गातून आपल्याला प्राणवायू मिळतो.शिवाय मानवसृष्टीच,जीवसृष्टीच तो ऊदरभरणही करीत असतो.
एक प्रकारे निसर्गाचे अनंत उपकार आपल्यावर आहे.

कवीनी या रचनेतून निसर्गातून दरवळत असलेल्या रंगाविषयी फारच आत्मियतेने लिहिलेल आहे.
प्रत्येक वृक्ष हा आपल्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे ऊपयोगात येत असतो.

मोगर्‍याचा फुलांचा पांढरा रंग
गजरा करायला उतावळा होतो
रानातल्या हळदीचा पिवळा रंग
लगीन सराईच आवतन देतो ।।

किती सुंदर हा काव्यविलास.
कवीची प्रतिभा,सर्जनशीलता आणि निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी यातून व्यक्त होते.निसर्ग आपल्यावर मुक्तहस्ताने ऊधळण करीत असतो.आपल्या खजिना मानवसृष्टीसाठी तो रिताच करीत असतो.पण,मानव माञ कृतघ्न होऊन निसर्गालाच ओरबाडायला निघालेला आहे.सुरक्षा कवच म्हणून निसर्ग आपली कृपादृष्टी मानवसृष्टीवर ठेवावी असे वाटत असेल तर मानवानेच आताच आणि आतापासून निसर्गाला आपला मिञ मानून संवर्धन करायला पाहिजे.झाडे असेल तर आपण जगू हा मंञच निसर्ग नकळतपणे आपल्याला देतो आहे.
मी पुनश्च आमचे कविमिञ,मार्गदर्शक , शिक्षक आ.श्री.रवींद्रकुमार लटिंगे  सरांचे  मनपुर्वक अभिनंदन करतो.त्यांच्या पुढील साहित्यवाटचालीला आणि पुढील आयुष्याला शुभेछा देतो.पुढेही त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशित होत राहो,त्यांच्या साहित्यकृतीना मानसन्मान लाभत राहो अशी मंगल कामना करतो आणि थांबतो.

शब्दांकन
साहित्यिक श्री. राजू गरमडे चंद्रपूर
वाचनयात्री पुरस्कार विजेते 

फेसबुकवर लेखhttps://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0zccxkggf6Tn4PvaWo7wGwDm8CsncJpT1JQN1HcvhCivxncWCR2XCsCgbYL8wT9AXl&id=100006721180979&mibextid=Nif5oz

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड