Posts

काव्य पुष्प मायबोली कविता

Image
मराठी साहित्य संमेलन सातारा....   मराठी साहित्य संमेलन.. शब्दोत्सव सोहळा रंगणार अजिंक्यताऱ्याच्या अंगणी दरवळणाऱ्या शब्दगंधात  न्हायला चल जाऊ सजणी | वाचनवेड्या रसिकांना मिळणार अक्षरसाहित्याच्या खरेदीची पर्वणी  साहित्य संमेलनात उलगडणार माझ्या मायबोलीची कहाणी | कथाकवितांची मैफिल सजणार  परिसंवादात व्याख्याने गाजणार  मुलाखतीतून यशोगाथा उलगडणार  लेखक कवी साहित्यिक भेटणार| आख्यानातून ओळख  लोकसंस्कृतीची बहुरूपी भारुडातून  महती संतजनांची ग्रंथदिंडीत पाऊले उमटणार  प्रतिभावंतांची भेट ही मराठी साहित्याच्या  उत्सवाची | श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा

पुस्तक परिचय क्रमांक:२५५ मेवाड नरेश महाराणा प्रताप

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२५५ पुस्तकाचे नांव-मेवाड नरेश महाराणा प्रताप  लेखक: विनोद श्रा.पंचभाई प्रकाशन-चपराक प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती २१फेब्रुवारी,२०२० पृष्ठे संख्या–११२ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य-१५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २५५||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-मेवाड नरेश महाराणा प्रताप  लेखक:विनोद श्रा.पंचभाई 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 भारतभूमीला अनेक शूरवीरांची आणि असामान्य योध्द्यांची परंपरा लाभली आहे.ज्यांच्या पराक्रमाच्या किर्तीचा सुगंध अजूनही भारतवर्षात दरवळत असतो आणि अनेकांना प्रेरणेचा दीप बनत जगण्याची उमेद देतो त्या मेवाड नरेश महाराणा प्रताप यांच्या चरित्र आणि चारित्र्याची झलक या ग्रंथातून अनुभवता येते.तो ग्रंथ ‘मेवाड नरेश महाराणा प्रताप’विनोद श्रा.पंचभाई यांनी अतिशय समर्पक शब्दात आणि रसाळ भाषेत लिहिला आहे.   सोळाव्या शतकात होऊन गेलेले मेवाड नरेश महाराणा प्रताप हे अद्वितीय योध्दे होते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि तुलनेने कमी असलेल्...

पुस्तक परिचय क्रमांक:२५४ आंधळ्याचे डोळे

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२५४ पुस्तकाचे नांव-आंधळ्याचे डोळे  लेखक : वेद मेहता  अनुवाद:शांता ज. शेळके  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तृतियावृत्ती, ऑगस्ट,२००६ पृष्ठे संख्या–२३९ वाड़्मय प्रकार-आत्मचरित्रात्मक कादंबरी  किंमत /स्वागत मूल्य-१५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २५४||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-आंधळ्याचे डोळे   लेखक: वेद मेहता  अनुवाद:शांता ज. शेळके  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 अंधारात ज्ञानाचा प्रकाश चमकत ठेवणारे वेद मेहता!!!   इंग्रजी भाषेतील‘फेस टु फेस’हे दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आंधळ्या वेद मेहताचे आत्मचरित्र मराठी साहित्यातील सुप्रसिध्द लेखिका शांता ज. शेळके यांनी अनुवादीत  केलेले अक्षरसाहित्य ‘आंधळ्याचे डोळे’. स्वातंत्र्यपूर्वकाळातील एक हृदयस्पर्शी कथानक. भारतपाक फाळणीच्या काळातील माणूसपणाचं, धर्मभेदाचं वास्तव पटवून देणारं आत्मचरित्र. दंगेधोपे,दंगली आणि मुहल्ले घरे प्रत्येक पेटताना झालेल्या कुटूंबाच्या होरपळ...

पुस्तक परिचय क्रमांक:२५३ कुण्या एकाची धरणगाथा

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२५३ पुस्तकाचे नांव-कुण्या एकाची धरणगाथा लेखक : अभिमन्यू सूर्यवंशी  प्रकाशन-समकालीन प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१ जानेवारी,२०१२ पृष्ठे संख्या–११८ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य-१२५₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २५३||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-कुण्या एकाची धरणगाथा  लेखक: अभिमन्यू सूर्यवंशी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚     ध्येयवादी तात्यांनी ज्या चार गोष्टींसाठी लढा दिला, त्यातून एक गोष्ट लक्षात येते की,समाजातला एखादा सामान्यातल्या सामान्य माणूस एखाद्या ध्येयाने पेटून उठला तर शस्त्र, सैन्य, सत्ता आणि संपत्ती  नसतानाही मोठे कार्य करु शकतो.हा विचार अधोरेखित करणारी ही गोपाळ मोरे यांची धरणगाथा आहे.  एका शेतकऱ्याने आदिवासी क्षेत्रातील लोकांच्या विकासासाठी धरण कसं मिळवले.त्या यशस्वी झुंजीची अज्ञात कहाणी.ज्यांनी उभ्या आयुष्यात गुन्हेगारांची नांवे आणि गुन्ह्याचे स्वरुप सांगण्यासाठीच हाती लेखणी घेतली होती.अशा पोलिस दलातील निवृत्त...

क्षेत्र भेट अष्टविनायक रोपवाटीका विडणी

Image
🌱🪴 रोपवाटिकेस भेट  आज आनंददायी शनिवार निमित्ताने जिल्हा परिषद आदर्श शाळा माझेरी पुनर्वसन शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत विडणी ता फलटण येथील 'अष्टविनायक' रोपवाटिकेस भेट दिली.या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती तसेच रोपे तयार करण्याच्या पद्धती प्रत्यक्ष पाहिल्या.  शेतकरी आधुनिक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाने सुधारीत वाणांचा भाजीपाला अथवा फळभाज्यांची लागवड करण्यासाठी रोपवाटिकेतील रोपांची कशी निवड करतात? याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रोपवाटिकेचे मालक श्रीमान सुरेश पवार यांनी निकोप वातावरणात बीजापासून रोप तयार करताना मातीची निवड, खतांचा योग्य वापर, पाणी व्यवस्थापन तसेच रोपांची निगा कशी राखावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.  विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे अधिक माहिती घेतली.एका छोट्याशा बीजापासून लागवडीसाठी तयार होणाऱ्या रोपापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाला.नुकतेच पेरलेले बीज, अनुकूल तापमानात ठेवलेले, अंकुरलेले, दोन पानांची रोपे तसेच योग्य पाणी व हवेच्या साहाय्याने वाढणारी हिरवीगार रो...

स्मृतींच्या पाऊलखुणा

             स्मृतींच्या पाऊलखुणा   चार डिसेंबरला क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालयातून स्वरचित काव्यवाचन सादरीकरण झाले नंतर सायंकाळी चारच्या सुमारास चालतच राजवाड्यावर आलो.  दुसऱ्या वर्षी कॉलेजला ओझर्ड्यावरुन येऊनजाऊन करत होतो.सायंकाळी कॉलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी सातारा एस. टी. स्टॅण्डवर कधी धावत पळत,कधी भरभर चालत तर निवांत वेळ असेल तर रमतगमत.दुकानांच्या पाट्या वाचत वस्तु न्याहाळत पुढं पुढं जात असायचो.त्या दिवसांच्या आठवणी जाग्या झाल्या.त्यावेळच्या दिवसातील सुखद दुःखत क्षणांची आठवण येऊ लागली.  मग राजवाड्यावर आल्यावर पोटात भर घालावी म्हणून नामांकित चंद्रविलास हॉटेलमध्ये पावभाजी खाऊन पुढे पंचमुखी गणेशाचे दर्शन घेतले.तदनंतर धनकेशर समोरील एका दुकानातून पांढरे रुमाल खरेदी केली.अन् शेअर रिक्षासाठी परत राजवाड्यावर जाण्याऐवजी मनात विचार आला.चला आज चालतच एस. टी. स्टॅण्डवर खालच्या रस्त्याने गुरुवार पेठतून जाऊया.मग साधारणपणे दोन किलोमीटरचे अंतर कॉलेजच्या त्या दिवसांसारखे रमतगमत पार करायचं ठरवलं आणि मार्गस्थ झालो.सुमारे चाळीस वर्षांपूर्वीच्या प...

पुस्तक परिचय क्रमांक:२५२ पारितोषिक

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२५२ पुस्तकाचे नांव-पारितोषिक  लेखक : व्यंकटेश माडगूळकर  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण, डिसेंबर,२०१३ पृष्ठे संख्या–१३६ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१६०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २५२||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-पारितोषिक लेखक: व्यंकटेश माडगूळकर  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  सुप्रसिद्ध जेष्ठ ग्रामीण कथाकार व कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथांचा आस्वाद घेताना आपण मंत्रमुग्ध होतो.कुतूहल वाढवणाऱ्या आणि गाव खेड्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील आठवणींना उजाळा देणाऱ्या या कथा असतात.त्यांनी अनेक कथांमधून गावीतील व्यक्तिंची,सहवासातील माणसांची आणि निसर्गाचा मुक्तपणे आस्वाद घेणाऱ्या पशुपक्ष्यांची शब्दचित्रे आपल्या लेखणीने उठावदार करून त्यांची नाममुद्रा उठावदार केली आहे. यातील कैक जणांच्या मदतीने गावाकडच्या जंगलात लेखकांनी शिकार केलेली आहे. अशा व्यक्तिंचा कथासंग्रहात लेख प्रसिद्ध करून त्यांच्या स्...