Posts

छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी भाग क्रमांक-१३७

Image
🍃☘️🍁🍂☘️🌿🍂🍁 छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी..... दिनांक  १० नोव्हेंबर २०२० 🍁ग्रेटभेट ❗ लेखक, कवी, संग्राहक आणि निसर्गाची. क्रमशः भाग २ माझी भटकंती भाग क्रमांक-१३७ 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️             चराचराला ऊर्जा देणारा स्त्रोत  सूर्यनारायणाला बघत बघत आमचा प्रवास सुरु झाला.प्रत्येक दिवसाचं वेगळे पण असते.आज तर साहित्य,कला आणि निसर्गावर मनस्वी प्रेम करणारे कलासक्त व्यासंगी अवलियांच्या सहवासात सफर सुरू होती.लेखणी,वाणी  आणि ब्रशच्या सामर्थ्याने कलाकृती निर्माण करुन स्वत:आनंदानुभव घेऊन इतरांना आनंद वाटणारे कलेचे उपासक.मग काय? गप्पांच्या विषयाला तोटाच नाही.वाईच्या क्वीड गाडीचे सारथ्य स्वत:उध्दव तर महाबळेश्वरच्या वॅगनर गाडीचे सारथी संतोषजी होते.१९८० च्या दशकातील हिंदीतील श्रवणीय आशयभरी गाणी ऐकत प्रवासातील अंतर कमी होत होते.गाणी ऐकताना नकळत  रेडिओच्या सिलोन केंद्रावरुन सायंकाळी प्रसारित होणारी  "बीनाका गीतमाला " आठवली.त्यातील अॅंकर आवाजके दुनियाके मसिहा श्री अमिन सयानी यांच्या बहारदार आणि मधूर आवाजाचे स्मरण गाणी गुणगुणताना झाली .गाणी ऐकत आजवरच...

छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी भाग क्रमांक-१३६

Image
🍃☘️🍁🍂☘️🌿🍂🍁 छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी..... दिनांक  १० नोव्हेंबर २०२० 🍁ग्रेटभेट ❗ लेखक, कवी, संग्राहक आणि निसर्गाची. क्रमशः भाग-१ 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️             अखेर ठरलं      छांदिष्ट्य समुहातील मित्रांची आॅनलाईन सहविचार सभा आमचे गुरुतुल्य मित्र श्री दीपक चिकणे सरांनी रविवारी सायंकाळी सात वाजता आयोजित केली.त्यातील महत्त्वाचा विषय खरसुंडी येथील श्री रमेश जावीर सरांच्या काष्ठ्यशिल्प संग्रहालयाला भेट देणे आणि जातायेता निसर्गरम्य ठिकाणी वेचत  जाणं .वाटेवरल्या छांदिष्टवेड्या अवलियांशी गप्पागोष्टी करणं.        व्हाटसअपच्या आभासी माध्यमातून जडलेल्या मित्रांशी प्रत्यक्ष भेटून हितगुज करणे.असा सभेचा विषय होता.इथं प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळाली. उपस्थितातील प्रत्येकाचा एकच सूर दोन-तीन दिवसांतच नियोजन फायनल करुन जाऊया.कारण मी , शिवाजी आणि उध्दव गेली दोन-तीन महिने एकमेकांशी फोन झालाकी फलटण,खरसुंडी आणि भरतगांवला मित्रांना भेटायला जायचं नियोजन कधी करायचं हा एककलमी विषयावर गप्पा झोडायचो,पण काही ठरत नव्हतं....

आमची भटकंती रिंगरोड उत्तरार्ध भाग क्रमांक-१३५

Image
     🌿🍂🌳🍃🌳🍂🍃☘️          निसर्गाच्या सहवासात उत्तरार्ध भाग क्रमांक-१३५ आकोशी कोंढवली करत करत परतवडीत आलो.फणसे सरांचा हा भाग असल्याने बालपणीच्या आठवणी सांगितल्या. ते आध्यात्मिक संप्रदायातील वारकरी आणि किर्तनकार म्हणून ओळखले जातात.तसेच प्रत्येक गावात पैपाहुणे त्यामुळे" गुरुजी बरं हाय का"या परिवलीच्या शब्दाने विचारपूस करत.पायवाटा,डोंगरदऱ्या त्यांच्या परिचयाच्या, जलाशयात मनसोक्त पोहणं आणि दोस्तांसमवेत भटकणं.गप्पांच्या ओघात मुख्य: रस्ता सोडून मंदिराजवळ गाडी थांबवली तेव्हा समजलं आपण गावात आलोय.मंदिरं म्हणजे गावचे ग्रामदैवत सध्या  लाॅकडाउनमुळे गावाकडे जाधव सर होते. नव्याने बांधलेल्या टोलेजंग बंगल्याची पहाणी केली. घाईगडबडीत बनवलेल्या अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. जाधव सरांनी सर्वांची छान सरबराई केली. तदनंतर प्रवेशद्वाराजवळ आठवण म्हणून सर्वांचा ग्रुपफोटो घेतला.समोरच दिसणाऱ्या अडुळश्याचे झुडूप पाहून दिलीप जाधवांचे कुतूहल वाढले.त्याच्या औषधी गुणधर्माची माहिती सुनील जाधवांनी दिली तर एक पिवळे झालेले पान तोडून त्याचा विडा करुन चघळायला लागले.मीही तसंच अन...

निसर्ग सहवास पूर्वार्ध भाग क्रमांक-१३४

Image
🌳🍃🌳🍂🍃☘️           निसर्गाच्या सहवासात           पूर्वार्ध भाग क्रमांक-१३४ सन -२०२०     दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त आपल्याच बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही मार्गस्थ झालो.यावर्षी धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जलाशयाच्या काठावरील निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या कातकरी वस्तीतील आपल्या बांधवांकडे निघालो होतो.त्या वस्तीतील मुले आमच्या शाळेत आहेत.त्यांचीही भेट आणि दिवाळी भेट देणं असं नियोजन.  नेहमीच्याच शाळेच्या रस्त्याने आम्ही जात होतो. वस्तीतील लोकांना देण्यासाठी दिवाळी साठी लागणाऱ्या वस्तूंचे " दिवाळी कीट" फराळ आणि साडी घेऊन निघालो होतो.जांभळीचा पुल ओलांडून वाशिवलीचे चढण पार करताना अचानक लक्षात आलं.इथं काही कुटूंब रहात आहेत.लगेच भास्करला गाडी थांबवायला सांगितली. आम्ही भेटवस्तू घेऊन चढावावर गेलो.हाक मारली . छोट्याशा दारातून दोघेजण बाहेर आले.आम्हाला बघून कावरे बावरे झाले.दोन कुटुंबीयांना भेटवस्तू दिल्या.सहजच समोरच दृश्य पाहून मित्रांशी गुज केले. आपण   निसर्गाच्या सान्निध्यात रा...

माझी फसगत भाग क्रमांक-१३३

Image
🌿💫☘️💫🌿💫🌿💫🌿         माझी फसगत क्रमशः भाग क्रमांक-१३३ एकदा पंधरा दिवसांनंतर शनिवारी कॉलेज सुटल्यानंतर भांडुप(पुर्व)टिळकनगरला काकांकडे निघालो.त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे घाटकोपरच्या उतरलेल्या बसथांब्यावर आलो.तिथं भांडुपला जाणाऱ्या बसची चौकशी केली असता.आगे के बसस्टॉप पर  जाओ| व्हा बस मिलेगी| दोन-तीन वेळी पुढं पुढं चौकशी केली.योग्य बसस्टॉप मिळाला नाही.त्यामुळे भांबावून गेलो.गोंधळून तसाच उलट दिशेला गेलो.आणि पुढच्या बसस्टॉपवर चौकशी केली तर तो इसम म्हणाला ,'तुम्हाला कुठं जायचंय.'मी म्हणालो,'भांडूपला' त्यावर त्याने असाच पुढं जाऊन ब्रीज क्रॉसिंग करुन पुढे जा.तिथं बसस्टॉप आहे.मग त्याप्रमाणे घाईघाईने निघालो.बसस्टॉपवर बसची वाट पाहत एकतास गेला तरी तिथं बसकाही थांबेना..त्यामुळे कंटाळा आला.तिथचं एका माणसाला मला भांडुपला टिळकनगरला  जायच आहे.कुठं बस मिळेल.त्यावर त्याने, 'लोकल ट्रेनसे जाओ .'अस सांगितले.मला तर आता काही समजेना.माझी त्रेधातिरपीट उडाली.गोंधळून गेलो.ट्रेनने कसे जायचे याची खात्रीशीर माहिती नव्हती.आपण नेमका रस्ता चुकलोय .मग तिथल्याच एका जाणाऱ्या  रिक्ष...

प्रशिक्षण भारतीय संस्कृती क्रमशः भाग क्रमांक-१३२

Image
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌺साठवणीतल्या आठवणी शैक्षणिक प्रशिक्षण  भारतिय संस्कृती पिठम्  क.जे.सोमय्या विद्याविहार मुंबई 📖📖📖📖📖📖📖            सकाळी लवकर आठलाच तयार झालो. कॅटिनमध्ये उसळ पावचा नाष्टा करुन कॉलेजात आलो. आठ दहाजण उपस्थित होते. त्यांची ओळख करून घेताना श्री संजिवन जगदाळे बिदाल ता.माणचे भेटले आम्ही सातारचे आता तिघं झालो होतो.प्राचार्य कला आचार्य मॅडमनी दिवसभराच्या सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंतच्याकामकाजाची माहिती दिली. प्रशिक्षणाचा श्रीगणेशा परिपाठाने झाला. आमच्या अभ्यासाची सुरुवात  योगासनांच्या तासाने त्यात थेअरी व प्रात्यक्षिक असायचे. ते श्रीमती राजुल कवाडिया मॅडमनी घेतले .मग प्राचार्य कला आचार्य, श्री भातखंडे सर,सौ ललिता नामजोशी मॅडम, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची कन्या ,फादर बिशप डाभ्रे याशिवाय अनेक गेस्ट लेक्चरर यांनी भारतीय संस्कृती पिठम् या प्रशिक्षणात  मूल्य शिक्षणासाठी रामायण, महाभारत, वेदपुराण, उपनिषदे,संस्कृतभाषा,संगीत असे अनेकाविध भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य पूर्ण ग्रंथवैभव पहाता आले.ते ऐकायला चर्चा करायला संधी मिळाली....

सोमैया कॉलेज प्रथम दिन क्रमशः भाग क्रमांक १३१

Image
💫☘️💫☘️💫☘️💫☘️     साठवणीतल्या आठवणी शैक्षणिक प्रशिक्षण  सन१९९७-९८ ✒️📚सोमय्या कॉलेज विद्याविहार, मुंबई कॉलेजचा पहिला दिवस  〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ भाग क्रमांक-१३१ रातराणी वाई ते मुंबई ते परेल गाडीनं पहाटे साडेचारच्या दरम्यान भांडुपला थिएटरसमोरच्या थांब्यावर उतरलो.सचिनच्या पाठीमागून चालत निघालो.सर्वोदयनगरला चुलते पेईंग गेस्ट म्हणून राहतात त्यांच्या कडे निघालो होतो.एसपीएस मार्गावरील सर्वोदयनगरातील अभ्युदय बॅंकेच्या समोरील शरीफ मंझिल चाळीकडे निघालो. पाऊस बारीक बारीक पडत होता...दहा एक मिनीटानंतर मुख्य रस्ता सोडून एका छोट्या अरुंद वाटेने नाला ओलांडून रुमजवळ पोहोचलो.बेल वाजविल्याबरोबर लगेच दरवाजा उघडला.दोघांनी घरात प्रवेश केला. पाहुण्यांची ड्युडीला वेळेवर पोहोचण्यासाठी आवराआवर चालुच होती.तर किचनमध्ये स्वयंपाक सुरू असल्याचे वास आणि आवाजा वरून लक्षात आले.आमच्या आवाजानेकाका (कै सदाशिव लटिंगे) पोटमाळ्यावरुन खाली उतरले .मग आम्ही घरची आणि मुंबईच्या पावसाची चर्चा करीत बसलो.एव्हाना सचिन माळ्यावर विश्रांतीसाठी गेला.मला काकांनी,'आज कॉलेजमध्ये किती वाजता जायचय,'असं विचारलं.मी म्हणाल...