स्मृतींची पाखर पुनश्च अध्यापक विद्यालयात.

   













🍁स्मृतींची पाखर 
 पुनश्च अध्यापक विद्यालयात....
आज कितीतरी वर्षांनी माझ्या क्रांतिस्मृती अध्यापक सातारा येथील विद्यालयाच्या द्वितीय वर्गातील बॅकबेंचवर बसलो. व्यासपीठ,जिमखान्याच्या खिडक्या, जिना, होस्टेल आणि सभागृह...दोन वर्षांतील जडणघडणातील प्रमुख साक्षीदार असलेले आमचे अध्यापक विद्यालय..
 जिल्हास्तरीय साहित्यिक स्पर्धेच्या निमित्ताने एक स्पर्धक म्हणून स्वरचित कविता सादरीकरणात सहभागी होण्याची संधी मिळाली.अन् शिक्षक व विद्यार्थ्यांचे कथाकथन, भाषण आणि कविता वाचनाचे सादरीकरण ऐकता ऐकता आठवणींच्या हिंदोळ्यावर एकेक घटना प्रसंग नजरेसमोर तराळून येऊ लागले.
सुक्ष्मपाठ ते तीस मिनिटांच्या पाठाचे सादरीकरण करण्याची संधी.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण,वर्ग ग्रंथालय प्रमुख म्हणून केलेलं काम,क्रिडा स्पर्धा तसेच विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन,नियोजन व संयोजन,खोखो पंचपरीक्षा,तालुका स्तरीय खोखो सामन्यात पंचगिरी करताना घडलेला प्रसंग तर होस्टेलच्या गमतीजमती,पाक्षिक शाळेची तयारी,आदर्श पाठाची तयारी, तास सुरू असताना घडलेलं उस्फुर्त हास्यविनोद,अन् तास बोअर होऊ लागल्यावर सन्माननीय थोरात सरांचे मर्मभेदी हिंदी लोकप्रिय सिनेमाची गाणी सादरीकरण ....अन् बरंच काही नजरेस येत राहिले......
   बेंचवर बसून सिंहावलोकन करताना छात्र ते वरिष्ठ मुख्याध्यापक पदावर कार्य करण्यासाठी मिळालेला आत्मविश्वास, उर्जा आणि ज्ञान याच बेंचवर बसून श्रवण केले..... शतशः धन्यवाद क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालय सातारा....
फळाला येतो बीजाचा सारा संसार,
तसा शिक्षक घडवतो गुरुचा संस्कार,
विद्यालयातून घडले नवे मार्गदर्शक,
अध्यापकांचे हेच खरे योगदान फार!
 फक्त धडा नाही दिला त्यांनी,
जगण्याची वाटही दाखवली,
शिक्षक घडवणाऱ्या या विद्यालयाने,
आमच्या शाळेची खरी ओळख बनवली!
 छात्राचे शिक्षक घडविले,
ज्ञानाची मशाल पेटविली !!!
शतशः धन्यवाद आणि त्रिवार वंदन माझ्या अध्यापक विद्यालयास.....🌹🙏🏻

Comments

  1. खूपच छान वर्णन

    ReplyDelete
  2. खूप छान अनुभव ded college दिवस कविता आवडली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी