वाढदिवसाचे अभिष्टचिंतन...
आज माझा वाढदिवस सेलिब्रेशन आदर्श शाळा-माझेरी पुनर्वसन फलटण येथील निसर्गरम्य परिसरात अन् अविस्मरणीय सोहळ्यात साजरे झाले.
प्रारंभी शिक्षकवृंदानी औक्षण करून अभिष्टचिंतन केले.तदनंतर शाळेतील व अंगणवाडीतील छोट्यामुलांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा झाला.
इयत्ता पहिलीतील नवागत श्याम बिराजदारचे शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत केले.इयता पहिली दुसरीचे सर्व मुले वाढदिवसाची कॅप व फळांचे मास्क घालून शुभेच्छा द्यायला तयार झाले होते.सर्व मुलांना सफरचंदाचा खाऊ व केक दिला.शाळेतील सर्व सहकारी शिक्षकांनी बुके आणि रिस्टवॉच सप्रेम भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या... या क्षणाचे औचित्य साधत शाळेसाठी एक लोखंडी कपाट सस्नेह भेट दिले.... कायम आठवणीत राहील असा 57 वा वाढदिवस..
##############कृतज्ञतापूर्वक आभार!!!
🌹🌸*आज १२ सप्टेंबर, माझा वाढदिवस... नेहमीप्रमाणेच 'रवी' उगवतीस नवी लाली क्षितीजावर पसरवत प्रकाशमान होऊ लागला, अन् दूरभाष खणाणता झाला... प्रत्यक्षपणे, भ्रमणध्वनीवरून अन् फेसबुक नि व्हाॅटस्अॅपद्वारे शब्दसुमनांच्या वर्षावात आपल्या शुभमंगल आशिर्वचनरूपी मायेची ऊब चित्रातून,लिखित अन् संवादातून हितगुज साधत अंतःकरणात सामावत ऊर्जा मिळत राहिली. आपल्यासारख्या महनीय व्यक्तींच्या शुभाशिषांची लाभलेली ही साथ नेहमीच प्रेरणादायी, दिशादर्शक ठरते, जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करण्यास नवे बळ देऊन जाते.*
*फिरूनी यावा सुदिन हा*
*नाती जन्मांतरांची...*
*लाभो नित्य नूतन मज*
*ऊब शुभाशिषांची...*
*आपल्या प्रेममय आपलेपणाच्या भावनेतील शुभेच्छांनी खरंच आज मी सद्गदित झालो आहे, आपले प्रेम असेच सदैव लाभत राहील, असा मला ठाम विश्वास आहे. अठ्ठावनव्या वर्षात प्रवेश करताना आपल्या ऋणाईत राहून, ऋणानुबंध जपत जीवनपथावर अग्रेसर राहण्यात निश्चितच एक वेगळा आनंद ऊरात सामावल्याचे जाणवले. आपल्या प्रेममयी शुभेच्छांबद्दल आपणांस त्रिवार मन:पूर्वक हृदयस्थ धन्यवाद...*🌹🙏🏻
*नातीगोती मला न कळती,*
*मला न माहीत कोण कुणाचा...*
*कळते मजला एवढेच की,*
*सगळे माझे अन् मी सगळ्यांचा...*
*आपला कृपाभिलाषी*
*श्री रविंद्रकुमार लटिंगे
मुख्याध्यापक आदर्श शाळा माझेरी...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment