पुस्तक परिचय क्रमांक:२३९ परवचा
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२३९
पुस्तकाचे नांव-परवचा
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण, डिसेंबर ,२०१८
पृष्ठे संख्या–१८६
वाड़्मय प्रकार- कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१७०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२३९||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-परवचा
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
परवचा म्हणजे केवळ पाढे,श्लोक,सुत्रे, कविता पाठांतर नसून दिनक्रमातील एखाद्या घटनेवर सायंकाळी मारलेल्या गप्पागोष्टी.ज्याने १८३१मध्ये मराठी -इंग्रजी असा शब्दकोश प्रसिद्ध केला त्याने परवचा म्हणजे ‘‘THE EVENING RECITATION OF SCHOLARS’’
म्हणजे विद्वानांचे सायंकाळचे वाचन होय.
दिवसभराच्या विविध वर्तमानपत्रातील ब्रेकिंग न्यूज असणाऱ्या महत्वाच्या बातमीतील आशय घेऊन लिहिलेल्या लघुकथा.
एक कथा म्हणजे दैनंदिन जीवनात एक उदाहरण,एक विचार अन् संस्करण. मनात विचार मंथन होणारच.सोदाहरण स्पष्टीकरण करत नेमकेपणाने विचार करायला लावणाऱ्या कथा अगदी जगरहाटीतील साधी गोष्टही कथेतून शब्दबध्द केली आहे.
‘परवचा’ हे सदर लोकप्रिय असलेल्या दैनिक लोकसत्तात कथाकार व दिग्गज लेखक श्री.व्यंकटेश माडगूळकर यांनी शब्दबध्द केलेल्या लघुकथांचा संग्रह ‘परवचा’. समर्पक शब्दात नेमका विचार त्यांनी या कथेतून मांडला आहे.नियमित पेपर वाचकांना बातम्यासोबत कालच्या महत्वाच्या बातमीची कथा या सदरातील लेखन आवडेल अश्याच सगळ्या कथा आहेत.मध्यवर्ती संकल्पना बातमी प्रधान ठेवून तयार केलेलं सर्जनशील लेखन व्यंकटेश माडगूळकर असतं.हे यातील कथांमधून समजते.बातम्यांच्या शब्दवारुळा प्रमाणेच काही कथांचे विषय कष्टाची कामे करताना.स्वता:च्या ग्रंथालयातील पुस्तकांची धुळ झटकत पाने चाळताना त्यांना विषय लक्षात आले; त्याची लघुकथा निर्माण केली आहे.
व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखनाचे मर्म विविध सामाजिक, नैसर्गिक आणि मानवी आयुष्यावर आधारित लघुकथेत आहे. माडगूळकरांनी आपल्या ग्रामीण अनुभवाचा आणि मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण या कथांमध्ये केलेला आहे. कथांचे विषय आणि विचार पटवून देताना उदाहरणे व दाखले यांचा समर्पक समावेश लघुकथेत केलेला आहे.तसेच ग्रामीण व शहरी भाषेतील शब्दसंपत्तीचा खजिना या कथांतून मिळत राहतो.
परवचा कथासंग्रह त्यांनी दिग्दर्शक श्री.अनंत माने यांना समर्पित केला आहे कारण माझे लेखन असंख्य प्रेक्षकांसमोर आणणारे ते आहेत. जवळपास त्र्याहत्तर लघुकथांचा हा कथासंग्रह अतिशय वाचनीय आहे. छोट्याशा सामाजिक बातमीचा धागा पकडून कथा छानच गुंफलेल्या आहेत. संदर्भासाठी सोदाहरण दाखले व उदाहरणे देऊन कथेच्या आशयाला बळकटी दिली आहे.अनेक नवनवीन माहिती कथेचा आस्वाद घेताना आपल्याला मिळत जाते.आपले शब्दभांडार वाढत राहते.
ग्रामीण जीवनाचं चित्रण या कथांतून उलगडत जाते.महाराष्ट्रातील गावाकडील लोकजीवन, त्यांची साधी-भोळी वृत्ती आणि निसर्गाशी असलेलं नातं यातून जाणवतं.तसेच भावभावनांची विविधता आनंद, दुःख, हळवेपणा, विनोद, खटके, संघर्ष – मानवी भावनांचं अप्रतिम दर्शन.
या कथांमधील सहज आणि प्रवाही भाषा सोप्या पण जिवंत भाषेत माडगूळकरांनी कथा रंगवल्या आहेत.यातील काही लोकाभिमुख व्यक्तिरेखा खूप वास्तववादी,जिवंत आणि आपल्या आसपासच्या माणसांसारखी भासतात.
बऱ्याच कथांचे बीज निसर्गाचे सौंदर्यावर भाष्य करत सह्याद्री पर्वत, डोंगरदऱ्या, पावसाळा,शेती, वाड्या आणि वस्ती यांचं जिवंत चित्रण.सगळ्याच कथा अतिशय उत्तमरीत्या मांडलेल्या आहेत. प्रत्येक कथा म्हणजे एक वैचारिक संदेश.या कथा यापूर्वी दैनिक वर्तमानपत्रात छापून आलेल्या आहेत.
वर्तमानपत्रातील ब्रेकिंग न्यूज हा कथाचा मुख्य आशय.या आशयावर लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी कथा तयार केलेल्या आहेत.अप्रतिम व वाचनीय कथासंग्रह आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- ८ सप्टेंबर २५
Comments
Post a Comment