पुस्तक परिचय क्रमांक:२४१ हे जीवना रिलॅक्स प्लीज



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२४१
पुस्तकाचे नांव-हे जीवना, रिलॅक्स प्लीज!
लेखक : स्वामी सुखबोधानंद
प्रकाशन-प्रसन्ना ट्रस्ट,बॅंगलोर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण, ऑक्टोबर,२००३
पृष्ठे संख्या–२५५
वाड़्मय प्रकार- कादंबरी 
किंमत /स्वागत मूल्य-१२५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२४१||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव-हे जीवना, रिलॅक्स प्लीज!
लेखक:स्वामी सुखबोधानंद 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
 अकल्पित घटनांना सामोरे जाताना तणावमुक्त जीवन कसं जगावं.हे पटवून देणारं पुस्तक.योगिक विद्वत्तेतून जीवनाचे व्यवस्थापन कसे करावे?याची माहिती करून देणारं,विक्रीचा उच्चांक प्रस्थापित केलेलं, ‘हे जीवना, रिलॅक्स प्लीज!’ हे पुस्तक स्वामी सुखबोधानंद यांनी त्यांना आलेले अनुभव शब्दात मांडले आहेत.
सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.पण त्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलायला लावणारं हे पुस्तक आहे. बुद्ध,येशू ख्रिस्त,श्रीकृष्ण, सुफी,ताओ आणि झेन यांच्या विचारांची सद्सद्विवेक बुध्दीने अलौकिक दिव्यत्वाची प्रचिती करून देणारं अप्रतिम पुस्तक आहे.आपले दैनंदिन सामाजिक जीवन जगताना येणाऱ्या ताणतणावांपासून मुक्ती देणारे पुस्तक आहे.सुखी जीवनाची वाटचाल सुरू असताना आलेल्या दुःखद प्रसंग सामोरे जावे लागते.ते जाणून घेण्यासाठी 
या पुस्तकातील संस्कार आचरणात ‌आणायला  लावणारं पुस्तक.
दिमाखदार आणि चित्ताकर्षक मुखपृष्ठ तर
सिनेजगतातील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या शुभहस्ते इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्याचे रंगीत छायाचित्र तसेच मलपृष्ठावरील मान्यवरांचे अभिप्राय पुस्तकातील आशयाची महती उठावदार करतात.
स्वामीजींचा जीवन संदेश अद्वितीय आहे. कुठल्याही वयाच्या,लिंगाच्या, उद्योगाच्या वा व्यवसायाच्या अथवा कोणत्याही दर्जाच्या व्यक्तीकरीता हे पुस्तक परायण म्हणजे योगविद्येची अनुभूती आहे. आजच्या स्वैराचारी,व्यसनी आणि भौतिक सुखात मश्गूल झालेल्या तरुणांना हे पुस्तक म्हणजे जीवनाचा परिसस्पर्श आहे.
जीवनामध्ये दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा द्यायला शिका,हे माझे न म्हणता आपलं म्हणून इतरांची सेवा करणे हेच कल्पक बुद्धीचे लक्षण आहे.जेव्हा कल्पकतेसाठी कार्य कराल तेंव्हाच तुम्हाला समाधान मिळेल.असे जीवनाला उपयोगी पडणारे अनेक दृष्टीकोन स्वामींनी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत.
‘हे जीवना, रिलॅक्स प्लीज’या पुस्तकाचे अध्ययन करा,मनन आणि चिंतन केले तर तुम्हाला समाधानी आणि आनंदी जीवन उपभोगत जगात असे स्वामी सुखबोधानंद यांचे विचार आहेत.
चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेते चिरंजीवी यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे.“जग पराजयाला क्षमा करेल,पण संधीचा योग्य फायदा करून न घेणाऱ्या व्यक्तीला मात्र कदापी क्षमा करणार नाही.” ते म्हणतात की, “विचारांना चालना देणारी अनेक नीतीवचने या पुस्तकातील लेखात समाविष्ट केली आहेत.अतिशय गुंतागुंतीची वेदांतिक सत्ये,साखरेत घोळलेल्या औषधाच्या सुमधुर गोळीसारखी सहज सुंदर सोप्या भाषेत निरुपण केले आहे. महत्वाची वचने मनावर बिंबवण्यासाठी गोष्टी समर्पक शब्दात सांगितल्या आहेत. प्रत्येक लेखातील विचारांचे सौंदर्य मनन करायला ज्ञानयोग आणि कर्मयोगाचा सिध्दांत मांडला आहे.
 या पुस्तकात खरं तर कथावृत्तांत आहे. आयुष्यात पदोपदी घडलेले सत्य प्रसंग भावस्पर्शी असून उद्बोधक गोष्टींच्या स्वरूपात मांडले आहेत.ते वाचताना वाचक रसिकांच्या हृदयाला जाऊन भिडतात.या पुस्तकातील शब्दांना मधुरतेचा आनंद आहे.
    लेखक स्वामी सुखबोधानंद यांनी आयुष्य तणावरहित मजेत कसं जगावं म्हणजे शहाणपण येईल.केवळ अध्ययन करण्यासाठी हे पुस्तक नसून यातील कथा  चिंतन करायला उद्युक्त करणाऱ्या आहेत.हे पुस्तक प्रार्थनेसारखं पुन्हा पुन्हा वाचा.
कथनांतील दृष्टांत जाणीव निर्माण करून 
काळोख्या क्षणी तुमचं मन हलके करून मित्रासारखं समुपदेशन करणारं हे पुस्तक आहे. तुमच्या अंतर्मनाचा वेध घेणारं हे पुस्तक आहे.
‘हे जीवना रिलॅक्स प्लीज' या पुस्तकात पंचेचाळीस लेख गोष्टीरूप असून चिंतन आणि मनन करणारे आहेत.या अशांत आणि निर्दयी जगात मन:शांती कशी राखावी?या प्रश्नाचे उत्तर शोधणं म्हणजे हे
पुस्तक पठन करणं.आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण करणारं लेखन या पुस्तकात आहे.कठोर शब्द जहाल विषासारखे असतात.ते जीवन दुषित करतात. चारचौघांशी सुसंवाद साधण्याची कला म्हणजेच यशाकडे नेणारा राजमार्ग होय. अज्ञानातून उपजलेला विचार म्हणजे दैत्याने टाकलेला गळच.अविचार दुरावा निर्माण करतात तर प्रेम एकसंघता आणते.क्षमाशील वृत्तीचे हृदय सर्वांनाच प्रिय असते.चिकाटी आणि श्रध्दा हीच आपल्याला लाभलेली फार मोठी संपत्ती आहे…अशी अनेक वचने उद्बोधक गोष्टीतून स्वामींनी व्यक्त केली आहेत..
जीवन ताण विरहित जगण्याचं तत्त्वज्ञान उलगडून दाखविणारं पुस्तक खूप छान आहे.हरेक लेख चिंतन आणि मनन करायला उद्युक्त करणारा आहे.आपणही या पुस्तकाचे पारायण करावं इतकं चांगलं आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
दिनांक:३ऑगस्ट २०२५




Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी