पुस्तक परिचय क्रमांक:२४० बंद दरवाजा
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२४०
पुस्तकाचे नांव-बंद दरवाजा
लेखिका : अमृता प्रीतम
अनुवाद -प्रतिभा रानडे
प्रकाशन-श्रीविद्या प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण, ऑक्टोबर,२०१९
पृष्ठे संख्या–९८
वाड़्मय प्रकार- कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२४०||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-बंद दरवाजा
लेखिका: अमृता प्रीतम
अनुवाद -प्रतिभा रानडे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
📚
पंजाबी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या लेखिका, कवयित्री अमृता प्रीतम. भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक सेवेबद्दल ‘पद्मश्री’पुरस्काराने सन्मानित केले असून,साहित्य अकादमीच्या पारितोषिक विजेत्या सुपरिचित लेखिका आहेत.
त्यांच्या साहित्यात स्त्रीचे अंतरंग उलगडून दाखविणारे त्यांचे सगळे साहित्यिक लिखाण आहे.तिच्या मनीचा ध्यास,तिला घरीदारी होणारा जाच, भोगायला लागणारी दु:खंत हाल अपेष्टा आणि अधांतरी जीणं त्यांनी उलगडून दाखविले आहे.महिलांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीला त्यांची कादंबरी म्हणजे चपराक आहे.
ऋणानुबंध जपण्यासाठी तमाम बायकांच्या मनात जो भावनिक कल्लोळ उठतो.त्यातून मार्गक्रमणा करायला स्वता: धडपडत लागतं.हिंदी कादंबरी वाचून अनुवादक प्रतिभा रानडे अस्वस्थ झाल्याचे नमूद करतात.आणि लेखिका अमृता प्रीतम यांनी विचारताच ते स्पष्ट सांगतात.की ही कादंबरी मला मराठीत अनुवाद करायची आहे…
“मुकेपणाच्या आभाळात एक वादळ दडलेलं होतं.त्या आभाळातले मेघ पाण्यानं ओथंबलेले होते.”याच जन्मात ती मुलगी जणू आई झाली. आणि तिची आई तिची मुलगी झाली.आपल्या मनातला उदासपणा हसण्याच्या वाटीत घालून ती त्याचा घोट घोट पिऊ लागली…दु:खाचा आवेग सहन करणाऱ्या किती सार्थ ओळी आहेत. ‘बंद दरवाजा’या हिंदी कादंबरीचे अनुवादन प्रतिभा रानडे यांनी मराठीत केले आहे.
"बंद दरवाजा'' या कादंबरीची नायिका महिलाच आहे.कमला आपल्या आईला (ताराला)त्रास देणाऱ्या पित्याच्या घरात राहू इच्छित नसते.कारण बाप सतत आईचा छळ करीत असतो.
गारठ्याच्या दिवसात एका रात्री नवऱ्याने बायकोला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले.ती विनवण्या करत होती. पण तिला घरात घेतले नाही.त्यावेळी कमा अचानक दचकून जागी झाली.तिला वाटलं स्वप्न आहे.पण घराबाहेरची किंकाळी तिनं ऐकली आणि वडिलांना न जुमानता तिनं आईला उचलून घरात आणले.तिचे शरीर थंडगार पडले होते. कमानेच डॉक्टरला बोलवून औषधोपचार केला.गारठा शरीरात भिनल्यामुळे निमोनिया होऊन आईने कमाला पोरकं केलं. वडिलांचे ते छळणं बघून ती उदासीन झाली.अन् होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेऊ लागली त्या कमाची ही कहाणी ‘बंद दरवाजा.’तिला समजून घेणाऱ्या होत्या, फक्त गावच्या शाळेच्या प्रिन्सिपल मदन मॅडम.त्यांचे कांग्रा खोऱ्यातील पहाडी भागात सैनिकांच्या मुलांसाठी एक शाळा काढायची असते.ते स्वप्न कमलाने ऐकलेले असते.त्यामुळे दोघींच विचार पटतात. मॅडम कमलाला लेकीचं प्रेम देतात. कालौघात त्यांचे स्वप्न पूर्ण होते.मग त्याच कमला हायस्कूल मध्ये ती नोकरी करते.
दोघी मैत्रिणींनी कमला आणि पालचा तोंडी साखरपुडा केलेला असतो.त्यामुळे सत्यपाल कांग्राच्या शाळेत येऊन तिच्या बरोबर लग्नाची बोलणी करतो.थोड्याच लोकांच्या उपस्थितीत शाळेतच लग्न लागते.लग्नझाल्यावर पाल आणि कमला जालंधरल रहायला जातात.छोट्याश्या खोलीत संसार सुरू झालेला.पण एका दुपारी पालवर प्रेम करणारी शिला खोलीवर येते. दोघांच्यात गप्पा होतात. शिला कमलाला माझं पालवर प्रेम असून त्याचा अंकूर माझ्या पोटात वाढतोय.हे समजल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते.मग पाल घरी आल्यावर त्यांच्याशी बोलून त्याच रात्री शीला आणि पालचं लग्न लावून देते.आणि अवघ्या पंधरा दिवसांनी आपला संसार उद्धवस्त करून पुन्हा मदन मॅडमच्या शाळेत येते.
किती दु:ख सहन करुन तिथं ती रहात असते.
काही दिवसांनी पत्रकार असणारा सुमेश दांडीत असताना आजरी पडतो.त्याची काळजी घेण्यासाठी मॅडमला स्टेशन मास्तरने चिठ्ठी दिलेली असते.ती कमलाला मिळते.मग त्याची सेवासुश्रुषा ती करते. दोघांनाही पुस्तके वाचण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची आवड यातूनच दोघांचे सूर जुळतात आणि ती आपलं शरीर त्याच्या स्वाधीन करते.
ते दोघं दिल्लीतल्या एका खोलीत संसार थाटतात. तो नोकरीच्या शोधात असतो. त्याच्या घरच्यांना लग्न झालेले माहित नसतं.दरम्यान त्याचे वडील त्याला भेटायला येणार असतात.त्यामुळे तो गप्प.
असाच एके दिवशी तो कमलाला इथं न राहता तुझी दुसरीकडे व्यवस्था करतो.असं म्हटल्यावर तिच्यावर आभाळ कोसळतं.सगळ्या वेदना सहन करत ती पोटातल्या अंकुरासाठी वेगळं राहायला मान्यता देते.
दुसरीकडं तिची एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती.पण तिथं तिचं मन रमत नाही.पुनश्च ती हायस्कूलकडे येते.झालेली कहाणी मदन मॅडमला सांगते.त्यावेळी त्या म्हणतात की,”माझ्या मनाची दारं तुझ्यासाठी सदैव उघडी आहेत.”सुमेशचा दरवाजा बंद झाला.तसेच वडिलांचा दरवाजा तर अगोदरच बंद होता.मग मॅडमनी तुझं सामान आणलं नाहीस?असा प्रश्न विचारताच ती म्हणते, “रिकाम्या हाताने नाही आले.जे तिथं ठेवणं अशक्य आहे ते सोबत घेऊन आलेय.”मग मॅडमनी तिच्या कमलाच्या अंगावरून नजर टाकली तेव्हा लक्षात आलं की ही हिच्या उदरात अंकूर दिसतोय.मग कमला म्हणाली, “स्त्रिची कूस उजवल्याशिवाय रहात नाही ना,जर स्त्री वांझोटी राहिली तर आयुष्यभर टक्केटोणपे कसे सहन करायचे?
अशी वेदनेचा हुंकार देणारी कमलाची दर्दभरी कहाणी ‘बंद दरवाजा’.
@परिचयक- श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २७ जुलै २०२५
Comments
Post a Comment