पुस्तक परिचय क्रमांक:२१९ मन सांधते आभाळ

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२१९ पुस्तकाचे नांव-मन सांधते आभाळ कवयित्री:सौ.मनिषा शिरटावले प्रकाशन-प्रणीत प्रकाशन, सातारा प्रकाशन वर्ष व आवृत्ती -प्रथमावृत्ती २०२१ पृष्ठे संख्या–१०० वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २१९||पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव: मन सांधते आभाळ कवयित्री:सौ.मनिषा शिरटावले 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 “कविता म्हणजे अंतर्मनाच्या चिंतन मंथनातून बाहेर पडलेला सौंदर्यगर्भ असा उद्गार! ही सहज साधना नव्हे, त्यासाठी चिंतनऊर्जेचा दाह सहन करावा लागतो. तेंव्हाच त्या अक्षरांच्या चित्रलिपीला प्राणसत्वासह अक्षरत्व प्राप्त होतं.शब्दांची विटकळं रचून कवितेचे किल्ले बांधता येत नाहीत.”किती अप्रतिम!काव्याचे सौंदर्यक विचार मांडले आहेत. असाच एक संवेदनशील कवयित्री मनिषा शिरटावले यांनी आपल्या मनातील विचारतरंग अक्षरधनात गुंफले आहेत. “मन सांधते आभाळ”या संग्रहात.किती सुंदर शिर्षक आहे.जणू काही माझ्या मनातील विचारांनी आभाळाला एकसंघ करण्य...