पुस्तक परिचय क्रमांक:१९९ त्रिशंकू
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा पुस्तक परिचयाने साजरा करुया.....
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-१९९
पुस्तकाचे नांव-त्रिशंकू
लेखकाचे नांव--सुधा मूर्ती
अनुवादक -लीना सोहोनी
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती, फेब्रुवारी २०१९
एकूण पृष्ठ संख्या-१९०
वाङ् मय प्रकार --कथासंग्रह
मूल्य--१९०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚 📚📚
१९९||पुस्तक परिचय
त्रिशंकू
लेखक- सुधा मूर्ती
अनुवादक -लीना सोहोनी
#########################
विख्यात समाजसेविका, ख्यातनाम लेखिका आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’
च्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी ‘THE UPSIDE DOWN KING’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद ‘त्रिशंकू’या पुस्तकात केला आहे.
भारतीय संस्कृती ईश्वराच्या अवतारातील देवतांना भारतीय आपल्या आयुष्यात परमस्थानी मानतात.भगवान श्री प्रभु रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या देवदेवतांना मानणारे अगणित लोकं आहेत.आपण दरवर्षी देवदेवतांचे सणउत्सव मोठ्या आनंदाने साजरे करतो.त्या देवादिकांच्या आयुष्याशी नातं असलेल्या धार्मिक तिर्थक्षेत्रांचे आपण तिर्थाटने करतो.विविध पवित्र स्थळांना भेटी देतो.श्रीराम आणि श्रीकृष्ण देवतांच्या अप्रचलित कथांचे भांडार लेखिका सुधा मूर्ती यांनी‘त्रिशंकू’ या धार्मिक ग्रंथात कथा स्वरुपात प्रकाशित केले आहे.
परदेशात आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी सतत कार्यरत राहणारे श्री.मत्तुर नंदकुमार यांना हा ग्रंथ समर्पित केला आहे.या पुस्तकाचा अनुवाद लीना सोहोनी यांनी मराठीत केला आहे.
श्रीरामांचा जन्म त्रेतायुगात झाला.प्रभु रामचंद्र यांच्या कथांचा समावेश अनेक तैलचित्रांमध्ये, साहित्यात,नृत्य आणि संगीतात करण्यात आलेला आहे. रामायण हे महाकाव्य आहे.ते अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.तसेच विविध नावांने प्रसिद्ध आहे.प्रभुरामचंद्रांना लोक पुरुषोत्तम मानून त्यांची पूजाअर्चा करतात.रामराज्य एक आदर्श राज्य होते.धर्मनिष्ठ,दयाळू आणि लोककल्याणकारी राजे होते.
भगवान श्रीकृष्ण हे प्रभुरामचंद्रांपेक्षा विलक्षण वेगळे होते.ते द्वापार युगातील. महाभारतात धनुर्धारी अर्जुनाच्या रथाचे सारथ्य त्यांनी केले होते.पांडवांशी त्यांचे आगळंवेगळं मैत्रीचं नातं होतं.तसेच भागवत कथेत विस्ताराने श्रीकृष्णांची माहिती प्रस्तुत केलेली आहे.श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याकडे केवळ देव म्हणून न पाहता त्यांच्यातील माणूसपण कसं होतं, त्यावर प्रकाशझोत टाकण्याच्या इच्छेतून त्यांनी संशोधन करून पुस्तकरूपाने कथा प्रसिद्ध केलेल्या आहेत.असं त्यांनी प्रस्तावनेच्या समारोपात नमूद केले आहे.
रघुनंदन प्रभु रामचंद्र यांच्या पंधरा कथांची मालिका आहे.सूर्यवंश, वारुळातला माणूस,काळाचं मोजमाप, स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत, त्रिशंकू,वचनाचं वचन,सुवर्णवृक्ष,रावण- एक विचित्र राक्षस, देवाच्या वाटेला कोणी जाऊ नये, हनुमान,वाळूचे पिंड आणि पाच साक्षीदार,नाममहात्म्य,रामाचा अंत,काल प्रवास आणि देशोदेशीच्या रामायणाच्या कथा वाचनीय आहेत.
कृष्णं वंदे जगद्गुरु श्रीकृष्णाच्या दहा अपरिचित कथांचा समावेश केला आहे. चंद्रवंश,रत्नापासून सुवर्णनिर्मिती, कृष्ण आणि त्याचे शत्रू, आंधळ्या आजीचा दृष्टांत,स्वप्नात वरलेला पती, कृष्णाच्या राण्या, साडेतीन रत्नं,थुंकणारा राक्षस, उदंक ऋषी आणि श्रीकृष्णाचा अंत..
‘त्रिशंकू’कथासंग्रहातील कहाण्या श्री भगवान विष्णूंच्या दोनअवतारांच्या आहेत.प्रभु रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे ते अवतार!अक्षरशः अगणित कथा प्रभु रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांच्या उपलब्ध आहेत .
पण त्यातल्या त्यात कित्येक कथा आजच्या तरुण पिढीच्या कधी कानावर अथवा वाचण्यात आलेल्या नसतील.तर काही कथा विस्मृतीच्या पडद्याआड गेल्या आहेत.ख्यातनाम कथालेखिका सुधा मूर्ती वाचकांना अशाच सुरस, अपरिचित आणि चमत्कृतीपूर्ण प्रवासाला घेऊन जातात.या
प्रवासात मनुष्य प्राण्यांबरोबर देवदेवता आणि
राक्षसही वाटचाल करताना दिसतात. प्राणी माणसांसारखे बोलतात आणि देवदेवता सर्वसामान्य माणसांना मोठमोठे वरही देतात.शाप देतात अन् उ:शाप देतात.
या कथांमधून काही निवडक शब्दांचा नेमका अर्थ आणि त्याचे स्पष्टीकरण समर्पक शब्दात करुन दिलेले आहे. तसेच आपणास माहित नसलेल्या काही अप्रचलित कथा आपल्या ज्ञानात मोलाची भर टाकतात.अतिशय सुंदर कथासंग्रह आहे.
परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक:१६ जानेवारी २०२५
समर्पक शब्द मांडणी👌
ReplyDeleteधन्यवाद! आभारी आहे.
ReplyDelete