Posts

पुस्तक परिचय क्रमांक:११५ उजेड अंधाराचं आभाळ

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-११५ पुस्तकाचे नांव-उजेड-अंधाराचं आभाळ (फिरस्ती) लेखकाचे नांव-उत्तम कांबळे प्रकाशक- सकाळ प्रकाशन प्रकाशन वर्ष व आवृत्ती-दुसरी आवृत्ती/ डिसेंबर २०१७ पृष्ठे संख्या--११२ वाड़्मय प्रकार-ललित  किंमत /स्वागत मूल्य--१४०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 ११५||पुस्तक परिचय            उजेड-अंधाराचं आभाळ लेखक:उत्तम कांबळे ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 ''आभाळ अनेक आकारांचं असतं… मोकळं आभाळ,पावसाच्या ढगांनी भरलेलं आभाळ, वांझोटे ढग गोळा करणारं आभाळ, कोणत्याही क्षणी डोक्यावर कोसळणारं आभाळ वगैरे वगैरे.डोक्यावर सतत तोल सावरत राहिलेल्या आभाळाला किती किती नावं दिली आहेत….  फिरस्ती करताना मलाही वेगवेगळी आभाळं बघता आली व माणसांच्या जगातलं आभाळ.. ते कधी वेदनेने भरलेलं तर कधी मस्तीत आलेल्या मोराला नाचण्यासाठी जागा देणारं… ते कधी कोडानं भरलेलं तर कधी सौंदर्य स्पर्धेत जाऊन आल्यासारखं...कधी फक्त उजेडानं  भरलेलं तर कधी आपल्या शरीरावर फक्त अंधार आणि अं...

अक्षर नक्षत्र' दिवाळी अंक लेखन प्रसिध्दी

Image
शिक्षण विभाग पंचायत समिती वाई आयोजित नवोदित लेखक व कवी मनाच्या प्राथमिक शिक्षकांच्या 'अक्षर नक्षत्र ' २०२२ या दिवाळी अंकाचे  प्रकाशन करताना गटविकास अधिकारी श्री नारायण घोलप, सहायक गटविकास अधिकारी श्री महेश कुचेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप यादव , गटशिक्षणाधिकारी श्री सुधीर महामुनी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री साईनाथ वाळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री विष्णू मेमाणे ,शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री सहदेव फणसे व  श्री राजेन्द्र दगडे, संपादिका सौ.निर्मला भांगरे मॅडम आणि संपादक मंडळ सदस्य, केंद्रप्रमुख, राजेन्द्र गायकवाड, विठ्ठल माने, रविंद्र बाबर, नवोदित कवी व लेखक, शिक्षकमित्र बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत दिवाळी अंक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यातील माझी भटकंती "कोंढावळे मुरा" या लेखास तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह,पुस्तक व दिवाळी अंक देवून गौरविण्यात आले.सर्वांचे मनस्वी आभार व धन्यवाद......  माझी भटकंती  कोंढावळे मुरा  दिनांक १९ फेब्रुवारी २०२१      कोंढावळे गावाच्या तिन्ही बाजूंनी विळखा घातलेल्या सह्याद्री पर्व...

पुस्तक परिचय क्रमांक:११४ वळीव

Image
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य  परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई  पुस्तक क्रमांक-११४  पुस्तकाचे नांव--वळीव  लेखकाचे नांव--शंकर पाटील प्रकाशक-मेहता पब्लिकेशन्स हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण डिसेंबर २०२१ एकूण पृष्ठ संख्या-१५० वाङ्मय प्रकार --कथासंग्रह मूल्य--१५०₹ 📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖        ११४|पुस्तक परिचय             वळीव  लेखक--शंकर पाटील  🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾----------------------------------------------- वैशाख वणव्याने अंगाची लाही लाही होत असते.नरड्याला सारखा सोक पडतो. ऊनाच्या काहिलीनं  छपरात नाहीतर घरातल्या पडवीत गप्प पडावं लागतं. रानवाटेतल्या फुफाट्याने सगळा धुरळा उडत असतो.झाडांच्या पानांवर धुळीचं किटाण बसलेलं असतं.भेगाळलेल्या जमिनीला तृष्णेची आस लागलेली असते. नदीनालीकोरडी ठणठणीत पडलेली असतात. सगळ्यांच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या असतात.अन् अचानक सोसायट्याचा वारा वाहू लागतो.आभाळ भरुन येते.आणि ढगांचा कडकडाट करत  टपोऱ्या गारांचा वर...

पुस्तक परिचय क्रमांक:११३ कलाकार

Image
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य  परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई  पुस्तक क्रमांक-११३  पुस्तकाचे नांव--कलाकार  लेखकाचे नांव--रा.अ.कुंभोजकर प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती अॉक्टोंबर २०१६ एकूण पृष्ठ संख्या-१०२ वाङमय प्रकार ----ललित लेखसंग्रह मूल्य--१४०₹ 📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖        ११३|पुस्तक परिचय             कलाकार  लेखक--रा.अ.कुंभोजकर 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾 नाटक सिनेमातील चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व लाभलेले चित्रतपस्वी कलेतील भीष्माचार्य, अभिनेते,अभिनेत्री,गायक,नाटककार, दिग्दर्शक,नाटक व चित्रपट कंपनीचे मालक असलेल्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या सर्जनशील मनांचा व्यक्तिवेध 'कलाकार' या माहितीपटात संपादक व पत्रकार रा.अ. कुंभोजकर यांनी करून दिलेला आहे. रा.अ.कुंभोजकरांचा हा व्यक्तिचित्रसंग्रह असून चित्र व नाट्यक्षेत्रातील नामवंत कलाकारांचा कर्तृत्वपट उलगडून दाखविण्याचे कार्य आत्मीयतेने व रसिकतेने केले आहे. ज्ञानपीठ पारितोषिकाने सन्मानित के...

जिव्हेश्वर जन्मोत्सव २०२२

Image
भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव वाई येथे संपन्न  समस्त साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव विविध उपक्रमांनी स्वकुळ साळी समाज वाई येथील बांधवांनी साजरा केला.सुर्योदयापुर्वी ,पूजा, पाळणा,आरती आदी कार्यक्रम संपन्न झाले.दुसऱ्या सत्रात  देशासाठी शहीद झालेल्या वीरांना व ज्ञात- अज्ञात कलाकार, समाजसेवक व समाज बांधवांना श्रध्दांजली अर्पूण गुणगौरव सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक श्री रवींद्र लटिंगे यांनी केले.प्रमुख अतिथी व महाप्रसादाचे मानकरी सौ.निलिमा व श्री. महेंद्र शंकरराव धेडे व श्री दत्तात्रेय मर्ढेकर यांचे स्वागत अध्यक्ष श्री भास्करराव कांबळे यांनी केले. तद्नंतर कलाविष्कार रेकॉर्ड डान्स  दिशा कोदे, ज्ञानदा दाहोत्रे यांनी बहारदार सादर केला.श्रेया पोरे हिने उत्कृष्ट वक्तृत्वाची झलक सादर केली.तदनंतर स्पर्धापरिक्षेतून न्यायाधिश पदी निवड झालेल्या कु.मैथिली प्रकाश मर्ढेकर , ओझर्डे व बावधन येथील पोलीस पाटील पदी नियुक्त झालेल्या श्री.मयूर कोदे व सौ.अश्विनी संजय हावरे ,उत्कृष्ट एम.एस.सी.आय.टी. केंद्राच्या संचालिका सौ.वनिता अजित हावरे आणि जिल्हास्त...

पुस्तक परिचय क्रमांक:११२ गोष्ट हातातली होती.

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,  वाई पुस्तक परिचय क्रमांक-११२ पुस्तकाचे नांव--गोष्ट हातातली होती! लेखकाचे नांव-- व.पु.काळे प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण जानेवारी २०२० वाड़्मय प्रकार--कथासंग्रह पृष्ठे संख्या-१५४ मूल्य/किंमत--१५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ११२||पुस्तक परिचय           गोष्ट हातातली होती!           लेखक: व.पु.काळे ############################ आपले आयुष्यात स्नेहनात्यातून जीवनसाथी (पतिपत्नी)येते; संसाराला प्रारंभ होतो. संसारवेल बहरत असताना घडणाऱ्या घटनांचे आणि अवतीभोवतीच्या परिसराचे  सुक्ष्म निरीक्षणात्मक वर्णन कथाकार म्हणून सुप्रसिद्ध असणारे लेखक,कथाकथनकार व.पु.काळे यांनी'गोष्ट हातातली होती! या कथासंग्रहात केले आहे. प्रतिभावंत कथाकार व.पु.म्हणजे कथेतील पॅटर्नचा अवलिया कलाकार!!! यातील कथाबीज सुंदर मनावर आणि विचारांवर आधारित आहेत.यातील कोटेशन्स तर लाजवाब आहेत.कुतूहल वाढवणाऱ्या शब्दसाज...