जिव्हेश्वर जन्मोत्सव २०२२
भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव वाई येथे संपन्न
समस्त साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव विविध उपक्रमांनी स्वकुळ साळी समाज वाई येथील बांधवांनी साजरा केला.सुर्योदयापुर्वी ,पूजा, पाळणा,आरती आदी कार्यक्रम संपन्न झाले.दुसऱ्या सत्रात देशासाठी शहीद झालेल्या वीरांना व ज्ञात- अज्ञात कलाकार, समाजसेवक व समाज बांधवांना श्रध्दांजली अर्पूण गुणगौरव सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक श्री रवींद्र लटिंगे यांनी केले.प्रमुख अतिथी व महाप्रसादाचे मानकरी सौ.निलिमा व श्री. महेंद्र शंकरराव धेडे व श्री दत्तात्रेय मर्ढेकर यांचे स्वागत अध्यक्ष श्री भास्करराव कांबळे यांनी केले. तद्नंतर कलाविष्कार रेकॉर्ड डान्स दिशा कोदे, ज्ञानदा दाहोत्रे यांनी बहारदार सादर केला.श्रेया पोरे हिने उत्कृष्ट वक्तृत्वाची झलक सादर केली.तदनंतर स्पर्धापरिक्षेतून न्यायाधिश पदी निवड झालेल्या कु.मैथिली प्रकाश मर्ढेकर , ओझर्डे व बावधन येथील पोलीस पाटील पदी नियुक्त झालेल्या श्री.मयूर कोदे व सौ.अश्विनी संजय हावरे ,उत्कृष्ट एम.एस.सी.आय.टी. केंद्राच्या संचालिका सौ.वनिता अजित हावरे आणि जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षक पुरस्कारप्राप्त सौ.स्मिता योगेश पोरे , मिडिया प्रसिध्दीव सामाजिक दातृत्वाबद्दल श्री स्वप्निल दाहोत्रे व उत्सव सोहळ्याचे स्थळप्रमुख श्री रघुनाथ दाहोत्रे यांचा सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.इयत्ता दहावी-बारावी परीक्षेत सुयश मिळविलेल्या यश पोरे,जुई मर्ढेकर, श्रुति हावरे,दहावी परीक्षेत सुयश मिळवलेल्या आमोद धेडे, श्रावण तांबे, वैष्णवी पिठे, पृथ्वी हावरे,आयुष मर्ढेकर आणि इंजिनिअरिंग पदवी प्राप्त गौरवी मर्ढेकर,प्रणव हावरे व इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक ओंकार मर्ढेकर किकबाॅक्सिंग जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेता वरद साळी,मंथन सामान्यज्ञान स्पर्धा विजेती तनया मर्ढेकर आणि शालेय वक्तृत्व स्पर्धा विजेती सानिका तांबे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
बॅंक मॅनेजर श्री उदयकुमार कोदे, विक्रीकर अधिकारी सौ.सविता मर्ढेकर,कृषी अधिकारी श्री.रमेश भागवत, विशेष शिक्षिका सौ.संगिता भागवत हे समाजबांधव सेवानिवृत्त झालेबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,शाल पुष्पगुच्छ देऊन सेवागौरव करण्यात आला.तदनंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन श्री भास्करराव कांबळे यांनी केले. जमाखर्च व ताळेबंदाचे वाचन श्री रवींद्र लटिंगे यांनी केले.नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. आभार स्वप्निल दाहोत्रे यांनी मानले. जिव्हेश्वर महाआरतीचा मान अध्यक्ष श्री महेन्द्र धेडे व सौ निलीमा धेडे यांना देण्यात आला. महाप्रसादाचा आस्वाद सर्व समाज बांधवांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री दत्तात्रय मर्ढेकर,श्री भगवान गवते,सौ.चारुशीला दाहोत्रे, योगेश दाहोत्रे,श्री महेंद्र धेडे,श्री स्वप्नील दाहोत्रे,श्री अजित हावरे, श्री आनंदा सुकाळे,सौ.पूनम दातरंगे,सौ.विद्या साळी,भास्कर मर्ढेकर,योगेश पोरे,सौ.प्रेमा लटिंगे,सौ.विजया कांबळे, सौ.शकुंतला मर्ढेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमास वाई शहरातील सर्व स्वकुळ साळी समाज बंधू-भगिनी उपस्थित होते.......।।
Comments
Post a Comment