सेवा गौरव समारंभ श्री संजय सातपुते
सस्नेह नमस्कार…..
कर्तृत्वनिष्ठ प्रशासक
आजचा दिवस अत्यंत आनंददायी आणि भावनिक आहे. कारण आपण एका अशा शिक्षक ते केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सेवागौरव सोहळा संपन्न होतोय, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अर्पण केले.ते श्रीमान संजय नारायण सातपुते केंद्रप्रमुख सातारा...
शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानदाते नाहीत, तर संस्कारवाटे चालवणारे दीपस्तंभ असतात.यांनी प्रदीर्घ कालखंडात शिक्षणाच्या क्षेत्रात जे कार्य केले आहे, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे.
वाई तालुक्यातील वयगाव,बेलमाची जीवन शिक्षण विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शिस्त, प्रेम, जिव्हाळा आणि ज्ञान यांचा सुरेख संगम असायचा. विद्यार्थ्यांवर माया करणं, त्यांच्या चुका सुधारून मार्गदर्शन करणं, आणि प्रत्येक शाळेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणं ही आपली खासियत.
आपण शिक्षक म्हणून जितके प्रभावी , तितकेच ते एक स्नेही,आप्तेष्ट,उत्तम सहकारी,अधिकारी आणि आदर्श व्यक्तिमत्त्वही.शाळेतील प्रत्येक सहकाऱ्याला मदतीचा हात दिला, सल्ला दिला आणि आपल्या अनुभवाचा खजिना उघडून दिला. केंद्रप्रमुख पदाची धुरा हातात घेतल्यावर महाबळेश्वर आणि सातारा तालुक्यातील विविध केंद्रसमूहातील शाळेची गुणवत्ता आणि भौतिक सुविधा उभारण्यासाठीसर्व सहकारी मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदास प्रेरणा दिलीत.त्यामुळे शाळांचा आलेख उंचावत गेला.
ज्ञानदीप उजळविला तू,
आयुष्यभर अविरत वाहिला —
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर
आत्मविश्वास साजिरा लाविला।
शब्दामधून संस्कार दिले,
कृतीतून आदर्श शिकवले —
पिढ्यांना घडवताना,
स्वतःला तू विसरले।
आपले शैक्षणिककार्य शब्दांमध्ये मांडणं कठीण आहे,पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशात,सहकाऱ्यांच्या मनातील प्रत्येक कोपऱ्यात आपल्या योगदानाचे ठसे आहेत.विशेष म्हणजे आपल्या आई-वडिलांना
सेवानिवृत्तीचा सोहळा पाहण्याचे भाग्य लाभतेय हा मणिकांचन योगच आहे.
आपण ३० जून २०२५ रोजी ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त झालात. आपणास सेवापुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा आणि निरामयी आरोग्यासाठी सदिच्छा!
शब्दांकन - श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
मुख्याध्यापक माझेरी फलटण...
Comments
Post a Comment