पुस्तक परिचय क्रमांक:२२७ उनाड चौकडी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२२७
पुस्तकाचे नांव-उनाड चौकडी
लेखक: डॉ.वसुधा वैद्य
प्रकाशन-इसाप प्रकाशन, नांदेड
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -प्रथमावृत्ती २०२४
पृष्ठे संख्या–१०४
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२२७||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव: उनाड चौकडी
लेखक: डॉ.वसुधा वैद्य
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
शाळेत सतत नापास होणारी अन् उनाडक्या करत फिरणारी मुलं. बाईंच्या उपदेशपर विचाराने प्रेरित होऊन अभ्यास करायला लागतात.अन आपल्या देशासाठी आगळं वेगळं करतात.प्रसंगी शेवटच्या पेपराला येता येत नाही.त्या चौकडीची कथा!
चार भिंतीच्या आत न रमणाऱ्या उनाड , निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करणाऱ्या मुलांच्यात काहीही करणाऱ्याची प्रचंड ऊर्जा असते.फक्त योग्य त्या वेळी अचूकपणे मार्गदर्शक भेटला.अन् परिस्थिती समजावून दिली.की अशी उंडारणारी मुले कर्तव्यपरायण होऊन, आपल्या जीवावर बेतणाऱ्या संकटाची काळजी न करता रेल्वेप्रवाशांचे प्रयाण कसे वाचवतात.राष्ट्रीय मुल्यांची जोपासना कशी असावी.याचे वास्तव उदाहरण म्हणजे लेखिका डॉ.वसुधा वैद्य यांची बालकादंबरी 'उनाड चौकडी'.ही कादंबरी वाचताना फास्टर फेणे सिनेमा आणि बोक्या सातबंडे या पुस्तकाची सदैव आठवण येत होती.
अतिशय सहज सुंदर आणि प्रवाही शैलीत
या कादंबरीचे लेखन केले आहे.आकर्षक आणि नजरेत भरणारे मुखपृष्ठ तसेच आशयाशी साधर्म्य असणारे रंगीत छायाचित्र उद्बोधकही आहे.काही घटना प्रसंगीआपण वाचताना हळवे होतो.ती जादु लेखणीची जादुई लेखिका वसुधा वैद्य यांची आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा मलपृष्ठावरील 'ब्लर्ब' म्हणजेच पाठराखण या कादंबरीची कहाणी उलगडत जाणारी अन् वाचकास कादंबरी वाचनाची लालसा निर्माण करणारा आहे. लेखिका डॉ.वसुधा वैद्य साहित्य लेखनासह अभिव्यक्तीच्या सर्वंच क्षेत्रात नाममुद्रेची लल्लाटरेषेसारखी ठसठशीत मोहर उमटवली आहे.
इयत्ता नववीच्या प्रथम सत्र परीक्षेत नापास झालेल्या आणि शाळा व समाजात उनाडक्या करणारी पोरं असा शिक्का मोर्तब झालेल्या
मुलांना योग्य वळणावर आणण्यासाठी परिश्रम घेतलेल्या वर्गशिक्षिकेची कादंबरी. मुलांच्या मनात काय चालले आहे?हे ज्याला तात्काळ अवगत होते.वाचता येते.तेच सोप्या भाषेत मुलांचे भावविश्व कादंबरीतून उलगडून दाखवितो.घटनांच्या आशया नुसार समर्पक कृष्णधवल छायाचित्रे घटना प्रसंग ठळक करतात.इयत्ता नववी 'क'त शिकणारे रोहित कापरे, विश्र्वास रोकडे, प्रसन्न आगरकर ,बंकू उर्फ कार्तिक पाटील आणि वर्गशिक्षिका वैदेही साठे ही कादंबरीतील मुख्यपात्रे आहेत.
कुमारवयीन आणि किशोरवयीन मुलांनी आवश्य वाचावी असी कादंबरी आहे.शाळा ,मुलांची घरची परिस्थिती आणि मुलांचे रेल्वे ट्रॅकवरून धावणे तसेच मुले आणि पालकांच्या वर चित्रित केलेला प्रसंग वाचताना आपल्या डोळ्यांत अश्रू अनावर होतात.इतकं अप्रतिम लेखन केले आहे.आपले राष्ट्राभिमानी कर्तव्य कसं पार पाडावं.याची संस्करण करणारी ही अक्षरकृती आहे.रसिक वाचकांना निश्र्चित वाचायला आवडेल अशी 'उनाड चौकडी' कादंबरी आहे…
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक:२२जून २०२५
Comments
Post a Comment