पुस्तक परिचय क्रमांक:२२९ उंबरठा
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२२९
पुस्तकाचे नांव-उंबरठा
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -पुनर्मुद्रण फेब्रुवारी,२०१८
पृष्ठे संख्या–११२
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२२९||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव: उंबरठा
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
माणसं चितारणारा लेखक अशी ज्यांची नाममुद्रा साहित्य क्षेत्रात आहे.ते म्हणजे
ग.दि.माडगूळकर यांचे धाकटे बंधू व्यंकटेश माडगूळकर.माणदेशातील रुक्ष भागातील लेखक ,पण संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सिध्दहस्त लेखणीतून साहित्य रुपी ओलावा पुरविणारे निर्झर दिले.साहित्याच्या कादंबरी,कथा,पटकथा, नाटक, अनुवाद लेखन अशा सर्वच क्षेत्रात मुशाफिरी केलेले आदरणीय लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचा 'उंबरठा'हा कथासंग्रह ग्रामीण भागातील माणसांचं चित्र आपल्या लेखनातून सजवून व्यक्तिची ओळख अधोरेखित करणारे लेखक.
'उंबरठा'या कथासंग्रहात एकूण नऊ कथांचा समावेश केला आहे.उंबरठा हा केवळ वास्तूचा भाग नसून समाज संस्कृती नितीमत्ता आणि आयुष्यातील टप्प्यांचे प्रतिक आहे.येथील कथांमध्ये रुढार्थाने व्यक्तिंच्या जीवनातील नवीन पर्व ओलांडून जायला संधीच, न मिळालेल्या कथांचा समावेश अतिशय समर्पक व भावस्पर्शी शब्दात लोकप्रिय कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांनी रेखाटलेला आहे.
कष्टकरी श्रमजीवी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करताना कशी हाल अपेष्टा होते.याचे मर्मभेदक लेखन म्हणजे उंबरठा कथासंग्रह.वाचतानाच याची प्रचिती आपणास येते.उंबरठा,गोडे पाणी,जुपी,गृहस्थ, घरापाठीमागची लोभा, कोऱ्या कागदांची कहाणी, नाही, नाही!,होटेल यावी आणि दुबळा या कथा. यातील कथांना पुर्वप्रसिध्दी लोकप्रिय दिवाळी अंक आणि मासिकात मिळाली आहे.
लेखक मोटारीने स्वगावी जाताना बलकवडे गावातील मोटारथांब्या समोरील घराच्या दरवाजातून आल्यागेल्यांना न्याहाळणारी विठाई.कालौघात वयाने वाढली पण ती लग्न होऊन नांदायला कधी गेलीच नाही.तिनं नव्या पर्वात प्रवेशासाठी उंबरठा ओलांडलाच नाही. ती चित्तरकथा 'उंबरठा'.
पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत होती.यावर जालीम उपाय हरिजन वस्तीतील सगळे मिळून ठरवतात.आणि निढळाचा घाम गाळून विहीर खोदतात.यासाठी गावच्या पाटलाची तोंडी परवानगी घेतात.पण जेव्हा विहीरला बक्कळ पाणी लागते तेंव्हा सगळ्या गावासमोर पाटील शब्द फिरवतो.त्यामुळे वस्तीतल्या सगळ्यांची पंचाईत होते.अन् गाव विहीर काढण्याच्या मेहनतीचे पैसे वस्तीतल्या सगळ्यांना देते.अन् विहीरीचे मालक गाव होते. पुन्हा हरिजन वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची मिनतवारी करावी लागते.ती 'गोडे पाणी' कथा.
एखादा दिवस शेतकऱ्याच्या आयुष्यात विदारक परिस्थिती निर्माण करणारा उगवतो. त्याच्या हरेक कामास नाठ लागते.त्यामुळे नामू आणि त्याच्या बायकोची कशी परवड होते. त्याचे शब्दचित्र रेखाटणारी 'जुपी'कथा.
गृहस्थ या कथेत यदुनाथ राजाराम बापट या कचेरीत काम करणाऱ्या माणसाची कथा.तो एकदा सिनेमा पाहण्यासाठी गेला असता. त्याच्या शेजारी बसलेल्या पारशीबाईशी तो कसा लगट करतो. त्याची स्टोरी मांडली आहे.
लेखकाच्या घरापाठी राहणाऱ्या लोभाची
अचानकपणे तिच्या सासरच्या घरी गाठ पडते. तिची व्यथा नामूकडून समजल्यावर त्यांचं बालपण स्मरणात येते.ते 'घरापाठीमागची लोभा'या कथेतून अतिशय समर्पक शब्दांत कथानक मांडले आहे.रात्रीचं जेवण झाल्यावर त्यांच्याकडे गमत्या अण्णा कासार,ठकूबाई,माळी आणि राघू कामानिमित्त आलेले असतात. ते रात्रभर त्यांच्ं गाऱ्हाणे ऐकत राहतात.ठकूबाईला कुंकू लावण्यासाठी पत्नी विमलला माळी देतात. तेंव्हा समजतं लेखक रात्रभर न झोपलेले नसतात.त्याचे एखाद्या स्वप्नवत वर्णन 'कोऱ्या कागदांची कहाणी'या कथेत केली आहे. त्यातील व्यक्ती लेखकांच्या लेखात शब्दचित्र उभारायला सांगत असतात.पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रेखाटन करावं असं काहीही दिसत नाही.म्हणून शीर्षक आहे.कोऱ्या कागदांची कहाणी'पाठलाग करणाऱ्या नाथाची ‘नाही, नाही!’कथा
कुतूहल वाढवणारी आहे.गरीबीला कंटाळलेला नामा सातपुते आणि त्याची पत्नी पवित्रा चंबुगबाळे घेऊन मावळणीच्या गावाला रोजगाराच्या शोधात येतो.हाॅटेलात पाणी पिताना भगवंतरावाची नजर नामाच्या बायको वर पडते.अन् म्हाताऱ्या वाणीनीच्या घरी चकरा वाढू लागल्या.चहा साखर देत साळी चोळीही देऊ लागला.यामुळं नामा बिथरला आणि अंधाऱ्या रात्रीत त्याने बायकोला बडवले.त्यामुळे तिनं त्याचा चांगलाच पाण उतारा केला.नामाचा तोल ढासळला अन्य एके दिवशी त्याने भगवंतरावाचा धारदार खिळ्याने खून केला.ती दुबळा कथा.यातील सर्वच कथा अवर्णनीय आहेत.आपणास निश्चितच आवडतील असा व्यंकटेश माडगूळकर लिखित'उंबरठा' कथासंग्रह आहे.लेखकांच्या लेखणीस त्रिवार वंदन!!!
लेखन हे कधी आपण आयुष्याचे वेड बनवले आहे का? यासाठी आपले आयुष्य कधी उधळून दिले आहे का? जोपर्यंत आपण प्रतिष्ठा,धन, शाश्र्वती यांना सांभाळायचा प्रयत्न करीत आहोत.तोपर्यंत भव्यदिव्य असे आपल्या हातून काहीच निर्माण होणे शक्य नाही.---व्यंकटेश माडगूळकर
परिचयक:श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक:६ जुलै २०२५

Comments
Post a Comment