पुस्तक परिचय क्रमांक:१७६ सुंदर पिचाई

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१७६ पुस्तकाचे नांव-सुंदर पिचाई लेखकाचे नांव- दिगंबर दराडे प्रकाशन-मायमिरर पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती सप्टेंबर २०२३ पृष्ठे संख्या–१७६ वाड़्मय प्रकार-कथा किंमत /स्वागत मूल्य--२५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १७६||पुस्तक परिचय सुंदर पिचाई लेखक: दिगंबर दराडे 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 गुगलच्या नियंत्रणात सर्व जग आहे,पण ज्याच्या नियंत्रणात गुगल आहे.ते आहेत सुंदर पिचाई. मी जिथे जातो,तिथे भारत माझ्या बरोबर असतो. जगप्रसिद्ध गुगलचा भारतीय वंशाचा सीईओ! सुंदर पिचाई यांचा गुगलचे सीईओ प्रवास ‘सुंदर पिचाई’या पुस्तकात पत्रकार तथा लेखक श्री दिगंबर दराडे यांनी मांडला आहे.ही एक सक्सेस स्टोरी आहे.स्वप्नांना कवेत घेऊन ध्येय साध्य करणारे सर्वोत्कृष्ट कामगिरी करतच राहणारे तंत्रज्ञानातील मसिहा सुंदर पिचाई.तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील सामान्य कुटुंबात जन्मलेले तैलबुध्दिमत्ता,ह...