काव्य पुष्प:२५८ वृक्षांचे नजारे
वृक्षांचे नजारे
काष्ठशिल्पी आकारात झाडं भावले
अजस्त्र आकारात अजगर दिसले
खोड अन् फाद्यांचे धुमारे वाळले
वेलींची जाळी झाडाला गुंडाळे||
हिरवी करडी शोभिवंत काया
महाकाय वृक्षाची घनदाट छाया
वेलीला बाहुपाशात करते माया
फुले ऊधळती अत्तराचा फाया||
पाचोळ्याने भरला झाडाचा तळ
पिकल्या पानाची झाली पानगळ
किड्यामुंग्याचे हेच आश्रयस्थळ
झाडांखाली अंथरली जणू वाकळ ||
लतावृक्षांचे आकार नजरती
नयनरम्य दृश्य मोहविती
गर्द छायेत पाखरं खेळती
वाटसरु क्षणभर विसाविती ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
खूपच छान शब्दांकन👌👌
ReplyDeleteधन्यवाद दोस्त
ReplyDelete