काव्य पुष्प: क्रमांक २५९ वाट...
वाट….
देऊळाराउळाची रांग भक्तीची
वनराईची मार्गिका गारव्याची
धुळाक्षरांची दर्शिका ज्ञानाची
प्रकाशाची वाट नवतेजाची
ही वाट शिवारातल्या बांधाची
पण पावलांच्या वहिवाटीची
चिखलात पावलं रुतण्याची
धुराळ्यात ठसे उमटण्याची
उन्हाळ्याच्या काहिलीत
लाल धुराळा उडण्याची
पावसाळ्यात निसरड्या
वाटेवरुन कधी घसरण्याची
तर पाण्यात शिरुन वाट
पावलं टाकत जाण्याची
वाटेने तंगडतोड झाल्यावर
नंतर घेणाऱ्या विसाव्याची
घाटमाथ्याची वाट वळणावळणाची
द्रुतगतीवरची सुसाट पळण्याची
हमरस्त्यावरची मार्गिका डांबराची
पदपाथ आखीवरेखीव पेव्हरची
ती वाट हुडकत जाण्याची
शोधताना मार्ग गवसण्याची
इप्सित स्थळाला भेटण्याची
तनमनाला आनंद घेण्याची
काही अनवटवाटा धु़ंडाळूनी
वाटते अंतर मनात नवल
काही खडतर वाटा तुडवनी
वाढते काळजात कुतूहल
वनातल्या थरारक अनवटवाटा
भटकताना साद घालतात चित्ताला
शिवारातल्या मळलेल्या पायवाटा
फिरताना भुरळ घालतात जीवाला
दमसा कराय लावतात क्षणाक्षणाला
गडकिल्ल्यांच्या चढणीच्या वाटा
तर उत्कंठा वाढवितात निमीषाला
शीतल गर्द छायेतल्या जंगलवाटा
आयुष्याच्या संघर्ष वाटेवर
अडचणी उभ्या ठाकतात
यशाला गवसणी घालताना
संकटाला नेस्तनाबूत करतात
श्री.रविंद्रकुमार गणपत लटिंगे
Comments
Post a Comment