क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालय नायगाव येथील वाचनालयात पुस्तके प्रदान







वाचन साखळी समूहाच्या वतीने ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मोफत ग्रंथालय
नायगांव ता.खंडाळा जिल्हा- सातारा या संस्थेस वाचनालयासाठी १७५ पुस्तके प्रदान करण्यात आली.ही पुस्तके वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभाताई लोखंडे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन वाचन साखळी समूहातील नवसाहित्यिकांचे साहित्य(पुस्तके,ग्रंथ) तसेच वाचनप्रेमी सदस्यांनी स्वखुशीने वाचनालयास देण्यासाठी पुस्तके पोस्टाने,कुरियने पाठविली होती.आदरणीय प्रतिभाताईंनी जमा झालेली  पुस्तके स्पीडपोस्टाने नागपुर येथून सातारा येथे पाठविली.तेथून आमचे शिक्षक मित्रवर्य श्री प्रकाश बडदरे सरांनी स्वतः वाई येथे सुपूर्द केली.तदनंतर  रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्त्या व वाचनालयाच्या अध्यक्षा सौ.शुभांगीताई नेवसे व ग्रंथपाल सौ.नेवसे यांच्याकडे वाचन साखळी समूहाचे कार्याध्यक्ष श्री.गणेश तांबे,सौ.जयश्री तांबे मॅडम, सहसंयोजक श्री रवींद्रकुमार लटिंगे, सौ.प्रेमा लटिंगे, श्री.शेखर जाधव श्री.काशिद सर व सौ.काशिद मॅडम आणि वाचन साखळी परिवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. एका अलौकिक उपक्रमासाठी मी स्वतः २५ पुस्तके भेट देऊन खारीचा वाटा उचललेल्या समस्त दात्यांना मनःपुर्वक धन्यवाद!तसेचपुस्तकभेट देण्यासाठी लागलेल्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे पुनश्च धन्यवाद!!

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड