काव्य पुष्प:२५८ वृक्षांचे नजारे




    वृक्षांचे नजारे


काष्ठशिल्पी आकारात झाडं भावले 

अजस्त्र आकारात अजगर दिसले 

खोड अन् फाद्यांचे धुमारे वाळले 

वेलींची जाळी झाडाला गुंडाळे||


हिरवी करडी शोभिवंत  काया

महाकाय वृक्षाची घनदाट छाया  

वेलीला बाहुपाशात करते माया 

फुले ऊधळती अत्तराचा फाया||


पाचोळ्याने भरला झाडाचा तळ

पिकल्या पानाची झाली पानगळ

किड्यामुंग्याचे हेच आश्रयस्थळ 

झाडांखाली अंथरली जणू वाकळ ||


लतावृक्षांचे आकार नजरती 

नयनरम्य दृश्य मोहविती 

गर्द छायेत पाखरं खेळती 

वाटसरु क्षणभर विसाविती ||


श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई








Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड