सेवागौरव समारंभ रवळेकर गुरुजी








🍁सेवागौरव समारंभ🍁

आमचे डी.एड.चे शिक्षक मित्रवर्य आदरणीय श्रीमान  सुरेश  रवळेकर मुख्याध्यापक जि.प.प्राथ.शाळा-गाढवेवाडी

आज सेवानिवृत्त होत आहेत.त्यानिमित्ताने…. 

🌸 विद्यार्थ्यांचे गुरुजी (सर) आणि आपले शिक्षकमित्र ३१ मार्च रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी ३२ वर्षापुर्वी सेवेचा श्रीगणेशा दुर्गम घेराकेंजळ शाळेत  सुरू केला.मितभाषी आणि भिडस्त स्वभावाचे आपले सन्मित्र तसेच सुंदर अक्षरांचे कौंदण लाभलेले गुरूवर्य आहेत. अनेक शाळांमध्ये त्यांच्या हस्ताक्षरांतील शैक्षणिक साहित्य विशेषतः तक्ते आणि कार्यालयातील बोर्ड भिंतीवर दिमाखात झळकत असायचे. माहितीचा कागद तर आखीव-रेखीव असायचा. सगळ्याच शाळांत पदभार त्यांच्याकडेच होता.. त्यामुळे शालेय रेकॉर्ड उत्तमरित्या ठेवलेले असायचे. विद्यार्थ्यांतच रममाण होणारे अध्यापक आणि कामावर निष्ठा ठेवणारे गुरूजी.आमच्या या मित्राने वाई आणि महाबळेश्वर तालुक्याच्या दुर्गम भागात सेवेचे व्रत पहिल्यापासूनच स्विकारले होते. निसर्गसौंदर्य आणि गडकिल्ल्यांनी युक्त असलेल्या डोंगरी भागातील माचीवरचे घेराकेंजळ, डोंगरपायथ्याची देवरुखवाडी, महाबळेश्र्वर तालुक्यातील छनदाट जंगलव्याप्त दरे आणि मेणवली केंद्रातील गाढवेवाडी अशा चार शाळेमध्ये त्यांची सेवा बजावली. उत्कृष्ट पध्दतीने तेथील शाळांचा शैक्षणिक आलेख उंचावत ठेवण्याचे कार्य सहकारी शिक्षक आणि पालकांच्या सहकार्याने केले आहे.आज ते सेवानिवृत्त होत आहेत.त्यानिमित्ताने आदरणीय रवळेकर सरांना क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालय सातारा या बॅचमेंटच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!आणि निरामयी जीवनाच्या सदिच्छा!!!🌹🌹🌹🙏🏻🙏🏻


शुभेच्छुक :श्री रवींद्रकुमार लटिंगे,वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड