क्रिकेटचे अविस्मरणीय दिवस दैनिक सकाळ साप्ताहिक'शब्दांकुर'या सदरातील स्मरण गंध लेख



            ऋणनिर्देश

🍁🍁धन्यवाद दैनिक सकाळ आणि आदरणीय आप्पा, मनस्वी आभार ….
उपक्रमशील शिक्षक या सदराने शैक्षणिक क्षेत्रात प्रयोगशील,उपक्रमशील शिक्षकांची कर्तृत्व गाथा उठावदार केलीत.
दोन वर्षापुर्वीच्या फेसबुकवरील क्रिकेटच्या सामन्यांचा लेख वाचून आपण मला सदर लेख उपक्रमशील समुहावर शेअर करण्याची आज्ञा केलीत.त्या लेखास मिळालेल्या आत्मबळाने आणि अनामिक कौतुकाने माझ्या लेखणीस प्रेरणा मिळाली….त्याची फलनिष्पत्ती 'हिरवी पाती ' व 'पाऊले चालती' ही दोन माझी पुस्तके लाॅकडाऊन काळात तयार झाली.स्वप्नवत वाटणारे कार्य अचानकपणे आपल्या साक्षीने आणि सहकार्याने संपन्न झाले.साठवणीतल्या आठवणी मनात रुंजी घालत होत्या.त्या कागदावर उमटवत त्याचे विविधांगी लेखन तयार होऊ लागले.त्याची परिपक्वता यथासांग आणि वाचनीय होण्यासाठी आपण वेळोवेळी मार्गदर्शन केलेत.लेखनाच्या मौलीक टीप दिल्या.त्यामुळं लिहित्या हाताला बळ मिळालं.   लेखणीला टर्निंग पॉइंट देणारा लेख म्हणजे 'क्रिकेटचा सामना'. क्रिकेट म्हणजे आपल्या आवडीचा खेळ . त्यामुळे आपण अनेकदा यावर दिलखुलासपणे चर्चा केलीत.फोनवरुन गप्पा केल्यात.आणि आज तोच लेख आपण दैनिक सकाळ या महाराष्ट्रातील अग्रेसर वृत्तपत्रातील साप्ताहिक 'शब्दांकुर'या सदरात स्मरण गंध या नावाने प्रसिद्ध केलात.तुम्हामुळे अनेक अभिव्यक्त होणाऱ्या साहित्य यात्रेतील स्नेहीजणांशी परिचय झाला.नवा आयाम निर्माण झाला.नवीन वलयात मित्रपरिवार संवर्धित होतोय.हे खऱ्या अर्थाने आपलेच साफल्य आहे..अप्पा आपले आणि दैनिक सकाळ वृत्तसेवेचे  हदस्यथ आभार आणि मनस्वी धन्यवाद!!!वाणी अन् लेखणीने कायम आपल्या ऋणात…..🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड