क्रिकेटचे अविस्मरणीय दिवस
🏆🥇क्रिकेटचे अविस्मरणीय दिवस 🏆🥇
🏆📢🎤📢📣📢📣🏅
..
🗣️🎤🗣️🎤🗣️🎤🗣️🎤
रोमांचकारी फायनल मॅचका समालोचन करते हुये जानमाने काॅमेंट्रेटर इकबाल पठाण..... 🌧️⛈️आसमानमें कालेघने बादल आते हुये, लेकिन बारीशकी कोई गुंजाईश नहीं..... प्रेक्षकोंसे खचाखच भरा हुवा मराठी शाला का स्टेडियम...... टुर्नामेंट की आखरी मॅच.... जितने केलिए टीमको आखरी गेंदपे चाहिये चार रन .... ,दो विकेट हाथमें.....तालीम ओरसे आखरी गेंद डालते हुये विजय शेलार....
भागते भागते आकर गेंद डाली...बॅटसमनने जोरका फटका लगाया ,गेंद उंच उठाई और ये स्ट्रेट डाईव्ह, सोसायटी के नजदीक सीमा रेषेके पास आती गेंद विजय ढोकळेने पकडी....और ये विकेट गिरा.ऑल डाऊन.............और तीन रनसे कलाविष्कार टीमने यह मॅच जिती और वे पयले नंबर के हकदार बन गये.............. मैदानके नजदिक फटाके फुटणे लगे..... और बच्चेकंपनी शोर मचाते हुये, बहुत रोमांचकारी मॅच...........
.....अशी इकबाल ची बहारदार व जबरदस्त काॅमेंट्री.........२० वर्षांपूर्वी भरवलेल्या सामन्याची आठवण झाली.
आमच्या ओझर्डे गावातील कलाविष्कार नाट्य मंडळ दरवर्षी सामाजिक आशयावर नाटक सादर करीत होते.तसेच लहानथोरांना क्रिकेटचीही फारच आवड होती. लहानपणी आम्ही सोसायटीच्या रेडिओवर सामन्यांचे धावते वर्णन ऐकायला आणि ग्रामपंचायतीच्या टि.व्हीवर मॅच बघायला तुडुंब गर्दी करायचो.कलाविष्कार नाट्य मंडळातील हौशी क्रिकेट खेळाडुंनी गावपातळीवर मर्यादीत षटकांच्या क्रिकेट स्पर्धा मराठी शाळेच्या मैदानावर आयोजित करून गावातील मुलांच्यात टॅलेंट शोधण्याचा पहिला प्रयत्न केला. टेनिस बॉल क्रिकेटच्या सामन्याला सुरवात झाली.त्यावेळी स्पर्धेचे 'हॅण्डवेल' हाताने लिहून तयार करावे लागे.मग त्याच्या झेरॉक्स पंचक्रोशीतील गावोगावी वाटप केल्या जायच्या.. सामन्यासाठी गावातल्याच दहा-वीस टीम्सची नोंदणी व्हायची. सामन्याला बक्षिसे मिळविण्यासाठी क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या शौकीनांना गळ घातली जायची. असे शौकीन आश्रयदाते उदारहस्ते वैयक्तिक व सांघीक बक्षीसे प्रायोजित करायचे.तर काहीजण उत्स्फुर्तपणे देणगी किंवा षट्कार, चौकार आणि विकेट साठी सढळ हस्ते बक्षीसे द्यायचे.
🤝संयोजक मंडळाचे कार्यकर्ते दिवसरात्र एक करून विकेट तयार करणे, मैदान स्वच्छ करणे , सीमारेषा आखणी , मैदानावर पाणी मारणे, मदतनिधी मिळविणे ,उद् घाटन समारंभ,बक्षीस समारंभाचे नियोजन करणे व लाॅटस् पाडणे,पंच मंडळ नियुक्ती इत्यादी कामांचे नियोजन सर्वजण मिळून करायचे....
गावातील नामांकित संघ म्हणजे कलाविष्कार,स्नेहसंवर्धन,एलेव्हन स्टार क्रिकेट क्लब,राजधानी,युवकक्रांती, रणसंग्राम, केएनपी,दांडगा धुमाकूळ,शिवतेज कदमवाडी हे दरवर्षी होणाऱ्या सामन्यात सहभागी होत असत.ऐनवेळी अचानक उत्साही खेळाडुंची टीमही सहभागी होत.दिवाळीच्या सुट्टीत स्नेहसंवर्धन तर उन्हाळ्याच्या सिझनमध्ये कलाविष्कार सामन्यांचे आयोजन करत असे. राजधानी मित्रमंडळ व युवक क्रांती म़ंडळानेही काही वर्षे सामन्यांचे आयोजन केले होते.
🔰✒️संघ नोंदणी नुसार बादपध्दतीने सामने सहा ते सात दिवस सुरू असत......
त्यामुळे प्रेक्षक दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत सामन्यांचा आस्वाद मजेत घेत असत.पण कालांतराने मराठी शाळा सिमेंटच्या कुंपणात बंदिस्त झाली.अन् मैदाना अभावी हळूहळू स्पर्धेतील उत्साह मावळत गेला.
🏏अंदाजे सन 2005 पर्यत आमच्या क्लबने 25 वर्षे सामन्यांचे आयोजन केलेले आठवतय...त्यावेळचे पंच (अंपायर)मंडळी भाऊसाहेब कदम, गोविंद फरांदे,दीपक पिसाळ,सिकंदर पठाण व प्रमोद निंबाळकर . व्यवस्थापक राजेंद्र पिसाळ,इतर सहकारी विद्याधर जाधव,सुनील कामठे,अमोल चव्हाण रामभाऊ पिसाळ ,विजय तांगडे ,अनिल पिसाळ, वसंत जाधव व प्रमोद तांगडे आदी मदतीचा हात देत असत.
सामन्यांचे धावते वर्णन स्पिकरवरून केले जायचे.कॉमेंट्रीसाठी मराठी व इंग्रजीत प्रदीप निंबाळकर,विजय पिसाळ,सत्यजित निंबाळकर,अमर वाघ व प्रमोद निंबाळकर अशी कितीतरी जण आहेत. हिन्दीत तर इकबाल भाई अशी काय कॉमेन्ट्री करत की सगळं प्रेक्षक मनमुरादपणे सामन्याच्या वर्णनाचा आस्वाद घेत असत....गुणलेखक सुभाष पिसाळ,सुरेश चव्हाण, महेंद्र निगडे,योगेश सुतार,विजय ढोकळे व इतर संयोजक काम करत असू.
दरवर्षी सामन्यात नवीन गोष्टींचा व नियमांचा उपयोग केला जायचां...त्यातला एक महत्त्वाचा नियम स्थानिक संघात बाहेरील गावचे खेळाडू समाविष्ट करु नयेत अन्यथा संघ बाद केला जाईल.माफक प्रवेश फी व मोफत टेनिस बॉल केवळ ओझर्डे येथीलच सामन्यात मिळत.डाॅक्टर विकास पिसाळ यांनी काही स्पर्धांना टेनिसबाॅल प्रायोजित केले आहेत. काही बिल्डिंगच्या जागेवर रनस् डिक्लेर कराव्या लागत.विजेत्या संघांना रोख बक्षीस व ट्रॉफी,पहिले बक्षीस पाचशे रुपयांपासून पाच हजारांवर केले होते ,एकदा तर स्पर्धेतील सामन्यात ड्रिंक्सचेही आयोजन केले होते.. आनंद, ईर्षा, तात्त्विक भांडणं व मतभेदही व्हायचे.पण त्या क्षणानंतर सर्वजण खेळासाठी एकदिलाने सामने पार पाडत.
अनेक रोमांचकारी व क्षणाक्षणाला सामन्यांचा निकाल बदलणारे उत्कंठावर्धक सामने या मैदानावर पहायला मिळालेत. सोशल वाई विरुद्ध कलाविष्कार,पॅकर्स विरूद्ध कलाविष्कार, पांचाळ विरुद्ध पिंपोडे, एलेव्हन स्टार विरुद्ध भुईंज, युवक क्रांती विरुद्ध पांडे, पॅकर्स विरूद्ध नवचैतन्य (राजधानी),केंजळ विरूद्ध कोडोली,कलाविष्कार विरुद्ध स्नेहसंवर्धन,राजधानी विरुद्ध शिवतेज आणि बरेच सामने पहायला मिळालेत..
या सामन्याने अनेक गोलंदाज , फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू निर्माण झाले.काहीजण कॉलेज व युनिव्हर्सिटी प्लेअर झाले. खालील खेळाडू तर हमखास संघाला विजय मिळवून देत असत.... राजेंद्र जाधव,सत्यजित निंबाळकर, सुरेश चव्हाण,विजय शेलार,शेखर जाधव,विजय ढोकळे, दिलीप पिसाळ, संतोष शिंदे ,गोविंद फरांदे,जीवन तांगडे,सोमनाथ तांगडे,तुषार तांगडे,किशोर जगताप,राजू (स्वप्निल)खरात, नितीन सातपुते,चरण गायकवाड, नितीन फरांदे,दादा फरांदे,अमृत पिसाळ,बापू पिसाळ,संदीप पिसाळ,रशिद पठाण,जावेद इनामदार,संजय धुमाळ, शेखर फरांदे, ऋषीकेश निंबाळकर, सचिन कदम, प्रशांत कदम, दत्ता निगडे,तानाजी चव्हाण, सचिन घाडगे,महेश जगताप याशिवाय आणखी बऱ्याच खेळाडूंची खेळी मी अनेकवेळा पाहिली आहे.....यांचे जीवन क्रिकेटशिवाय अधुरे आहे.यांनी जिंकून दिलेले काही सामने मनातल्या कुपित आहेत.आजही मराठी शाळेच्या मैदानावर गेलोकी सामन्याच्या आठवणींना उजाळा मिळातो.आणि ते स्टेडियम बोलकं होतं.आठवणींची मालिका डोळ्यासमोर तराळते.अनेक गाजलेल्या जिंकलेल्या सामन्यांच्या टर्निंग पॉइंटचे सोनेरीक्षण आठवतात.नकळतपणे हातांनी टाळ्या वाजतात.
जागतिक क्रिकेटच्या विविध रेकॉर्ड व विविध सामन्याची माहिती असणारे भाऊसाहेब कदम व प्रमोद निंबाळकर यांना केंव्हाही खेळासंबंधी माहिती विचारा हे सदैव तयारीत...
असे हे क्रिकेटचे सामने म्हणजे गावचा दरवर्षीचा वर्ल्डकपच वाटायचा.. हल्ली विविध ठिकाणी हाफपीच डे-नाईट पध्दतीने छोट्याशा मैदानावर सामनेआयोजित केले जातात.पण त्या टुर्नामेंटची आवड आणि खासियत वेगळीच....
🏆ही माझी गावातील क्रिकेट सामन्याविषयीची साठवणीतली आठवण
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे,वाई
माजी व्यवस्थापक कलाविष्कार क्रिकेट क्लब, ओझर्डे
Comments
Post a Comment