काव्य पुष्प:२५४ बहारदार काटेसावर













निसर्गाची रंगपंचमी
वसंत ऋतूचे स्वागत करायला बहारदार काटेसावर..... काटेसावर म्हणजे सुईरच्या झाडांची पानगळ होऊन कळया लगडायला सुरुवात होते.अन् तदनंतर काही दिवसांनी लाल शेंदरी,गुलाबी आणि पिवळ्या फुलांच्या रंगछटेत झाडं न्हाऊन निघतात.ती झाड नजरेत भरतात. विलोभनीय आणि बहारदार दृश्य मनाला भुरळ घालतं.एखादे वेळी परिसरात भटकताना त्या फुलातील मकरंद चोचायला पाखरं  झाडांवर येऊन बसतात. छोटीशी पाखरं मकरंद चाखताना बघायला फारच मजेशीर वाटते.याचवेळी पळस आणि पांगाराही फुललेला असतो. त्याचीही लालभटक छोटी छोटी फुलं नजर वेधून घेतात. आज कोंढावळे येथील कोंढमाळाला क्षेत्रभेटीत वृक्षांचे निरीक्षण करताना पिवळ्या फुलांची काटेसावर दृष्टिस पडली... बऱ्याच दिवसांनी मुलांसमवेत भटकंती....

फुलांनी लगडली काटेसावर 

निळ्या आकाशी रुप गोजिरे
फांद्यांना लगडली शेंदरी झुंबरे
अंगाखांद्यावर फुलले फुलोरे 
झाडाचे रुप नव्याढंगात साजिरे|

उमलते फुल प्रतिक प्रितीचं  
गुलाबी ढंगात सजण्याचं
नवलाईचं रुप काटेसावरीचं
दुसऱ्यांना हर्ष वाटण्याचं|

पंचकार खुलली पाकळ्यांची
गोलाकार तुराई पुंकेसरांची
गोडसर चव मकरंदाची 
फांद्यीवर नक्षी  रंगमाळेची|

मकरंद शोषायला भुंगे भ्रमरतात 
मकरंद खायला पक्षी झेपावतात 
मकरंद चाखायला माश्या आकर्षितात 
अनामिक वासाने परिसर गंधाळतात |

फुलांना गुलाबी रंगात खुलविते
वृक्षाचे सौंदर्य मनाला भुलविते
निसर्गाची रंगपंचमी आरंभिते 
रंग उधळण आविष्कारात दिसते |

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड