पुस्तक परिचय क्रमांक-१०४ फॉरेस्ट बाथिंग'











वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१०४

पुस्तकाचे नांव-फॉरेस्ट बाथिंग हरितवनातील स्नान

लेखकाचे नांव- हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस

अनुवाद-निलीमा करमरकर

प्रकाशक- मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती नोव्हेंबर २०२१

पृष्ठे संख्या--१७६

वाड़्मय प्रकार- ललित, 

किंमत /स्वागत मूल्य--२२५₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚

१०४|| पुस्तक परिचय

          फॉरेस्ट बाथिंग

लेखक:हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस

अनुवाद-निलीमा करमरकर

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃निसर्गाशी एकरूप होणं, नेत्रांनी सुखद दृश्ये अनुभवणं,कृतीयुक्त अनुभवांची शिदोरी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणारी प्रतिबंधात्मकउपचार पध्दती आहे. 

जंगलातील झाडं वेली,निर्झर,वारा ,ओहळ पक्षी, प्राणी हिंडायला घेऊन जाणारी अनवटवाट अथवा मळलेली वाट .अशा सृष्टी सौंदर्याने नटलेल्या परिसराला भेटणे.त्याच्याशी एकरुप होणं.देहभान विसरून रममाण होणं…..हेच जपानी चित्र लिपीतले निसर्ग प्रेमावर आधारलेले,अनुभवलेले कृतीयुक्त पध्दतींची शिदोरीचे पुस्तक आपल्या शब्दलिपीत अनुवादित साहित्यशिल्प केले आहे.

    तेच फॉरेस्ट बाथिंग…... हरित वनातील जंगल स्नान  ऊर्जा पुनः प्राप्त करण्याची जपानची 'शिनरिन-योकु' या पध्दतीचे यथार्थ दर्शन घडविणारे निसर्गप्रेमीसह सर्वांना निसर्गाशी ऋणानुबंध जपून संवर्धन कसे करावे. ही शिकविणारी उपचार पध्दत या पुस्तकात अनुभव सिध्द निसर्गप्रेमी लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी संशोधकांचे अनुभव व दाखल्यांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे. 

लेखिका निलिमा करमरकर मनोगतात सांगतात की,'जगभरात गाजलेले 'इकिगाई'हे पुस्तक त्यांना भावले.प्रकाशक मनोज अंबिके यांच्याशी चर्चा करताना त्यांनी 'फॉरेस्ट बाथिंग'

या पुस्तकाचे अनुवादित करण्याचे सुचविले.

हिरवाईने मानवाच्या तनमनाला होणारे फायदे प्रस्तुत केले आहेत.तत्त्वज्ञानाची बैठक,मांडणी ,चित्रे, आकृत्या,आलेख व पौराणिक कथा आदी स्वरुपात शब्दचित्र मांडले आहे.

तेवढ्याच सामर्थ्याने लेखिका निलीमा करमरकर यांनी या पुस्तकाचे अनुवादन सहज सुंदर समर्पक शब्दांत व प्रवाही ओघवत्या शैलीत केलेले आहे. जपानी शब्दलिपी,शब्दांची माहिती, प्रयोगशिलता, उपचार,सकारात्मक प्रतिसाद, आणि फायदे आदी बाबींचे विवेचन सुक्ष्मपणे चिकित्सक पणे मांडलेले आहे.

अनुवादित साहित्य कृती ''फॉरेस्ट बाथिंग" पुस्तक  मूळ लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांना समर्पित केले असून.

सहा विभागात जंगलस्नानाची उपचारक उपयोगी माहिती विस्तृतपणे मांडलेली आहे.

मात्सुओ बाशो यांचे सुंदर विचार प्रस्तुत केले आहेत.ते म्हणतात की,"बघायला गेलात तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला फुलासारखी दिसेल. विचार करायला गेलात तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला चंद्रासारखी वाटेल."

'वाकाWAKA'म्हणजे जपानी साहित्यातील काव्यशैली होय.त्यातील टांका छोट्या कवितांचा हायकू सारखा प्रकार.तर 'CHOKA चोका' हा प्रकार प्रदीर्घ कविता होय.त्याच प्रकारातील खालील कविता आपल्याला 'फॉरेस्ट बाथिंग'चे मर्म समजून येते.

फुलं पांघरलेल्या टेकडी मागून,डुबत्या  सूर्याला पाहणं|

 घनदाट जंगलात फिरताना, परतण्याची जाणीव न होणं|

 किनाऱ्यावरून टक लावून बोटिंकडे बघत बसणं|

 अन्य  कुठल्याशा बेटाआड त्यांचं अचानक नाहीसं होणं|

जंगली हंसांची भरारी, बघता बघता ढगात लपून जाते|

 बांबूच्या वनातील सावल्यांची सूक्ष्म, हळुवार हालचाल होत असते|

 चौदाव्या शतकात लिहिलेली  ही कविता वाचून, निसर्ग वाचकांना रसज्ञ बनविते. त्यांची तरलता जागृत करते. संवेदनशील आणि हळुवार मनाचे लोक कला प्रकारांमधील सौंदर्य जाणून त्यांचा रसास्वाद घेतात. खरं सांगायचं तर हेच तर "शिनरिन-योकु"हेच तर आहे. ज्यावेळी आपण मुक्तपणे शेतातून, जंगलातून फिरताना निसर्गसौंदर्याची उधळण झालेली दृश्यशलाका बघताना आणि तिथली शांतता अनुभवताना स्वतःला हरवून जातो. तिथला निसर्ग आपल्याला भुरळ घालतो. आपण मोहित होतो; तेव्हा तिथले मोहक अभिजात सौंदर्य खऱ्या अर्थाने आपण न्हात असतो.त्यात चिंब भिजून जातो.हे सर्व शांतपणे निरीक्षणाचे निरखण्याचे ,चिंतन करण्याचे क्षण म्हणजे 'युगेन'अशावेळी आपण निसर्गाच्या रहस्यमय सर्जनशीलतेचा खऱ्या अर्थाने एक भाग होऊन जातो…

अरण्यसहलीत मौल्यवान खजिना तन मनास लाभतो.जे लोक चालत वन भटकतात. अरण्ययात्री होऊन जातात त्यांच्या मनाला शांतता,प्रसन्नता लाभते.मोहजाळाला विसरुन निसर्गाशी एकरूप होऊन सर्व संवाद साधायला लावणारं सृष्टीचे सौंदर्य आहे.त्यात न्हाऊन कसं जायचं त्याची संशोधित उपचार पध्दत म्हणजे 'फॉरेस्ट बाथिंग'होय.

निसर्ग आपणाला देणारा आहे.शतपटीने तो आपल्याला मुक्तहस्ते उधळण करीत असतो.

औदासिन्य घालवून ताणतणाव कमी करण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी घराबाहेर पडून वृक्षांसोबत जवळीक साधण्याचा संदेश देणारे हे पुस्तक आहे…..

शिनरिन-योकु पध्दतीचा आनंद घेण्यासाठी स्वत:ला मानसिकदृष्ट्या सक्षम कसे करावे.याच्या पाच पायऱ्या आहेत.१)अनुभव घेण्यासाठी स्वत:ला मोकळं सोडा. २)फिरण्याचा रस्ता नक्की करायचा पण त्यात बदल करण्यास वाव ३)सावकाश,दीर्घ श्वसन करा. ४)मनावरचे मळभ झटकून टाका.

५)जंगलांशी एकरुप व्हा.

मूळ लेखक द्रव्यांनी अरण्याच्या सान्निध्यात सुशेगाद मुक्काम करून आलेले अनुभव निरीक्षणे आणि प्रयोग या पुस्तकात नोंदविले आहेत.अनेक पुरातन उदाहरण व दाखले दिलेले आहेत.भावनिक सकारात्मकता आणि सर्वसाधारण आरोग्य यात वृध्दी होण्यासाठी मानव व निसर्ग यांचे ऋणानुबंध महत्त्वपूर्ण आहेत.जंगलातले चैतन्य घरी कसे आणाल? वाबी-साबी,'शिनरिन-योकु'उपचार पध्दतीची माहिती,फायदे आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या ऊर्जेची बॅटरी रिचार्ज करणाऱ्या 'शिनरिन-योकु'पध्दत,युगेन, स्पर्श व संवेदना,हिरवे घर,शिनरिन-योकुची दहा तत्वे,फिटानसाईड उपचार पध्दती,….याविषयी माहिती करून घेण्यासाठी अनुभव सिध्द पुस्तक संग्रही असावे असे अनमोल विचार ठेवा आहे.तसेच आपल्या स्नेहीजणांना भेट द्यायला अत्यंत दर्जेदार पुस्तकं आहे…..

हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे.


@ श्री रविंद्रकुमार लटिंगे 

लेखन दिनांक १८ मार्च २०२२





Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड