ओम् नमः शिवाय ❗ श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा ❗ भटकंती भाग क्रमांक-१७४ 🌹☘️🍂🌹☘️🍂🌹🌹☘️🍂🌹 प्राचीन संगमेश्वर मंदिर, सासवड 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 हडपसर परिसरातील मित्रवर्यांची स्नेहभेट झालेनंतर सासवड मार्गे नारायणपूर वरुन घराकडे मार्गस्थ व्हायचं होतं म्हणून आम्ही सासवडला दिवे घाटातून निघालो.नेहमीप्रमाणे गाणी ऐकत आणि विविधांगी गप्पाष्टक करत अंतर कमी होत होते.संतश्रेष्ठ कैवल्याचे माऊली ज्ञानेश्वर महाराजांची पंढरीचीवारी याच घाटातून जातानाची चित्रफीत ,चित्रे अनेकवेळा बातम्यातून बघितलेले नजरेसमोरून येत होते.घाटातच एके ठिकाणच्या सेल्फिपाईंट जवळ गाडी बाजूला घेतली.आणि तिथलं निसर्ग सौंदर्य बघत बघत सेल्फिबध्द केले. घाटाच्या खाली पायथ्याच्या मस्तानी तलावाचे दृश्य हिरवळीत उठावदार दिसत होते.ते पाहून तदनंतर घाटमाथ्यावरुन चालतच पुढे निघालो.दिवेघाट समाप्तीच्या एके ठिकाणी डाव्याबाजूला कड्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडूरंगाची उभी विशाल मुर्ती डोळेभरून पाहिली.वारी...