माझी भटकंती प्रतापगड भाग क्र. २० ते २२
🐚माझी भटकंती🐚 क्रमशः भाग क्र वीस 🍁⛰️. प्रतापगड 🍁⛰️ एप्रिल २०१७ ❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️ पेठपार,कुंभरोशी ➖➖➖➖➖➖➖➖ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग इयत्ता चौथीच्या वर्गात सौ.प्रभावती कारंजकर बाईंनी गोष्टीरुपाने नजरेसमोर उभे केले होते...प्रतापगडचा रणसंग्राम पोवाडा श्रवण केला होता.......... शिवप्रताप दिन...थरार आणि रोमांचकारी अनुभव ऐकताना येतो.... मी प्रतापगडावर प्रथमतः माझ्या ओझर्डे शाळेच्या सहलीत, मित्रांबरोबर व कुटुंबियांसोबत गेलोय..कोंढावळे शाळेची सहल घेऊन गेलोय आमचे मित्र श्री उत्तम जरंडे यांची प्रशासकीय बदली वाडा कुंभरोशी येथे झाली होती.. तेव्हा त्यांच्या आग्रहास्तव मुक्कामी एप्रिल २०१७ मध्ये गेलो होतो...... आमचे मित्र श्री राहुल हावरे यांनी नवीन फोरव्हिलर गाडी घेतली होती.आम्ही ( श्री बाळकृष्ण पंडीत,श्री दिलीप कासुर्डे,श्री सुनील जाधव व मी ) नव्यागाडीसह देवदर्शन व पर्यटनासाठी सकाळची शाळा करुन मा...