पुस्तक परिचय क्रमांक:२४६ पोस्ट मास्तर आणि इतर कथा
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२४६ पुस्तकाचे नांव-पोस्टमास्तर आणि इतर कथा लेखक :रवींद्रनाथ टागोर अनुवाद -मृणालिनी गडकरी प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण जून,२०१७ पृष्ठे संख्या–१७० वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१६०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २४६||पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव-पोस्टमास्तर आणि इतर कथा लेखक:रवींद्रनाथ टागोर अनुवाद -मृणालिनी गडकरी 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य हे आनंदघन आहे.विचारांच्या सौंदर्याची खाण आहे.ते जेवढं एकाग्रतेने रसग्रहण करावं.तेवढी तृप्ती मिळते व ज्ञानलालसा वाढत राहते.म्हणूनच सगळं विलक्षण आनंददायी त्यांचं साहित्य आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्या काळी गुंफलेल्या कथा आजही तेवढ्याच ताज्या,टवटवीत आणि कालातीत वाटतात.म्हणजेच आधुनिक बंगाली कथांच्या पायऱ्या ठरलेल्या आहेत.या कथांचे लेखक आणि कवी एक महान साहित्यिक. १९१३ सालचे आशियातील पहिले नोबेल ...