स्वागत समारंभ
आठवणीत राहील असा विवाहाचा स्वागत समारंभ...
🌸✨🌹🍁🌹🍁 आदरणीय प्रतिभाताई
चि.वैभव आणि सौ.सिमरन नवदाम्पत्यांच्या शुभविवाह समारंभात आपण केलेल्या उत्कृष्ट, मनमोहक, बहारदार आणि आत्मीयतेने भरलेल्या आपलेपणाची भावना निर्माण करणाऱ्या आदरातिथ्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
आलिशान महाल शोभेल अश्या सुशोभित व वातानुकूलित प्रशस्त सभागृहात आपण स्वागत समारंभ आयोजित केला होता.तर स्नेह
भोजनासाठी नागपुरी खाद्यपदार्थांची रेलचेल एकसो बढकर एक मिठ्ठास गोड,तिखट,आंबटगोड, कुरकुरीत, खमंग,गरमागरम पदार्थांची मेजवानी स्टाटर ,मेस कोर्स ते आईस्क्रीम मनमुरादपणे चाखायला मिळाली.
आपल्या आदरातिथ्यामुळे आणि विलोभनीय व्यवस्थेमुळे हा समारंभ अविस्मरणीय ठरला.
आम्हालाही आमच्या विवाह सोहळ्यातील राहिलेल्या क्षणांची आठवण आली.ते डेकोरेटिव्ह सेट पाहून,मग काय मनमुरादपणे फोटोसेशन उभयतांनी केले.आणि आमचे फोटो इतरांनी चित्रित केले.हा अनोखा अनुभव याच समारंभात घेतला.
🍁आपल्या प्रेमळ स्वागताने आणि पाहुणचाराने आम्हाला घरच्याच वातावरणाची जाणीव झाली.
आपल्या या परिश्रम, आत्मीयता आणि सौजन्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद!
तसेच नवदांपत्यांच्या जीवनात सदैव प्रेम, सुख, समृद्धी आणि आनंद लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 💐
वाचन साखळी समूहावर निस्सिम प्रेम पेरणारी ,समस्त वाचक मंडळी भेटली.त्यामध्ये शैक्षणिक कार्य करीत आपला व्यासंग जपणारे पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या अक्षरयात्रींची स्नेहभेट झाली.
हा गगनात न मावणारा आनंद मिळाला... लग्न समारंभात क्षणभर फोटोग्राफी आणि स्नेह भेटीने छोटेखानी वाचन साखळीचे स्नेहसंमेलनच साजरे झाले..
आदरातिथ्य गोड, मनात प्रेम साठलं ,
मनभरे कौतुकाने, नयनी आनंदाश्रू दाटलं…
शुभविवाह सोहळा झाला अविस्मरणीय,
आपल्या आत्मीयतेस लाखो धन्यवाद ! 💐
श्री रवींद्र लटिंगे वाई
दादा... आपणा सर्वांची (वाचनसाखळी परिवार सातारा, पुणे, मुंबई ) मला सर्वाधिक आनंद देणारी होती. कुटुंबातील एखादी व्यक्ती अनुपस्थित राहिली असती तर काही वाटले नसते, पण आपण अनुपस्थित राहिले असते तर ते शल्य कायम माझ्या मनात राहिले असते. मोठ्या भावाने लहान बहिणीचे केलेले कौतुक वाचून महिनाभरापासून केलेल्या श्रमाचा क्षणात परिहार झाला. भावा बहिणीचे प्रेम असेच कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
ReplyDeleteहेच रक्षाबंधन साजरे झाले.
ReplyDelete