पुस्तक परिचय क्रमांक:२३१जपून पाऊल टाक



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२३१
पुस्तकाचे नांव-जपुन टाक पाऊल!
लेखक: वसंत पुरुषोत्तम काळे
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -द्वितीय नोव्हेंबर२०१८
पृष्ठे संख्या–१६८
वाड़्मय प्रकार-ललितकलादर्श 
किंमत /स्वागत मूल्य-२२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२३१||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव: जपुन टाक पाऊल!
लेखक: वसंत पुरुषोत्तम काळे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 समस्त मराठी रसिक वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले ख्यातनाम कथालेखक तथा कथाकार वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या कथा म्हणजे लेखण शैलीचा वेगळाच पॅटर्न.मनाचे विविधांगी रंग कुंचल्यासारखे लेखणीतून झरझर उतरविणारे रसिक वाचकांचे वपु. त्यांच्या कथांचा आस्वाद घेताना आपल्या सभोवताली असलेल्या पात्रांचे आपणास स्मरण होते.त्यांच्या सगळ्या कथा विचार आणि मनावर आधारित आहेत.विनोदी कथांतून हसवता हसवता एखादं शल्य भिडत राहतं आणि चटका लावून जाते.अश्या सगळ्या कथा असतात.
भालजी पेंढारकरांची नाट्यमुसाफिरी व.पु.काळे यांच्या शब्दात…..
 'जपुन टाक पाऊल'हा जेष्ठ कथाकार व पु काळे यांच्या लेखणीतून उतरलेली'ललितकला दर्शनात्मक' हृदगत प्रकटन आहे.असे जेष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांनी 'षड्ज-पंचम' या प्रस्तावनेच्या लेखात व्यक्त केले आहे.
 नाट्यमुसाफिरीतील अनुभवांचे कथन चिरंजीव
ज्ञानेशला सांगण्यासाठी या पुस्तकाचे लेखन भालजी पेंढारकर यांनी व.पु.काळे यांना सांगितले.ललितकलादर्श हे तीन पिढ्यांचे नेपथ्यकार आणि बापूंचे स्नेही सांगाती श्री.पु.श्री.काळे यांनी लेखन करुन पुढे त्यांचेच चिरंजीव श्री व.पु.काळे यांनी हा ग्रंथ लिहिला.
         हे एक अनुभव कथन आहे.लेखन प्रपंच कसा संपन्न झाला याचे विवेचन समारोपात केले आहे.ते म्हणतात की, "तुमचं आयुष्य अक्षरशः मी जगलो; आणि म्हणूनच हे लिहू शकलो."असे प्रतिपादन केले आहे.तुम्ही मनावर ताबा ठेवून जीवनातील अनेक कठीण प्रसंगाला सामोरे गेला आहात.
या ग्रंथ म्हणजे अनुभव कथन.अतिशय सहज सोप्या भाषेत लेखक व.पु.काळे यांनी लेखन केले आहे.काही सुखद,स्फूर्तीदायक क्षण , नाटकांच्या प्रवासातील किस्से आणि नाटकावर आलेल्या प्रतिक्रिया यांचे सहजतेने लेखन टिपकागदासारखे उठावदार केले आहे.
भालजी पुढे म्हणतात की, "मी त्यांचे आभार मानणे औपचारिकतेचे,परकेपणाचे लक्षण ठरेल.मी आपणास विनंती करतो की नीट हमदर्दीने कान द्या,ध्यान द्या म्हणजे यातील गंधार ऐकू येईल.पण यंदा कदाचित तो कोठे कणसूर वा बदसूर लागला,तर आपण क्षमा करावी.या तानपुऱ्याचा कान पिरगाळून त्याला सुरात आणण्याचा अधिकार तुम्हा सहृदय रसिकांना आहेच!"
     या ललितकलादर्श ग्रंथात एकूण अठ्ठावीस  लेखात अनुभव कथनाची मैफिल अतिशय ओजस्वी शब्दात  मांडली आहे.
ज्ञानेशने मला स्वर दिला,त्याच्या पित्याला!, अरे,आज बुवा आणि मी, दोघं गायलो!,
..अहो, ते पोर त्याच घराण्यातलं!
आज माझ्या ऐवजी हा गाईल!
आपणच प्रयोग करु या!
त्यागिला थारा!
ज्ञानेश, बुवांच्या स्मारकाची मी हेळसांड केली!
बनहट्टीच्या बायका आत आहेत!
..मी पेंढारकरांबरोबर काम करणार नाही!
...ज्ञानेश,योगच लागतात चांगले!
...मामा,थापा मारु नका!
...नरेश, तुला त्या नशेची काय गरज होती रे?
'दोन पाऊल?'; नव्हे 'मामा पाऊल'
बुडबड्यांनी तोंडाला बुडबुडा आणला!
चंदू,मी येणार आहे.
…कलाकारांचा फक्त गुणाकार; गणित कच्चे!
..जपुन टाक पाऊल!
गुरुकिल्ली 
आपण सगळे नारद!
… ‘चंदू,बा रे पांडुरंगा, भजन म्हण!’
‘…मा धाव ,मा धाव…’
माझी आचारसंहिता तयार होवू लागली.
तुला गुणिजन अवघे चाहते.
काशीचा विसर पडणं म्हणजे सुगंधाचा विसर पडणं!
अशीही माणसं असतात!
तू ससा झालास
ज्ञानेश,तो तानपुरा घे
आणि शेवटी…..
असं लेखन नाट्यमुसाफिरीचे भालचंद्र पेंढारकरांचे ललितकलादर्श व.पु.काळे यांनी रेखाटले आहेत…
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- ९जुलै २०२५






Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड