पुस्तक परिचय क्रमांक:२३३ अस्तित्व




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-२३३
पुस्तकाचे नांव-अस्तित्व
लेखक: सुधा मूर्ती
अनुवाद--प्रा.ए.आर.यार्दी
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -पुनर्मुद्रण जून, २०१८
पृष्ठे संख्या–१००
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-१००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२३३||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव: अस्तित्व
लेखक: सुधा मूर्ती
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
 भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कारविजेत्या प्रख्यात कन्नड साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या  आदरणीय सुधा मूर्ती. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि लेखिका म्हणून लोकप्रिय आहेतच. 'अस्तित्व'ही उत्कंठावर्धक आणि कुतुहल निर्माण करणाऱ्या कादंबरीच्या लेखिका कन्नड भाषेतील कादंबरीचा अनुवाद प्रा.ए.आर.यार्दी यांनी मराठीत केला आहे 
 मुकेश हा कृष्णराव आणि सुमतीचा चिरंजीव परदेशात नोकरी करत असतो.मुकेश आणि पत्नी वासंती वीकेंड पर्यटनासाठी हिमवर्षाव होणाऱ्या स्वित्झर्लंडला स्केटिंग करायला गेलेली असतात. अचानक वासंती झाडाला अडकून पडते.पायाचा स्नायू दुखावला गेला. त्यासाठी प्लॅस्टर करावे लागते आणि आठ दिवस हॉस्पिटलमध्ये थांबणे आवश्यक असते.त्याच दरम्यान मुकेशच्या बाबांना अॅटॅक आला आहे म्हणून अम्माच्या फोन येतो.मग तो वासंतीला सांगून भारतात बंगलोरला परततो. घरी जाण्यापुर्वीच रावसाहेबांचे देहावसान झालेले असते.
 बाबांच्या निधनानंतरच्या मृत्यूपत्राने मुकेशच्या आयुष्याला कलाटणी मिळते. सुखासमाधानात चाललेल्या आयुष्यात एखाद्या झंझावातासारखं वादळ येतं
आयुष्य बदलून जातं.कौटुंबिक बंध तुटून पडतात.आपलीच माणसं परकी वाटू लागतात.मग मुकेश सुमती आईच्या सल्ल्याने  खरा मुलगा कुणाचा?याचा शोध घेतो.जन्म देणारी,दुध पाजणारी आणि पालनपोषण करणारी माझी आई कोण? या सगळ्या मातांप्रती आदरभाव व्यक्त करणारा मुकेश उर्फ मुन्नाची ही कादंबरी वाचताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. नाते संबंध कसे असतात अन् एखाद्या घटनेमुळे नात्यांमध्ये दुरावा कसा निर्माण होतो ती कथा म्हणजे 'अस्तित्व'होय.
  सहज सुंदर शब्दसाजात ही कादंबरी अनुवादक प्रा.ए.आर.यार्दी यांनी रेखाटली आहे.
जन्म देणाऱ्यापेक्षा पालनपोषण करत संस्कार करणारे कुटुंब मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे.ते त्याच्या आचरणात असतात. हेच पटवून देणारी ही कादंबरी आहे.वाचताना आपण काही प्रसंगी भावनाविवश होवून जातो. असं खरंच घडलं असेल काय?असा प्रश्न मनात रुंजी घालत राहतो.
 वाचक रसिकांना खिळवून ठेवणारी ही कादंबरी अनेक भाषेत वेगवेगळ्या नावाने अनुवादित झालेली आहे.भविष्याचा वेध घेताना वर्तमानाची जाणीव ठेवत आपल्या भुतकाळाचे सिंहावलोकन करणारा मुकेश या कादंबरीचा नायक असून कोणतेही निर्णय घेताना इतरांना स्वातंत्र्य देणारा भावतो.भावनिक गुंतवणूकीतील कोमलता लयबध्द शब्दात मांडली आहे.अम्मा आणि  रावसाहेबांनी पोटच्या मुलासारखे प्रेम केले.यांच्या पायगुणामुळेच त्यांच्या घरी लक्ष्मी नांदू लागली आणि ऐश्वर्य संपन्नता आली.ते मुकेशच्या गळ्यातील गळ्यातील सोनसाखळीने,कारण तीच सोनसाखळी  गहाण ठेवून शिलाई मशीन सुमती आणि रावसाहेबांनी घेतले होते.त्यामुळेच त्यांनी दिल्लीत मुकेश गारमेंटस् सुरू केले होते.
प्रत्यक्षात मुकेश (मुन्ना)रुपिंदरचा नसून अमेरिकेत असताना रेड इंडियन असणाऱ्या शंटो आणि नेनी बिगाट यांचा द्वितीय पुत्र होता.त्याचे आईवडिल कार अपघातात मृत्यू पावले होते.रुपिंदर आणि सुरिंदर पंजाबी जोडीने बिगाट कुटुंबातील कोणीतरी मुन्नाला न्यायला येईपर्यंत त्याचा संभाळ केला होता.सहा महिन्यांनी पोलिस आले.आणि म्हणाले,”तुम्ही याला दत्तक तरी घ्या नाहीतर अनाथाश्रमात ठेवा.” अनाथाश्रमात ठेवायला रुपिंदरचे मन धजवत नव्हते पण सुरिंदर एका पायावर तयार होता.शेवटी रुपिंदर पतीवर रागावून मुन्नाला दत्तक घेतले.
अशी मुन्ना उर्फ मुकेश नेमकं अस्तित्व अधोरेखित करणारी, नियतीने दिलेल्या अस्तित्वाचे परिमार्जन करणारी भावस्पर्शी कादंबरी ‘अस्तित्व.’अतिशय मनाला भावनिक करणारी अनुवादित साहित्यकृती 
वाचायला मिळाली…अप्रतिम कादंबरी आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक:१२जुलै २०२५




Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी