पुस्तक परिचय क्रमांक:२३६ अस्थी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२३६
पुस्तकाचे नांव- अस्थी
लेखक:वि.स.खांडेकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण ऑगस्ट ,२०१३
पृष्ठे संख्या–४०
वाड़्मय प्रकार- कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२३६||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-अस्थी
लेखक:वि.स.खांडेकर
📚📚📚📚📚📚📚📚📚
मराठी साहित्यातील पहिले ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते ख्यातनाम साहित्यिक
वि.स.खांडेकर यांचे नाव आदराने उच्चारले जाते.साहित्याच्या सर्वंच प्रांतात
नाममुद्रा उमटविणारे सरस्वतीचे उपासक
पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले जेष्ठ साहित्यिक. कुमारवयातील मुलांसाठी संस्काराचे शिंपण करणारा छोटेखानी कथासंग्रह ‘अस्थी’.सत्ता, पैसा, मोठेपणा यांच्या राक्षसी हव्यासापोटी माणूस कधी कधी आपल्या जिव्हाळ्याच्या नात्यागोत्यांचा, सद्सद्विवेकबुध्दिचा आणि माणुसकीचा गळा घोटतो.मृत व्यक्तीच्या अस्थी गंगेत टाकून त्या व्यक्तीला मुक्ती दिल्याचं समाधान तरी मानता येते.पण मेलेल्या माणुसकीच्या अस्थी कोठे टाकायच्या?हा प्रश्न अनुत्तरित करणारा आहे.स्वता:च्या बडेजावीसाठी,भौतिक सुखलोलुपापायी माणूस इतरांना तुच्छ लेखतो. माणुसकीपेक्षा पैसा माणसाला महत्वाचा वाटू लागला आहे.
‘अस्थी’ कथासंग्रहात सहा कथा असून या
कथांचे बीज जीवनातील मूलभूत प्रश्न
मांडले आहेत.त्यातील गरीबीमुळे माणसांना जगायला कसा संघर्ष करावा लागतो.याचं ज्वलंत उदाहरणं म्हणजे यातील कथा आहेत.अतिशय भावस्पर्शी शब्दात त्यांनी वाचा फोडली आहे.या कथा सदसदविवेकबुध्दीला जाग आणतात. आणि अलगद त्यांच्या मनावर उच्च नैतिक मूल्यांचे संस्कार करतात.
अस्थी म्हणजे माणसाच्या मृत्यूनंतर उरलेली पसाभर राख आणि मूठभर हाडं.
हीच माणसाची अंतिमतः किंमत.या पुस्तकात अस्थी,नवस, कैदी,कवी,एक शिला आणि वृक्ष या कथा आहेत.
यातील शीर्षक कथा अस्थी.माणुसकीचा चेहरा आणि मुखवटा टराटरा फाडणारी जबरदस्त वैचारिक मंथन करायला उद्युक्त करणारी कथा आहे.बालपणीच्या मित्राला
शाळेत असताना जेव्हापासून मदत केली.देशासाठी तुरुंगात गेला.त्याला नेहमी गरीबांचा कळवळा असायचा.अश्या मित्राचे संपतचे स्थान काशिनाथ कुलकर्णी यांच्या हृदयात होते.परंतू कालौघात माणूस कसा बदलतो.हे प्रत्यक्षपणे कुलकर्णी यांनी संपतची गावी भेट घेऊन अनुभवलं.म्हणून ते म्हणतात की, “मृत व्यक्तीच्या अस्थी गंगेत टाकून त्या व्यक्तीला मुक्ती दिल्याचं समाधान तरी मानता येते.पण मेलेल्या माणुसकीच्या अस्थी कोठे टाकायच्या?”जीर्ण,शीर्ण, विदीर्ण झालेल्या मानवी आत्म्याच्या अस्थी टाकायला या जगात कुठं जागा आहे? ती
कहाणी ‘अस्थी.’
सागरदेवाला साकडे घालणाऱ्या कोळी बांधवांची कथा ‘नवस’.मोठे मासे रापणीत भरपूर यावेत आणि शिंपल्यातून मोती भरपूर मिळावेत यासाठी देवाला नवस बोलणारे कोळी.पण देव त्यांचा नवस पूर्ण करीत नाही.त्यामुळे त्यांना कमाई जादा होत नाही.मग त्या दोघांच्या बायका देवळात येतात.समाधानी जीवन काल कसं होतं यावर त्या चर्चा करतात.
कामासाठी दाहीदिशा वणवण भटकणाऱ्या गरीब लोकांची कहाणी कैदी.
अतिशय भावूक आहे.एक राज्यातून दुसऱ्या राज्यात केवळ ऐकीव माहितीवर रोजगारासाठी आलेल्यांची कथा.त्यातील जख्ख वृद्ध म्हणतो तेच खरं. ‘’आपण सारे कैदी आहोत बाबा,या पोटाचे कैदी.ते नेईल तिकडे जावं लागतं आम्हाला.’’
खऱ्या कवीची नेमकंपण पटवून देणारी गोष्ट ‘कवी’. दगडांचा आपण अनेक ठिकाणी उपयोग करतो.अगदी देवापासून ते कळसापर्यंत दगडांचा हरघडी उपयोग. त्या दगडाची कथा एक शिला.
झाडाला आपल्या इतर झाडांचं सुख बघवत नाही.त्याला मळभ येते.मग ते झाड ऋषीकडून मिळालेल्या वराचा उपयोग करून घेतो.पण त्या त्या ठिकाणी जास्त वेळ रममाण होत नाही.त्याला
आपल्यापेक्षा इतरांचे सुखानुभव मिळावेत असं वाटतं.पण हरेक ठिकाणी सुखदुःख असतेच.याची त्याला प्रचिती झाल्यावर तो शेवटी माळरानावर ऋषीला न्यायला लावतो.अशी वृक्ष कथा..
अतिशय समर्पक शब्दात संस्कारक्षम कथांचे बीजांकुरण ख्यातनाम लेखक श्री वि.स.खांडेकर यांनी केले आहे.त्यांच्या लेखणीस विनम्र अभिवादन!!!
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- १ ९ जुलै २०२५

Comments
Post a Comment