सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव






🍁🌹आमचे शिक्षक सन्मित्र श्रीमान राजेंद्र जाधव सर ओझर्डे गावचे सुपुत्र  ३१ऑगस्ट २०२५रोजी  नियत वयोमानानुसार वरिष्ठ मुख्याध्यापक 
पदावरून सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या शैक्षणिक कर्तव्य पुर्तीच्या सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा 🌹 
  सातारा जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयाच्या वार्षिक क्रिडा स्पर्धेत कबड्डीत आपण नेत्रदीपक
पकड करत,क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालयास विजेतेपद मिळवून देण्यात आघाडीवर होतात.
 फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील प्राथमिक शाळेत आपण शैक्षणिक सेवेचा श्रीगणेशा केलात. तदनंतर आपली बदली वाई तालुक्यातील दुर्गम भागातील वासोळे,कणूर, पांडे,देगांव येथे झाली. तेथील ज्ञानमंदिरात अध्यापकाचे प्रभावी कामकाज केलेत.
  आपल्या ओझर्डे ग्रामभूमीजवळील पांडे शाळेत झाली.इथेच खऱ्या अर्थाने आपणास कलागुणांना सादर करण्याची संधी मिळाली.शिक्षकवृदांच्या सहकार्याने श्री भैरवनाथ नवरात्र उत्सवात साजरा झालेला शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम बहारदार
आणि नाविन्यपूर्ण असायचा.ढोलकी हार्मोनियम वादक आणि गायकांसह सादर व्हायचा.प्रेक्षकांची
वाहवा मिळायची.
 उळुंबबलकडी येथील प्राथमिक शाळेत वरिष्ठ मुख्याध्यापकपदी आपणास पदोन्नती मिळाली.
तदनंतर आपली जायगुडेवाडी शाळेत बदली झाली.
२०२४साली वरिष्ठ मुख्याध्यापक तडवळे संमत  ता.कोरेगांव येथे  पुनश्च पदोन्नती स्विकारलीत. शिक्षकवृंदांच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळांची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धित करण्याचा प्रयत्न केलात.
 आपण सेवेच्या ठायी कार्यतत्पर राहून सर्वच विद्यालयात शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावत अनेक यशवंत गुणवंत विद्यार्थी निर्माण केलेत. शालेय शिस्त, कृतीयुक्त आनंददायी अध्यापन, सर्वांना सोबत घेऊन केलेले उठावदार शैक्षणिक कार्य आणि संघटनेचे शिलेदार म्हणून केलेले कार्य आम्हास मार्गदर्शक दीपस्तंभांसारखे आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले सांस्कृतिक कार्यक्रम,गीतमंच,सांघिक कवायत, लेझीम पथक, कलाविष्कार साक्षरता अभियान आणि क्रिडा स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी नैपुण्य मिळवले.
आपले संपूर्ण शैक्षणिक जीवन हे प्रेरणादायी कार्य,निष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या अपार प्रेमाने उजळलेले आहे. शिक्षण क्षेत्रातील आपले योगदान अमूल्य आहे.आपण अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान,संस्कार आणि मूल्यांचे बीज रुजवलेत.आज त्या असंख्य विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनात तुमचा मोठा वाटा आहे, हीच आपल्या कार्याची खरी शिदोरी आहे.या शैक्षणिक कार्यात 
सौभाग्यवती निर्मला जाधव मॅडम यांची आपणास 
उस्फुर्त साथ लाभली.
    आपल्या शैक्षणिक कार्याला शाबासकीची कौतुकाची थाप आदर्श शिक्षक पुरस्काराने 
मिळाली.प्राथमिक शिक्षक ते वरिष्ठ मुख्याध्यापक असा आपला शैक्षणिक प्रवास फलटण,वाई आणि कोरेगाव तालुक्यात संपन्न झाला.
   सेवानिवृत्ती हा जीवनप्रवासाचा उत्तरार्ध असलातरी,नव्या स्वप्नांच्या,नव्या अनुभवांच्या आणि आनंदी क्षणांच्या वाटेवरचे एक सुंदर पाऊल आहे. आगामी जीवनप्रवास आपल्यासाठी अधिक सुखकर, निरोगी, उत्साही आणि आनंदमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
🌹🌹
शुभेच्छुक 
श्री रवींद्रकुमार लटिंगे मुख्याध्यापक मॉडेल स्कूल माझेरी


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड