डी.एम.पोळ सेवापुर्ती शब्दांकन

🍁सेवापुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा!!! आपले मित्रवर्य व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालेघर येथील पदवीधर शिक्षक श्रीमान डी.एम. पोळ सर नियतवयोमानानुसार ३१जानेवारी २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यानिमित्ताने लेखन प्रपंच. श्री.पोळ सरांचा शैक्षणिक सेवेचा श्रीगणेशा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाटण तालुक्यातील बेलवडे खुर्द येथे १९९२ साली झाला.सात वर्षाच्या काळात त्यांनी शाळेचा चेहरा मोहरा सहकारी शिक्षकांच्या सहकार्य बदलून शाळेचा नवा आयाम निर्माण केला.तदनंतर सरांची स्व:तालुक्यात वाईला बदली झाली.पुर्वी तालुका मास्तर कार्यालय म्हणून असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा बोपर्डी येथे ते रुजू झाले. विद्यार्थीप्रिय उपक्रमशीलता जोपासत शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले. दरम्यानच्या काळात संगणकीय शिक्षण घेतलेले शिक्षक अध्ययन अध्यापन आणि कार्यालयीन कामासाठी संगणकाचा वापर करणारे तंत्रस्नेही होते.त्यांच्यातील हे कौशल्य तत्कालिन गटशिक्षणाधिकारी श्री राजेंद्रजी बाबर साहेब यांनी हेरुन त्यांची सर्व शिक्षा अभियान काळात गट समन्वयक म्हणू...