रुखवताचे उखाणे, आला आला रुखवत

लग्नसोहळयातील रुखवताचे उखाणे आला आला रुखवत त्यात होता सातारी कंदी पेढा विहीणबाई चला आता आम्हाला पयलं जेवायला वाढा. आला आला रुखवत त्यात होती कुरकुरीत टोस्ट अन् खारी विहीणीच्या नाकापेक्षा नथीचंच वजन लय भारी. आला आला रुखवत त्यात होती स्टीलची डबी उघडून बघितली तर आत दिसतेय आत्यासाबांची छबी लग्नात नवरदेवाचे आगमन,हळदी, जेवणावळी, मानपान,श्रीवंदन,मंगल सोहळा आणि आहेर झाल्यानंतर नवरीची पाठवणी करायच्या अगोदर रुखवत बघायचा कार्यक्रम असायचा. सगळी बायामाणसं (महिला) तिथं जमायची.खाद्य पदार्थांच्या दुरड्या मध्ये मांडून रुखवत सुरू होयचा.वराकडील महिलांना नवरी कडील महिला मंडळी हळदकुंकू लावून एकमेकींना रुखवताची दुरडी उघडायच्या अगोदर उखाणा घेण्याची लडिवाळपणे आग्रह करायच्या. नवरानवरी कडील विहीणीबाई, आत्या, मावश्या आणि आज्या एकमेकींना उखाण्यातून लगीनघाईचं कौतुक करीत जेवणावळीची स्तुती करीत उखाण्यातून टोमणे मारायच्या.ते एकूण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलायचं.'घे गं घे गं उखाणा तुला चांगला जमतो',असं लडिवाळपणे एकमेकीला फोर्स क...