२०२३ माझा लेखाजोखा

२०२३ या वर्षातील माझा लेखाजोखा ! नववर्षांत आपण शुभारंभी अनेक संकल्प मनात योजतो. काही नवीन घटना प्रसंगातून सुखदुःखाची झालर चिकटते.तर काही व्यक्तींच्या सहवासाने आनंदाचे तोरण सजते. काही संकल्प नव्याच्या नऊ दिवसाप्रमाणे तिथंच विरुन जातात तर काहींची पूर्तता कमी-अधिक होते. काही नवीन सत्कृत्ये तडीस जातात. काही ऐनवेळी सुचतात. मनातील भावनांना आकार ऊकार मकारात बांधून शब्द कागदावर उमटतात. यापैकी काही सत्कार्य आठवतील तशी शब्दातून व्यक्त करतोय.. माधवबाग आरोग्य सेवेच्या माध्यमातून उत्तम शरीरसंपदेसाठी १०किलो वजन व्यायाम,आहार, पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचारांनी कमी केले.याचं बहुतांशी श्रेय माझ्या कारभारनीला जाते.फेसबुकवर रील करायला शिकलो. खिद्रापूर, राजापूर, नरसिंहवाडी, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कुरुंदवाड येथील समाधी स्थळास भेट. मेरुलिंग आणि धोमधरण पाणलोट क्षेत्रात कुटूंबा समवेत भटकंती केली. टेबललॅण्ड पठार भटकंती.श्री छत्रपती संभाजी राजे समाधी स्थळ तुळापूर व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीस भेट.अप्पूघर पुणे. सोनजाई व गणेश मंदिर मित्रांसमवेत भटकंती.श्री क्षेत्र वीर.न...