सेवापुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा जरंडे बापू






🍁सेवापुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

आमचे सन्मित्र श्रीमान उत्तम सखाराम जरंडे मुख्याध्यापक प्राथमिक शाळा आसरे आज नियत वयोमानानुसार ३८वर्षांच्या शैक्षणिक सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.निसर्गाचे वरदान लाभलेल्या वाई तालुक्याच्या पश्चिमेस धोम धरणाच्या अवतीभोवतीचा जलाशय, रायरेश्वर डोंगररांगेतील हिरवीगर्द वनराई आणि अन् त्यामधील पायथा,माची ते माथा वसलेल्या गावात पायवाटेने पोहचतो.अशा छोटेखानी वाडीवस्तीच्या गावागावात जरंडे बापूंनी ज्ञानार्जन केले.सेवेचा श्रीगणेशा स्वग्राम जवळील जीवन शिक्षण विद्यामंदिर खावली येथे झाला. तदनंतर घेराकेंजळ, बारसेवाडी सारख्या दुर्गम भागातील एकशिक्षकी शाळेत झाली. वडवली पुन्हा खावली, कुंभरोशी (महाबळेश्वर) आणि आसरे येथे ज्ञानार्जन करण्याची संधी मिळाली.आपल्या विनम्र,शांत,मितभाषी स्वभावाने, विद्यार्थी प्रियतेने आणि अध्यापन कार्य कौशल्याने सेवेतील शाळांचा चेहरामोहरा सहकारी शिक्षक,विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने बदलला.खावली येथे त्यांनी परसबाग पालेभाज्या फळभाज्या आणि मनमोहक फुलांनी बहरवलेली होती.परसबागेतील फळभाज्यांचा उपयोग पोषण आहारातील मेनू चवदार बनविण्यासाठी केला जात होता.सरांनी मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम,वृक्षारोपण, श्रमदान, लेझीम पथक आणि विविध स्पर्धांचे आयोजन केलेले होते.बारसेवाडी शाळेत असताना मुलांच्या लेझीम पथकाने तर आसरे पंचक्रोशीतील यात्रा,हरिनाम सप्ताह आणि उत्सव समारंभात नावलौकिक वाढविला होता.स्वच्छता अभियान काळात 'स्वच्छता दूत' मास्टर ट्रेनर म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.
     कार्यरत राहिलेल्या सर्वच शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सहाध्यायी आणि पालकांचे सहकार्य मिळाल्याचे ते आवर्जून नमूद करतात.त्यांना वाई तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांचे अनेकविध विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.अचानक भेटीतून सरांशी हितगुज साधतात. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्यास मनपुर्वक वंदन आणि सेवानिवृत्तीस हार्दिक शुभेच्छा!!!
त्यांचा आम्हा मित्रांसाठी खास गुण म्हणजे आपल्या हातांनी खमंग आणि चवदार भोजन बनवून स्नेहीजणांना आग्रहाने वाढून तृप्तता करणे.निसर्ग भटकंतीचा आणि पर्यटनाचा स्वानंद घेऊन इतरांना आनंदीआनंद वाटणे.असे आमचे स्वभावाने आणि मनाने हसरे असणारे मित्रवर्य बापूंना सेवापुर्तीच्या पुनश्च: हार्दिक शुभेच्छा!!! 🌹

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड