गमभन दिवाळी अंक...
'गमभन २०२३' दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली काव्यरचना 'वाट' शिक्षण विभाग पंचायत समिती, वाई आयोजित अध्यापक आणि बालकांच्या लिखित अभिव्यक्तीला आणि अनुभवांना शब्दबद्ध करण्याची संधी 'गमभन' या दिवाळीतून लाभली.अनेकाविध विषयातून मनभावन विचारांचे सौंदर्य सर्जनशीलतेने शब्दरुपात आविष्कारले आहे. लिहित्या हातांना प्रेरणा आणि आत्मबळ देण्याचे मौलिक कार्य अशा उपक्रमांतून घडतेय.दिवाळीत फराळाच्या मेजवानी सोबत रसिक वाचकांना शब्दांच्या रंगावलीतील काव्यरचना आणि स्वानुभवाने गुंफलेले लेख रसग्रहण करायला प्रसिद्ध केले आहेत.संकल्पक ,कल्पक व प्रेरक, संपादक, संपादक मंडळ, मार्गदर्शक, नवसाहित्यिक या सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन! 🌹 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.....
Comments
Post a Comment