वनराई बंधारा.....
कोंढावळे येथे श्रमदानातून उभारला वनराई बंधारा.....
वाई : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.भविष्यात शेती आणि पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून गावातील ओढे ओहळीवर गरजेप्रमाणे छोटेखानी वनराई बंधारे बांधून जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून पाणीसाठा वाढविणे गरजेचे आहे .यासाठी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन वाई तालुक्यातील दुर्गम भागातील कोंढावळे येथील बावीच्या ओढ्यावर महाराष्ट्र शासन कृषी विभाग,शेतकरी, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळेतील बालचमू, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ,युवा कार्यकर्ते, कृषी कर्मचारी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून सुमारे ३० फुट लांबीचा वनराई बंधारा बांधण्यात आला. सहकार्यातून अनेक चांगली कामे घडू शकतात.केवळ दोन तासांच्या श्रमदानातून हा बंधारा बांधला गेला. यामुळे पाण्याची पातळी तीन फुटांपर्यंत वाढली.
हे काम पुर्णत्वास नेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी श्री प्रशांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक श्री सोमनाथ पवार,श्री प्रशांत सोनावणे साहेब,श्री सुनिल जाधव,श्री रवींद्रकुमार लटिंगे,सौ रत्नमाला कोंढाळकर, सौ.वैशाली कोंढाळकर, महिला, तरुणवर्ग आणि शेतकरी ग्रामस्थ यांचे अनमोल सहकार्य मिळाले. तसेच आमच्या शाळेतील स्काऊट गाईड पथकातील बालचमूंनीही या कार्याला हातभार लावला…
Comments
Post a Comment