प्राथ.शाळा: कोंढावळे वर्धापनदिन स्नेहमेळावा
घंटा वाजली शाळा भरली.अन् स्नेहमेळाव्याची तासिका सुरू झाली……
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ६९वा वर्धापनदिनाचा स्नेहमेळावा १९५४ साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करुन साजरा करण्यात आला.
गावचे वैभव जसे देवालय त्याचप्रमाणे गावची शान विद्यालय असते.ज्ञानाने माणसाची इमेज निर्माण होते.या प्राथमिक शाळेत तुम्ही शिकून लहानाचे मोठे झालात.अवगत केलेल्या ज्ञानाची शिदोरी घेऊन जगाच्या बाजारात उदरनिर्वाहासाठी जावं लागतं.तुम्ही यशस्वीपणे जीवन जगत आहात.तुमच्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी तुम्हाला ज्ञानच उपयोगी पडले.ज्ञान हे त्रिकालात चिरंतर असते.शाळेतील दिवसात आपण केलेल्या खोड्या,खाल्लेला मार, अभ्यास न केलेबद्दल दिलेली शिक्षा, खेळाच्या स्पर्धेतील गमतीजमती, सांस्कृतिक कार्यक्रमातील बहारदार नृत्याभिनय, वनभोजन करताना उडालेली भंबेरी, भाषण करताना झालेली अवस्था,शाळेला मारलेली दांडी कारण सांगताना दिलेली थाप,परिपाठ आदी गोष्टी आठवतात. मोठ्या अभिमानाने त्याबद्दल आजमितीला गप्पा मस्करीत चर्चा करतो.आज काहीवेळ ते क्षण पुन्हा वर्गात बसल्यावर आठवले.'पंचवीस वर्षांनंतर आज आम्ही लटिंगे गुरुजींच्या तासाला बसलो.'तेंव्हाच्या शिकविण्याची आठवण आली.'असे उद्गार भीमाजीने काढले.त्याच आवेशात गुरुजींनी जीवनशिक्षणाचे महत्त्व सांगितले.तुमच्या मुलांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हल्लीच्या स्पर्धेच्या युगात मुलांना केवळ उच्च शिक्षण न देता कौशल्यधारित शिक्षण द्या.तोच करारी आणि स्पष्ट आवाज ऐकायला मिळाला.ज्या शाळेत तुम्ही शिकून मोठे झालात त्या शाळेशी तुमचे ऋणानुबंध टिकवून ठेवा.असे प्रतिपादन मुख्याध्यापक श्री रवींद्रकुमार लटिंगे यांनी केले.
यावेळी १९५४सालातील जेष्ठ माजी विद्यार्थी श्री.पांडुरंग कोंढाळकर, श्री मारुती कोंढाळकर पाटील श्री मारुती कोंढाळकर,श्री शंकर कोंढाळकर,श्री राजाराम कोंढाळकर, श्री.लक्ष्मण कोंढाळकर,श्री चंद्रकांत कोंढाळकर, श्री हरिभाऊ कोंढाळकर,श्री मारुती कोंढाळकर,श्री किसन कोंढाळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच प्रातिनिधिक स्वरूपात श्री गणपत महादेव कोंढाळकर, श्री सुरेश गणपत कोंढाळकर आणि कु.वेदिका सुरेश कोंढाळकर यांचा प्रातिनिधिक सन्मान कु.तृप्ती सावंत हिच्या हस्ते करण्यात आला.तसेच या शाळेतील कार्यरत शिक्षकवृंद श्री रवींद्रकुमार लटिंगे,श्री सुनिल जाधव,सौ वर्षा पोळ,सौ नलिनी मुसळे आणि अंगणवाडी सेविका सौ रत्नमाला कोंढाळकर यांनाही सन्मानित करण्यात आले.माजी विद्यार्थी म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात श्री रामचंद्र कोंढाळकर यांचाही सत्कार मुख्याध्यापक श्री रवींद्रकुमार लटिंगे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी रामचंद्र कोंढाळकर यांनी मनोगत व्यक्त करुन शाळेला सहकार्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री रोहिदास कोंढाळकर यांनी केली. सर्वांचे स्वागत शाळेच्या बालचमूंनी स्वागतगीत गाऊन केले.स्नेहमेळाव्यास बहुसंख्येने माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.आभार श्री सुनिल जाधव यांनी मानले.तदनंतर इ.७वीच्या वर्गात लटिंगे गुरुजींनी तास घेऊन माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून गप्पागोष्टी केल्या..
Comments
Post a Comment