२०२३ माझा लेखाजोखा





२०२३ या वर्षातील माझा लेखाजोखा !
 नववर्षांत आपण शुभारंभी अनेक संकल्प मनात योजतो. काही नवीन घटना प्रसंगातून सुखदुःखाची झालर चिकटते.तर काही व्यक्तींच्या सहवासाने आनंदाचे तोरण सजते. काही संकल्प नव्याच्या नऊ दिवसाप्रमाणे तिथंच विरुन जातात तर काहींची पूर्तता कमी-अधिक होते. काही नवीन सत्कृत्ये तडीस जातात.
काही ऐनवेळी सुचतात. मनातील भावनांना आकार ऊकार मकारात बांधून शब्द कागदावर उमटतात. यापैकी काही सत्कार्य आठवतील तशी शब्दातून व्यक्त करतोय..
   माधवबाग आरोग्य सेवेच्या माध्यमातून उत्तम शरीरसंपदेसाठी १०किलो वजन व्यायाम,आहार, पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचारांनी कमी केले.याचं बहुतांशी श्रेय माझ्या कारभारनीला जाते.फेसबुकवर रील करायला शिकलो.
  खिद्रापूर, राजापूर, नरसिंहवाडी, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कुरुंदवाड येथील समाधी स्थळास भेट. मेरुलिंग आणि धोमधरण पाणलोट क्षेत्रात कुटूंबा समवेत भटकंती केली. टेबललॅण्ड पठार भटकंती.श्री छत्रपती संभाजी राजे समाधी स्थळ तुळापूर व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीस भेट.अप्पूघर पुणे. सोनजाई व गणेश मंदिर मित्रांसमवेत भटकंती.श्री क्षेत्र वीर.निडसोशी संकेश्वर येथील मठास मित्रांसमवेत भेट
  ऊनसावली स्मरणगंध,शिमग्याची सोंगे आणि आई माझे दैवत हे लेख दैनिक सकाळच्या सातारा आवृत्तीत 'शब्दांकुर' सदरात प्रसिध्द झाले. क्रिकेटच्या ऐश्वर्या लेखिका नीता छापले या पुस्तकाचा परिचय दैनिक लोकमत कोल्हापूर आवृत्तीत प्रसिध्द झाला.गमभन २०२३ या शिक्षकांच्या दिवाळी अंकात 'वाट' कवितेस प्रसिध्दी मिळाली.
१३ पुस्तकांचा पुस्तक परिचय वाचन साखळी समूहावर प्रसिध्द झाला. राज्य स्तरीय वाचनयात्री पुरस्कार सोहळ्याचे संयोजन आणि आयोजन. पंगत जेवणाची गंमत मेजवाची या सदराचे ब्लाॅगवर लेखन.नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,
वाचनालयास २५ पुस्तके भेट दिली. कविता तुझी माझी या समूहाच्या काव्यमहोत्सव व संमेलनात  रसिक प्रेक्षक म्हणून उपस्थिती
    सेवानिवृत्त शिक्षक मित्रवर्यांच्या सेवागौरव समारंभात व कोंढावळे येथील ऐतिहासिक कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली.
       आईच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आमच्या समाजाच्या सांस्कृतिक भवन बांधकामास २११११रुपये देणगी दिली.५० कुटूंबियांना भगवान श्री जिव्हेश्वर यांची प्रतिमा स्मृतिप्रीत्यर्थ भेट दिली.बऱ्याच वर्षांनी आमच्या गावची सोंगं बघितली.
वनराई बंधारा कोंढावळे येथे बांधण्यात सक्रिय सहभाग……
दिवस उगवतो दिवस मावळतो…
पण आपल्या क्षणांच्या पाऊलखुणा अधोरेखित करतो…
धन्यवाद २०२३…..

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड