डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन
प्रज्ञासूर्य,भारतरत्न, उच्चविद्याविभूषित, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना १३१व्या जयंतीनिमित्त पवित्रस्मृतीस विनम्र अभिवादन ❗
देशाच्या संविधानाचे शिल्पकार
दिनदलितांचे कैवारी झाले
बाबासाहेबांच्या जन्म आम्हाला
न्याय आणि हक्क देऊन गेले
अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर
उच्चविद्याविभूषित किताब मिळविले
दिनदलित गोरगरीब वंचितांच्या
न्याय्य हक्कासाठी सदैव झगडले
प्रज्ञा शील समतेचा पुरस्कार करुन
बांधवांचा आत्मसन्मान जागविला
शिका संघटित व्हा संघर्ष करा संदेशाने
वंचित गोरगरिबांचे कल्याण करायला
पुस्तकांच्या मैत्रीने राजगृहाला
ज्ञानाचा महासागर बनविले
विद्वत्तेच्या तेजाने परखडपणे
आपले विचार व्यक्त केले
मानवतावादी माणूसकीची पूजा केली
ताठ मानेने जगण्याची उमेद आली
अस्पृश्यता निवारणाचे कार्योध्दारक
दिनदलित गोरगरीब जनतेचे रक्षक
स्वातंत्र्य,समता,बंधुतेची शिकवण देणारे
प्रज्ञासूर्य महामानव आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर….आपल्या बहुमोल कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे! आपल्या उत्तुंग कार्यकर्तृत्वास त्रिवार वंदन!!!
Comments
Post a Comment