शाळा पूर्व तयारी मेळावा कोंढावळे
शाळेतले पहिले पाऊल!!!
मुलांसोबत मिळून काम करुया|
त्यांची शाळा पूर्व तयारी पक्की करुया |
शाळा पूर्व तयारी मेळावा कोंढावळे येथे संपन्न.
शाळा पूर्व तयारीच्या पहिल्या मेळाव्याचा प्रारंभ प्रभातफेरीने करण्यात आला. प्रभात फेरीत वाद्यवृंद अग्रभागी होता.शिक्षणाच्या उद्घोषणा मुलांनी उस्फुर्तपणे दिल्याने वेगळेच आनंददायी वातावरण तयार झाले.पालक व मुलेही सहभागी झाली होती. इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व मुलांचे विद्यार्थी प्रतिनिधी तेजस्विनी व श्रेया हिने गुलाबपुष्प देऊन केले.मेळाव्याचा शुभारंभ व उद् घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मधुकर कोंढाळकर,पालक आनंदा शिंदे व मुख्याध्यापक रवींद्र लटिंगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.तदनंतर सर्व मुलांचे व पालकांचे स्वागत सौ वर्षा पोळ,सौ रत्नमाला कोंढाळकर यांनी केले.तदनंतर या मेळाव्याचे प्रास्ताविक सुनील जाधव यांनी केले. पालकांनी मुलांच्या कृतीपत्रिका कशा घ्यायच्या व अध्ययन अनुभव कसे द्यायचे यांचे सोदाहरण स्पष्टीकरण घेतले. तदनंतर मुलांचे रजिस्ट्रेशन विकास पत्रात केले.सात स्टॉलवर विषय व क्षमतानिहाय अॅकटिव्हीटी घेण्यात आल्या. पालकांना 'शाळेतले पहिले पाऊल'या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते पालकांना वितरण करण्यात आले.सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.मेळाव्याच्या यशस्वितेसाठी उपक्रम प्रमुख श्री सुनील जाधव,सौ नलिनी मुसळे,सौ वैशाली कोंढाळकर,सौ वैशाली बारगे यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ.ज्योती कोंढाळकर,श्रीमती पूजा कोंढाळकर, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment