विनम्र अभिवादन ❗
प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ❗
शहीद वीर जवान तुझे सलाम !
रक्षिता तुम्ही देशा,प्राणांस घेऊन हाती |
तुमच्यास्तव दु:खितात अंतरे कोटी|
ओझर्डे गावचे सुपुत्र, कलाविष्कार व क्रांतिसिंह नाना पाटील मित्रमंडळाचे आधारस्तंभ वीर शहीद जवान सोमनाथ अरविंद तांगडे (जगताप)यांना मातृभूमीचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झाली.देशसेवेसाठी ते शहीद झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ❗
जय हिंद !!! वंदे मातरम् !!!
सोमनाथ हा आमच्या के.न.पी. चौकातील क्रिकेट खेळावर अफाट प्रेम असणारा खेळाडू,अतिशय जिद्दी आणि ध्येयासक्तीने त्याने क्रिकेटपटू म्हणून लौकिक मिळविला होता.त्याच्या आक्रमक फलंदाजीने अनेकदा संघाच्या निसटलेल्या पराभवाचे रुपांतर जिंकण्यात झालं होतं.अशी त्यांची फलंदाजीची खेळी बिनतोड आणि बहारदार असायची. त्या काळातील क्रिकेटस्पर्धांच्या स्मृती आजही डोळ्यासमोर तराळत राहतात.दैनिक सकाळ शब्दांकुर पुरवणीत 'अविस्मरणीय क्रिकेटचे दिवस' हा लेख लिहिताना तुझी आठवण प्रकर्षाने झाली. क्रांतिसिंह नाना पाटील मित्र मंडळाचा तु गणेशभक्त होतास. देशाची सेवा करणेसाठी तु सैन्यदलात भरती झालास.आणि आमचा सोमा फौजी झाला.याचा आम्हाला अभिमान वाटला होता. तु गणपती उत्सवातच गावी रजा काढून यायचा.गणपती उत्सवातील शुभारंभ ते विसर्जना पर्यतचे सगळे कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न करायचा.आपल्या मितभाषी स्वभावाने मित्रपरिवारात ,लहान मोठ्यांशी मिळूनमिसळून वागायचा. असा हा शूरवीर सिक्कीम येथील दुर्गम प्रदेशात सेवा करत असताना शहीद झाला.तुझ्या कर्तुत्वाला सलाम आणि शौर्यास त्रिवार अभिवादन!!!भावपुर्ण श्रद्धांजली!!! तुझ्या स्मृतींचा गंध सदैव दरवळत राहील.
"प्राणांची लावून बाजी,लढलात तुम्ही शूरवीर
राखली तिरंग्याची आन,यज्ञी देऊन निजशिर!!
उदात्त वीरमरण तुमचे काळजात पेरून ठेवू
हिरव्या पात्यावरी केशरी स्मृती कोरुन ठेवू!!"
सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना!!
Comments
Post a Comment