निरोप समारंभ इयत्ता सातवी








*अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती.....
स्वच्छता साहित्य व गोष्टींची पुस्तके इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेस देऊन साजरा केला निरोप समारंभ...प्रारंभी सर्व शिक्षकांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले. शाळेविषयी  मनोगते गौरव गायकवाड व तनुजा कोंढाळकर यांनी व्यक्त केली.सुनिल जाधव व मुख्याध्यापक रवींद्र लटिंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शुभचिंतन शुभेच्छा दिल्या.मनोगत व्यक्त केले.मुलांनो आपल्या कुटुंबासाठी व गावांसाठी भविष्यात शिकून मोठं झाल्यावर वेळ द्या.मातृभुमीला विसरु नका. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करा. उज्ज्वल यश संपादन करुन गावाचे नाव रोशन करा.''खूप शिकून माणुसकी कमवा." असे विचार मुख्याध्यापकांनी  प्रतिपादन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता म्हणून शाळेस पुस्तके व स्वच्छता साहित्य भेट दिले.आभार अस्मिता कोंढाळकर हिने मानले. समारंभाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आदित्य कोंढाळकर याने केले.तदनंतर सौ.वर्षा पोळ मॅडम,पूजा कोंढाळकर व सौ.  नलिनी मुसळे मॅडम यांनी बनविलेल्या अल्पोपहार 'मिसळ पावाचा' आस्वाद सर्वांनी घेतला..

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड