Posts

पुस्तक परिचय क्रमांक:१३२ धना

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१३२ पुस्तकाचे नांव-धना  लेखकाचे नांव- पै.गणेश मानुगडे  प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस , पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जुलै २०१८,पुनर्मुद्रण: डिसेंबर २०१८   पृष्ठे संख्या–१३२ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य--१८०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १३२||पुस्तक परिचय          धना लेखक: पै.गणेश मानुगडे ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 देशभक्ती,कृस्ती आणि प्रेम यांच्या वलयात सापडलेल्या पहिलवान धनाच्या संघर्षाची उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक कथा आहे. सोशल मीडियाच्या आभासी पटलावर पैलवान गणेश मानुगडे 'मल्लविद्या' नावाने फेसबुकवर लाल मातीतल्या अस्सल जिगरबाज मल्लविद्येतील अभुतपूर्व थरारक पर्वाची महती प्रकाशित करतात.त्यांचे जगभरातील वाचक फॉलोअर्स सत्तर लाखांपेक्षा जास्त आहेत. त्यांच्या या उपक्रमाला दाद ७०पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरविलेली आहे.सन्मानित केले आहे.मल्लविद्येवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. अत्तर,मित्र, चरित्र आणि चित्र यां...

पुस्तक परिचय क्रमांक:१३१ एक भाकर तीन चुली

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१३१ पुस्तकाचे नांव-एक भाकर तीन चुली  लेखक- देवा झिंजाड  प्रकाशक- न्यू ईरा पब्लिकेशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-डिसेंबर २०२३ प्रथम आवृत्ती  पृष्ठे संख्या–४२४ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य--४५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १३१||पुस्तक परिचय         एक भाकर तीन चुली  लेखक: देवा झिंजाड  ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾     गावखेड्यातील शेतकरी आणि शेतमजूर स्त्रियांच्या जीवन संघर्षाची अन् आलेल्या संकटांना हिम्मतीने सामोरं जात आपल्या कुटुंबाची जोपासना करणाऱ्या स्त्रीची कहाणी. या कादंबरीचे मुख्य बीज खेड्यातील स्त्रीने आपल्या आयुष्याची होरपळ परवड कुचंबणा होत असताना सुद्धा आपल्या मुलाला काबाडकष्ट करून शिकवलं.हे मुख्य कथाबीज आहे.    बऱ्याच दिवसांनी एक अस्सल मराठमोळं साहित्य .मातृत्वाचे जीणं जगताना झालेली आयुष्याची होरपळ आणि परवड वास्तव शब्दात लेखक  देवा झिंजाड यांनी व्यक्त केलीय वेदनादायी ...

पुस्तक परिचय क्रमांक:१३० पावसाआधीचा पाऊस

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१३० पुस्तकाचे नांव-पावसाआधीचा पाऊस  लेखिकेचे नांव-  शांता ज.शेळके प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण :ऑक्टोंबर २०१५ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१४४ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--१४०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १३०||पुस्तक परिचय          पावसाआधीचा पाऊस  लेखिका: शांता ज.शेळके ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 माणसाच्या मनाच्या गाभाऱ्याची खोली शब्दबध्द करणं सहज शक्य नसते.ते सर्जनशील विचारांचे सौंदर्य लाभलेल्या प्रतिभावान व्यक्तिमत्त्वेच सहजसुंदर सुंदर शब्दांत व्यक्तिचित्र रेखाटत असतात.मग ती साध्यासुध्या विषयावरील एखादी छोटीशी कथा असूद्या अथवा कादंबरी. वाचकाला आस्वाद घेताना कथेत गुंगून ठेवण्याचं कसब; शब्दसाजच करत असतात.त्या अक्षरधनाच्या सारथी आहेत. कविमनाच्या लेखिका बालसाहित्यिक शांता ज. शेळके. शासकीय समितीवरील परीक्षण म्हणून केलेले कार्य महनीय आहे.आळंदी येथे झालेल्या अखिल भार...

२०२३ माझा लेखाजोखा

Image
२०२३ या वर्षातील माझा लेखाजोखा !  नववर्षांत आपण शुभारंभी अनेक संकल्प मनात योजतो. काही नवीन घटना प्रसंगातून सुखदुःखाची झालर चिकटते.तर काही व्यक्तींच्या सहवासाने आनंदाचे तोरण सजते. काही संकल्प नव्याच्या नऊ दिवसाप्रमाणे तिथंच विरुन जातात तर काहींची पूर्तता कमी-अधिक होते. काही नवीन सत्कृत्ये तडीस जातात. काही ऐनवेळी सुचतात. मनातील भावनांना आकार ऊकार मकारात बांधून शब्द कागदावर उमटतात. यापैकी काही सत्कार्य आठवतील तशी शब्दातून व्यक्त करतोय..    माधवबाग आरोग्य सेवेच्या माध्यमातून उत्तम शरीरसंपदेसाठी १०किलो वजन व्यायाम,आहार, पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचारांनी कमी केले.याचं बहुतांशी श्रेय माझ्या कारभारनीला जाते.फेसबुकवर रील करायला शिकलो.   खिद्रापूर, राजापूर, नरसिंहवाडी, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कुरुंदवाड येथील समाधी स्थळास भेट. मेरुलिंग आणि धोमधरण पाणलोट क्षेत्रात कुटूंबा समवेत भटकंती केली. टेबललॅण्ड पठार भटकंती.श्री छत्रपती संभाजी राजे समाधी स्थळ तुळापूर व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीस भेट.अप्पूघर पुणे. सोनजाई व गणेश मंदिर मित्रांसमवेत भटकंती.श्री क्षेत्र वीर.न...

पुस्तक परिचय क्रमांक:१२९ मोबाईल माझा गुरु

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१२९ पुस्तकाचे नांव-मोबाईल माझा गुरु लेखकाचे नांव- नागेश शेवाळकर  प्रकाशक- श्री सुभाष शंकर विभूते,मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंड,आजरा  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-नोव्हेंबर २०२३ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–७२ वाड़्मय प्रकार-बाल कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--१५₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १२९||पुस्तक परिचय          मोबाईल माझा गुरु  लेखक: नागेश शेवाळकर ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾      संवादरुपाने हितगुज करणाऱ्या बालकथा संस्कारी गुणांचे आचरण कसे असावे याची शिदोरी समजावून देणाऱ्या बालकथा आहेत.      पालकांचे समुपदेशन करणारा हा कथासंग्रह आहे.हल्लीची मुलं मोबाईल शिवाय जगूच शकत नाहीत.कारण सतत त्यांना मोबाईल हवं असतो. त्यातील खेळ,गाणी, व्हिडिओ,कोडी पाहण्यासाठी ती उतावीळ झालेली असतात. त्यापायी ते तहानभूक विसरून जातात.याचं मोबाईल मुळे कैकदा नवलाईच्या घटना ही घडतात.      'मोबाईल माझा गुरु'हा बालकेंद्रित कथासंग्रह आहे...

निसर्गाच्या सान्निध्यात आनंदीआनंद

Image
निसर्गाच्या सान्निध्यात आनंदी आनंद  कोंढावळे शाळेतील खेळाडूंनी तालुका स्तरावर स्व.यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली. *कु.तृप्ती नारायण सावंत १०० मी.धावणे द्वितीय  *विघ्नेश मधूकर कोंढाळकर १००मी.धावणे द्वितीय *अवधूत लक्ष्मण कोंढाळकर योगासने तृतीय क्रमांक *१००*४ रिले उपविजेतेपद कर्णधार सिध्देश मधूकर कोंढाळकर आणि कबड्डी,लंगडी,धावणे या स्पर्धेत सहभागी झालेबद्दल या खेळाडूंचे कौतुक शाळेतील सर्व मुलांना सामिष भोजनाची मेजवानी देऊन सेलिब्रेशन केले.यावेळी मुलांनी लोकगीतावर ठेका धरत बहारदार समूह नृत्य सादर करुन धमाल उडवून दिली.त्या परिसर भेटीचे वर्णन.... #################### यावर्षी पाऊसपाणी कमी झाल्याने ओढ्यानाल्यात वाहून गेलेल्या पाण्याच्या धारांचे वण कातळावर ठळक दिसत होते. शिवारात ज्यांच्याकडे पाण्याची सोय त्यांनी खाचरं वलवून गहू,हरभरा हिसकडला होता.कुठं कुठं जमीनीच्यावर डोकं काढलेली रोपं दिसत होती.तर कुठं चार बोटं , वीतभर उंचावलेली रोपं नजरेत भरत होती. काहीच न केलेल्या खाचरात मात्र रान गवतानी हिरवी पिवळीकाळी रंगावली रेखाटली होती.चिबडाची खाचरं  येणाऱ्या जाणा...

आपुलकीची नाती वाढवतेय वाचन साखळी

Image
📓📚📖📓📚📖📓📚📖📓📚📖  आपुलकीची नाती वाढवतेय वाचन साखळी      मित्रहो नमस्कार, आमच्या समूहातील आदरणीय संयोजक, सदस्य आणि मार्गदर्शक स्वत:च्या पदप्रतिष्ठेचा कोणताही अभिनिवेश न बाळगता दिसेल ते, पडेल ते,सुचवेल ते आणि सांगेल ते काम करत ‘कमी तिथं आम्ही ‘या उक्तीने कामं करणारे समस्तजण वाचन साखळी समूहाच्या वाचनरथाचे सारथी..... त्यांच्या मदतीला सहकार्याला सलाम! निमित्त होते वाचनयात्री पुरस्कार प्रदान आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे.खरोखरच पुस्तकांच्या सान्निध्यात रममाण होणारे रसिक वाचक आणि शब्दप्रभूंची उपस्थिती वाचन साखळीच्या संयोजिका प्रतिभाताईंनी एका पुस्तकाच्या पानात स्नेहबंधांनी बांधलीय.कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी,उत्कृष्ट परिचयक आणि वाचनयात्री असे सगळेच साहित्ययात्री; कारण त्यांनी आपल्या विचारांचे सौंदर्य अनेक साहित्य कृतीतून व्यक्त केलेय. परिसरातील घडामोडीवर आपल्या लेखन शैलीने सदर लेखन करुन ते दैनिकातून प्रसिद्ध करत करत पुस्तक रुपाने सर्जनशील साहित्य प्रकाशित केले आहे. काहींचे एखादं, दुसरं, तिसरं पुस्तक प्रकाशित झाले आहे तर काहींनी पुस्तकांची पंचविशी साजरी केली अस...